DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

रविवार, २५ डिसेंबर, २०११

११० टेनामेन्टच्या पुनर्विकासाचे त्रांगडेच!


altपुनर्विकासाच्या योजनेवरून रहिवाशांमध्ये पडलेले दोन गट, मुख्य प्रवर्तक आणि विकासकाची हातमिळवणी, काही बिल्डरांचा या योजनेवर असलेला डोळा आणि पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोठय़ा घराच्या स्वप्नापायी शिवडीमधील ११० टेनामेन्टच्या पुनर्विकासाचे त्रांगडे झाले आहे. कायदेशीर बाबींची पूर्तता न करताच ही योजना पूर्णत्वास नेण्याचा विकासकाचा इरादा असल्याचा आरोप येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे, तर रहिवाशांमध्ये एकजूट नसल्यामुळे ही योजना रखडली, असे विकासकाचे म्हणणे आहे. पालिकेच्या ११० टेनामेन्टमधील चाळींच्या पुनर्विकासासाठी अ‍ॅशफोर्ड आणि मॅकोनी हे दोन बिल्डर इच्छुक होते. परंतु कमी चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) मिळत असल्याने या दोन्ही बिल्डरांनी काढता पाय घेतला. पुनर्विकासासाठी रहिवाशांनी सुरुवातीलाच वास्तुविशारद म्हणून काम करणाऱ्या मेसर्स कन्सल्टंट कम्बाईन या कंपनीकडे संमती पत्रे सादर केली. या कंपनीनेच पुनर्विकासाचा प्रस्ताव पालिकेकडे सादर केला होता. परंतु पालिकेने हा प्रस्ताव २००१ मध्ये नामंजूर केला. त्यानंतर २००५ मध्ये रहिवाशांनी ओम साईल सॉलिटेर या कंपनीची विकासक म्हणून निवड केली आणि त्याला पालिकेने मंजुरीही दिली. कालांतराने ही कंपनी नोंदणीकृत नसल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सोसायटीची कार्यकारिणी आणि काही रहिवाशांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि रहिवाशांमध्ये दोन गट पडले.
या चाळीच्या पुनर्विकासाची योजना नियंत्रण नियमावलीमधील कलम ३३ (७) अन्वये राबविण्यात येणार होती. मात्र २००१ मध्ये या योजनेचे परिशिष्ट- दोन (अ‍ॅनेक्चर-२) रद्द झाल्यामुळे पालिकेने ही योजनाच रद्द केली. मात्र ओम साईल सॉलिटेर या विकासकाने नगरविकास खात्याकडून नियंत्रण नियमावलीतील कलम ३३(७) ऐवजी ३३ (९) मध्ये ही योजना राबविण्यासाठी परवानगी मिळविली. त्यासाठी १९९४ मध्ये रहिवाशांकडून घेण्यात आलेली संमती पत्रे सादर करण्यात आली. मात्र आपण नव्याने रहिवाशांकडून संमती पत्रे घेतल्याचे विकासकाचे म्हणणे आहे तर विकासकाने आपल्याकडून फक्त कोऱ्या कागदावर सही घेतली होती, असे रहिवाशांनी सांगितले. काही रहिवाशांच्या मागणीवरून मे २००९ मध्ये सहकारमंत्र्यांनी अश्वमेध को-ऑप. सोसायटी रद्द करण्याचे आदेश दिले. या योजनेतील मुख्य प्रवर्तक जून २००९ मध्ये याविरोधात न्यायालयात गेले. या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत या योजनेबाबत सोसायटीने कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र असे असतानाही नोव्हेंबर २००९ मध्ये पालिकेने या योजनेला आयओडी दिली. आयओडी मिळताच वास्तुविशारदाने पालिकेकडे पुनर्विकासाचा आराखडा सादर केला आणि त्याला पालिकेने मंजुरीही दिली. पण आमच्याबरोबर कसलाही करार करण्यात आलेला नाही, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. मात्र पालिकेच्या विधी विभागाचे मत घेऊनच आयओडी देण्यात आली आहे, असे विकासकाचे म्हणणे आहे. 
न्यायालयाने २०११ मध्ये सोसायटीची निवडणूक घेण्याचे आदेश दिले. अलीकडेच या सोसायटीची निवडणूक पार पडली असून जुन्या कार्यकारिणीतील तीन सदस्य, तर विरोधी गटाचे चार सदस्य निवडून आले आहेत. जुन्या कार्यकारिणीने आपल्याला अद्यापही योजनेसंदर्भातील कागदपत्र दिलेले नाहीत, असा आरोप कार्यकारिणीतील चार सदस्यांनी केला आहे. मुख्य प्रवर्तकाकडे कराराच्या प्रती पाठविल्या होत्या. परंतु रहिवाशांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या नाहीत, असे विकासकाकडून सांगण्यात आले.
पालिका अधिनियम १८८८ च्या कलम १०५ बी अन्वये नोटीस पाठवून पालिकेने घरे रिकामी करण्याचे आदेश रहिवाशांना दिले. या विरोधात रहिवाशी न्यायालयात गेले. मात्र त्यांच्या पदरी निराशा आली. या चाळीतील काही बंद घरांचा संक्रमण शिबिरात अंतर्भाव करण्यात आला असून तेथे या रहिवाशांना हलविण्यात आले आहे. एफ-दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कापसे यांनी या संक्रमण शिबिराची पाहणी केली आणि दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात घरे रिक्त करण्याची कारवाई सुरू केली. त्यामुळे रहिवाशी संतप्त झाले आहेत. पूर्वकल्पना न देताच अचानक अशी कारवाई करायला नको होती, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.
संक्रमण शिबिरातील घरांची अवस्था अत्यंत दयनीय असून तेथे प्रचंड धूळ आहे. त्याच घरात या रहिवाशांचे सामान पालिका कर्मचाऱ्यांनी नेऊन टाकले आहे. या घरांच्या खिडक्यांना दरवाजेच नाहीत. घरांमध्ये घुशींनी बिळे केली आहेत. विद्युतपुरवठा नसल्यामुळे अंधारात दिवस काढण्याची वेळ या रहिवाशांवर आली आहे. पाण्याच्या अपुऱ्या टाक्या, मोजकी शौचालये, मोडकळीस आलेल्या चाळीतील घरांमध्ये आता या रहिवाशांना दिवस कंठावे लागत आहेत. दरम्यान, येत्या आठ दिवसांमध्ये संक्रमण शिबिरामध्ये सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन विकासकाने दिले आहे. रहिवाशांचे विद्युतपुरवठय़ाचे मीटर संक्रमण शिबिरातील घरात बसविण्यासाठी काही अवधी लागणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या मीटरमधून या घरांना वीजपुरवठा करीत आहोत, असे विकासकाने सांगितले. 


Source :- Click Here


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा