![alt](http://www.loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20111126/ws02.jpg)
५ नोव्हेंबर २०११ च्या ‘वास्तुरंग’ पुरवणीच्या पृष्ठ क्र. ३ वर माननीय नंदकुमार रेगे यांचा वरील विषयावर प्रसिद्ध झालेला लेख हा अत्यंत माहितीपूर्ण व गृहनिर्माण संस्थांना डिम्ड कन्व्हेयन्स मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगीदेखील आहे. असा माहितीपूर्ण व उपयुक्त लेख छापल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे व नंदकुमार रेगे यांचे मन:पूर्वक शतश: आभार.
खरे म्हणजे मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहकारी संस्थांसाठीच्या आचारसंहितेत (मॅन्युअलमध्ये) एकतर्फी अभिहस्तांतरणासाठी (डिम्ड कन्व्हेयन्ससाठी) एकूण १२ नव्हेत तर १४ प्रकारची कागदपत्रे मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सक्षम अधिकारी) यांना सादर करणे आवश्यक आहे. (एकूण १७ कागदपत्रे सादर केल्यास नंतर ते फायद्याचे ठरते.)
० संस्थेने मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सक्षम अधिकारी) यांच्याकडे नमुना-७ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
० अर्जासोबत रु. २,०००/- चा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे.
यातील मुख्य व अत्यंत महत्त्वाचा पण लोकांना माहीत नसलेला भाग म्हणजे मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहकारी संस्थांसाठीच्या आचारसंहितेत (मॅन्युअलमध्ये) संस्थेची नोंदणी करताना बिल्डरने सादर करायच्या ज्या कागदपत्रांची यादीदेखील देण्यात आलेली आहे त्या यादीत वरील १४ पैकी सुरुवातीच्या १ ते १० क्रमांकांवरील कागदपत्रांचा समावेश आहे. संस्थेची नोंदणी करताना जर बिल्डरने ती कागदपत्रे आधीच त्यांच्या वॉर्डच्या उपनिबंधकांना सादर केली असतील तर बिल्डर ती कागदपत्रे संस्थेला देण्यास सहसा नकार देणार नाही. अगदी वाईटात वाईट झाले व बिल्डरने ती कागदपत्रे संस्थेला देण्यास नकार दिला तर संस्था तीच कागदपत्रे- माहितीच्या अधिकाराखाली- त्यांच्या वॉर्डच्या उपनिबंधकांकडून मिळवू शकते. काही जुन्या संस्थांविषयीची वरील १० कागदपत्रे (खूप पूर्वीची/ जुनी असल्यामुळे) काही वेळा मा. उपनिबंधकांकडे उपलब्ध नसू शकतात, पण तसे झाल्यास सक्षम अधिकारी बिल्डरला ती कागदपत्रे सादर करण्यास भाग पाडू शकतात.
आता राहता राहिली उरलेली ७ (क्र. ११ ते १७) कागदपत्रे. ही कागदपत्रे बहुतेक संस्थांकडेच उपलब्ध असतात. फार तर बिल्डरला नोटिसेस पाठविण्यासाठी संस्थेला थोडाफार खर्च करावा लागू शकतो एवढेच.
तेव्हा डिम्ड कन्व्हेयन्सच्या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी डिम्ड कन्व्हेयन्ससाठी अवाच्या सव्वा रकमेला मंजुरी देण्याआधी वर दिलेला साधा, सरळ, सोपा व कमी खर्चाचा मार्ग जरूर पडताळून पाहावा.
खरे म्हणजे शासनाने डिम्ड कन्व्हेयन्ससाठी नियम/ कायदा करण्याबरोबरच बिल्डरने जर संस्थेला तिची नोंदणी केल्यानंतर चार महिन्यांच्या आत कन्व्हेयन्स दिला नाही तर- कन्व्हेयन्स न दिल्यामुळे- मिळणारा एकदेखील फायदा (उदा. शिल्लक असलेल्या एफएसआयचा वापर करण्यास परवानगी) त्याला मिळणार नाही व नंतर शासनाकडून लाभ (जसे वाढीव चटई क्षेत्र इ.) देण्यात आल्यास त्यावरदेखील बिल्डरचा नव्हे तर संस्थेचाच अधिकार राहील, असा एक जादाचा कायदा पारित केला असता तर बिल्डरने कन्व्हेयन्स देण्यास फारशी टाळाटाळ केलीच नसती. कारण आज बिल्डर कन्व्हेयन्स देण्यास टाळाटाळ करतात ते केवळ तो न दिल्यामुळे त्यांना जे फायदे मिळतात व भविष्यात मिळण्याची शक्यता असते ते मिळविण्यासाठीच! त्याने कन्व्हेयन्स दिला नाही तरी त्याला काहीच फायदा होणार नाही, हे एकदा का बिल्डरला कळले की तो नक्कीच कन्व्हेयन्स देण्याची टाळाटाळ करणार नाही.
अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
(१) नोकरी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र.
(२) जागेचा सातबारा उतारा अथवा मालमत्ता नोंदणी कार्डचा (प्रॉपर्टी कार्डचा) उतारा.
(३) सभासदांची नमुन्यातील यादी.
(४) विकसन करारनाम्याची प्रत.
(५) कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अॅटर्नी) असल्यास त्यांच्या प्रती.
(६) जागेचा शोध अहवाल (सर्च रिपोर्ट).
(७) बिगरशेती प्रमाणपत्राची (एन. ए. ऑर्डरची) प्रत.
(८) कमाल जमीनधारणा कायद्यातून (यू.एल.सी. दाखला) सूट मिळाल्याचे प्रमाणपत्र.
(९) संबंधित महापालिका/ सक्षम प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या नकाशाची प्रत.
(१०) अभिहस्तांतरण करायच्या जागेच्या क्षेत्रफळाविषयी वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) यांचा दाखला.
(११) संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची (रजिस्ट्रेशनची) सत्य प्रत किंवा अपार्टमेन्ट असल्यास डिड ऑफ डिक्लरेशनची सत्य प्रत.
(१२) सर्व सदनिका/ दुकाने यांच्या नोंदणीकृत खरेदीखतांच्या प्रती (जेवढे करार झाले असतील तेवढय़ा सर्व करारांच्या प्रती).
(१३) अभिहस्तांतरण करून देण्यासाठी मूळ मालक किंवा विकासकांना पाठवलेल्या नोटिशीची प्रत.
(१४) मूळ मालक किंवा विकासकांचा पत्रव्यवहाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक इ.चा तपशील.
(१५) भोगवटा दाखला (ऑक्युपेशन सर्टिफिकेट).
(१६) एकतर्फी अभिहस्तांतरण कराराच्या मसुद्याच्या एकूण ५ प्रती.
(१७) एकूण जेवढे करार झाले असतील तेवढय़ा सर्व करारांच्या वेळी स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फी भरल्याचा पुरावा (पावत्यांच्या प्रती) - हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जर सर्व करारांच्या वेळी स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फी भरलेली असेल तर एकतर्फी अभिहस्तांतरण कराराची नोंद करताना फक्त रु. १००/- स्टॅम्प डय़ुटी म्हणून भरावे लागतात. अन्यथा अभिहस्तांतरण कराराची नोंद करताना त्या जमिनीच्या त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे असलेल्या किमतीच्या प्रमाणात (काही लाखांत) स्टॅम्प डय़ुटी भरावी लागते.
Source :- Click Here
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा