वास्तुरंगमधून घर आणि त्यासंबंधीच्या अनेक विषयांवर विविध माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात. त्यामध्ये घरसजावट वस्तूंची रचना इथपासून ते घर घेणे, सोसायटी स्थापन होणे, गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट-घरांचे करारनामे, गृहनिर्माण संस्थांचा दैनंदिन कारभार ते अगदी अलीकडील अतिशय परवलीचा ठरलेला विषय म्हणजे रिडेव्हलपमेंट अशा विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले गेले आहे.
त्यामुळेच आमचे असंख्य वाचक अनेक प्रश्न आमच्याकडे पाठवत असतात. म्हणूनच या पुरवणीमधून आम्ही वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचा तसेच त्यांचे शंकासमाधान करण्याचे आम्ही ठरवले आहे.वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील प्रख्यात कर व कायदेतज्ज्ञ श्रीनिवास घैसास.
प्रश्न- गृहनिर्माण संस्था या मनमानी पद्धतीने हस्तांतरण शुल्क किंवा प्रीमियम आकारू शकतात का? यासंबंधीचे काय नियम आहेत?
नीलिमा पटवर्धन, ठाणे
उत्तर- गृहनिर्माण संस्था या आपल्या मताने हस्तांतरण शुल्क किंवा प्रीमियम आकारू शकतात. मात्र त्याबाबतची कमाल मर्यादा त्यांना उल्लंघन करता येत नाही. तसे केल्यास ते कृत्य बेकायदेशीर ठरते. गृहनिर्माण संस्थांनी किती हस्तांतरण शुल्क आकारावे याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत ते पुढीलप्रमाणे -
कमाल मर्यादा
१) महानगरपालिका वा डेव्हलपमेंट अॅथॉरिटी यांच्या अखत्यारीतील संस्था- रु. २५,०००/-
२) ‘अ’ वर्ग नगरपालिका हद्दीमधील संस्था - रु. २०,०००/-
३) ‘ब’ वर्ग नगरपालिका हद्दीमधील संस्था- रु. १५,०००/-
४) ‘क’ वर्ग नगरपालिका हद्दीमधील संस्था- रु. १०,०००/-
५) ग्रामीण भागातील गृहनिर्माण संस्था- रु. ५,०००/-
या मर्यादेपेक्षा कमी हस्तांतरण शुल्क आकारण्याचा अधिकार संस्थांना आहे किंवा अजिबात हस्तांतरण शुल्क अथवा प्रीमियम न आकारण्याचे ठरवण्याचा अधिकारदेखील त्यांना आहे.
प्रश्न २ - नॉमिनेशन केलेले नसल्यास गृहनिर्माण संस्था एखाद्या मृत सदस्याचे समभाग त्यांच्या वारसांच्या नावे हस्तांतरित करू शकते का?
संध्या कर्वे, अंधेरी
नॉमिनेशन न केलेल्या मालमत्तेचे हस्तांतरण हे एखादी गृहनिर्माण संस्था करू शकते. मात्र त्यासाठी पुढील गोष्टी अस्तित्वात असणे आवश्यक आहेत त्या अशा-
१) मृत व्यक्तीच्या सर्व वारसांमध्ये कोणतेही वाद-विवाद असता कामा नयेत.
२) ज्या वारसाच्या नावे समभाग हस्तांतरण करायचे असतील त्याला इतर सर्व वारसांनी प्रतिज्ञापत्र स्वरूपात ना-हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे.
३) ज्या व्यक्तीच्या नावे समभाग हस्तांतरित करायचे आहेत त्याने उपविधीत नमूद केल्याप्रमाणे हमीपत्र (इंडेम्निटी बॉण्ड) सादर केला पाहिजे.
वर वर्णन केलेली परिस्थिती असेल व भाग हस्तांतरणासाठीच्या अन्य तांत्रिक बाबी जर संबंधितांनी पूर्ण केल्या असतील तर भाग हस्तांतरण करण्यास हरकत नाही. मात्र वारसांमध्ये वाद असतील तर त्या वेळी संबंधितांनी वारस दाखला आणण्यास सांगणे हेच उचित ठरेल.
प्रश्न - बिनभोगवटा शुल्क (नॉन ऑक्युपन्सी चार्जेस) हे केव्हा आकारले जातात?
रवी सुभेदार, कुर्ला
उत्तर- एखाद्या सदस्याने आपली सदनिका/ गाळा/ दुकान जर अन्य व्यक्तीला वापरायला दिले तर त्या वेळी गृहनिर्माण संस्था ही बिनभोगवटा शुल्क आकारू शकते. मात्र ते आकारताना ते सव्र्हिस चार्जेसच्या १०% इतकेच असेल हे पाहणे आवश्यक आहे. त्याहून जादा शुल्क आकारल्यास ते बेकायदेशीर ठरते. पुढील बाबतीत मात्र संस्थेला बिनभोगवटा शुल्क आकारता येत नाही.
१) एखादी व्यक्ती एखाद्या सदनिकेत विक्रीचा करार करून राहात असेल वा दुकान/गाळा वापरत असेल तर..
२) कायद्यात नमूद केलेले नातेवाईक जर सदनिकेमध्ये राहात असतील तर.. उदा. सभासदाचे आई, वडील, बहीण, भाऊ, मुलगा, मुलगी, जावई, मेव्हणा, मेव्हणी, नातू अथवा नात याशिवाय अन्य नातेवाईक की, ज्यांना कायद्याने राहण्याची मुभा दिलेली आहे.
३) गृहनिर्माण संस्थेने या ना त्या व्यतिरिक्त राहण्यास परवानगी दिलेले नातेवाईक.
यापैकी कोणीही व्यक्ती सदनिका, दुकान, गाळा वापरत असतील तर त्या वेळी संस्थेला बिनभोगवटा शुल्क आकारता येणार नाही.
वाचकांनी आपले प्रश्न सुवाच्य अक्षरात व त्याचा नीट अर्थबोध होईल अशा तऱ्हेने लिहून पाठवावेत. प्रश्न शक्यतो अनेक जणांना उपयोगी पडतील अशा स्वरूपाचे असावेत. वैयक्तिक हेवेदावे असणारे प्रश्न टाळावेत.
प्रश्न पाठविण्यासाठीचा पत्ता-
संपादक - वास्तुरंग, लोकसत्ता संपादकीय विभाग
प्लॉट क्रमांक ई एल १३८, टी टी सी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई - ४०० ७१०.
vastu.loksatta@gmail.com
संपादक - वास्तुरंग, लोकसत्ता संपादकीय विभाग
प्लॉट क्रमांक ई एल १३८, टी टी सी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई - ४०० ७१०.
vastu.loksatta@gmail.com
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा