DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

हे निसर्गाचे देणे..

निसर्गात विद्यमान असलेल्या विद्युत, औष्णिक, चुंबकीय, वैश्विक इ. सुमारे दहा प्रकारचे ऊर्जाप्रवाह, अष्टदिशा यांचा उपयोग वास्तुरचनेच्या वेळी करावा. जेणेकरून निसर्गातील महत्त्वपूर्ण घटकांचा, तत्त्वांचा उपयोग आपल्याला करता येईल व आपले जीवन अधिक सकारात्मक व आरोग्यदायी होईल.
संपूर्ण विश्वाचे व्यवहार एका अदृश्य, गूढ अशा नियामक शक्तीने सुसंचालित आहेत. ऋग्वेद कालाच्याही अगोदर हजारो वर्षे ग्रह, नक्षत्रं व तारे यांची स्थिती, भ्रमणे व त्याचा मनुष्य जीवनावर विशेषत: मनुष्याच्या भाग्यावर होणारा परिणाम ऋषींनी अभ्यासिलेला. तसेच घर वा वास्तूवर आजूबाजूच्या गोष्टींचा होणारा परिणाम आणि वास्तूचा मानवी जीवनावर होणारा परिणाम वा वास्तू व मानवी जीवन याचा परस्पर संबंध या सर्वाचे निरीक्षण करून, वास्तू व त्यातील दोष कमी करून मानवी जीवन सुखी करण्यासाठी मागदर्शन केले. त्यासाठी पूर्वाचार्यानी गणित, ज्योतिष, वनस्पतीशास्त्र, संगीत, योग व इतर भौतिकशास्त्रे यांचा आधार घेतला. यातील निरीक्षणे, सूत्रे वा निष्कर्ष हे अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने मांडले.
निसर्गात विद्यमान असलेल्या विद्युत, औष्णिक, चुंबकीय, वैश्विक इ. सुमारे दहा प्रकारचे ऊर्जाप्रवाह, अष्ट दिशा या सर्वामध्ये सुसंवाद होऊन उत्पन्न होणाऱ्या नकारात्मक व सकारात्मक तत्त्वांच्या मिश्रणातून सर्वाचा परिणाम मानवी जीवनावर शुभफलदायी होण्यासाठी वास्तूची अंतर्गत व बाह्य़रचना कशी असावी, त्यात कोणत्या घटकांचा वापर करावा याचा शास्त्रशुद्ध अभ्यास वास्तुविद्येत होतो. विश्वात चालू असलेल्या व्यवहाराशी समांतर अशा संरचना माणसात आहेत. ही ऊर्जा  वापरून घर, परिसर व विश्व यांच्याशी सुसंवाद घडवून आणण्याचे हे शास्त्र आहे. खरं तर घर किंवा इमारत बांधण्यापूर्वीच जागा निवडण्याच्या प्रक्रियेपासून याची सुरुवात होते. यात फक्त इमारतींचाच नव्हे तर दिशाप्रभाग, गृहअंमल व ऊर्जाप्रवाह यांचा सुंदर उपयोग ग्राम वा नगररचनेसाठी सुद्धा केला जातो.
वास्तुविद्येनुसार बनविलेली घरे नैसर्गिक पद्धतीने होणारे वायूंचे असंतुलन व प्रदूषण रोखतात. यामध्ये ऊर्जास्रोताचा जास्तीत जास्त वापर केला जातो. जी ऊर्जा नैसर्गिकपणे मिळते. सूर्यकिरण व प्राणिक तसेच जैविक ऊर्जा जास्तीत जास्त मिळण्यासाठी घरांची रचना वास्तुविद्येतील नियमानुसार केल्यास घरात प्रसन्नता व उत्साह वाढतो. अशा घरात सकाळची सूर्यकिरणं अधिक प्रमाणात येतात. त्यामुळे साहजिकच त्यात ड, फ व अ जीवनसत्त्व व वैश्विक ऊर्जा अधिक प्रमाणात असल्यामुळे ती घरातील लोकांना अधिक मिळतात. अनावश्यक व त्रासदायक चुंबकीय लहरी नैऋत्येकडून बाहेर निघून जातात. शिवाय सूर्याची उष्णताही आपोआप कमी होते. विशिष्ट पद्धतीनं खिडक्या- दारे ठेवण्यामागे ऋतुमानानुसार बदलणाऱ्या तापमानापासून संरक्षण व हवेचा दाब नियंत्रण करणे, हा उद्देश असतो. झोपणं, जेवणं वा बसणं यासाठीचे नियम हे चुंबकीय प्रभाव, गुरुत्वाकर्षण याचा रक्तप्रवाहावर चांगला परिणाम साधण्यासाठीच आहेत. योग्य पद्धतीने बांधलेल्या वास्तूत व्यक्तीला चुंबकीय क्षेत्र, जैवविद्युत क्षेत्र व जलवायू आदी पंचमहाभूतांच्या संतुलनामुळेही बराच फायदा होतो. अधिक बारकाईने पाहिल्यावर अतिनील किरणांचा उपद्रव कमी करण्याचा प्रयत्न केल्याचं सिद्ध झालंय. जर्मनीतल्या लेकर (Lecher) नावाच्या शास्त्रज्ञानं शोधलेल्या अ‍ॅंटेनानं व अत्याधुनिक अशा थर्मोस्कॅनर यंत्रामुळं हे सर्व खात्रीपूर्वक तपासणंही शक्य झालंय. मुख्य म्हणजे अशा वास्तूत मानसिक स्वास्थ्य तर खूपच चांगलं राहातं. यात वेळोवेळी केला जाणारा पिरॅमिडच्या आकाराचा वापरही त्यातून निघणाऱ्या बीटा किरणांमुळे अधिक किफायतशीर होतो. गोल्डन ट्रायंगलच्या तत्त्वानुसार अशा रचना स्वास्थ्य, मन:शांती, समाधान, उत्साह मिळवून देतात, असं शास्त्रज्ञांना आढळलंय. गोल्डन ट्रायंगलच्या तत्त्वानुसार एका भागातली घडामोड संपूर्ण भागात बदल घडवते. तसेच वास्तूच्या एका भागातला दोष संपूर्ण वास्तूचं संतुलन बिघडवतो. 
विशिष्ट रंगाचा वापर Fantom Colour Effect  तत्त्वानुसार वा पंचमहाभूतांच्या गुणावगुणानुसार केला जातो. दिशांचे नियमन व पंचमहाभूतांचे संतुलन तसेच ऊर्जेचा पुरवठा  याचा सकारात्मक उपयोग केला जातो. मानवाच्या विचारांची वृक्षवनस्पतींशी देवाणघेवाण होऊ शकते, हे जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञ व्होगेल, ल्युथर बरबॅक, रशियाचे राऊल फ्रॅन्सि व जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केलेले आहे. म्हणून वास्तुदोष निवारणासाठी वापरला जाणारा अष्टदिशा वृक्ष व नक्षत्र राशी वृक्षांचा उपाय, हाही शास्त्रीय ठरतो. यात आयुर्वेद व ज्योतिषविद्येतील नियमांवर आधारित स्पंदन निर्मिती करण्यासाठी विशिष्ट वृक्षांची योजना ऊर्जाप्रवाहाच्या तीव्रतेनुसार वास्तूमध्ये वा परिसरात केली जाते. मन, शरीर तसेच बुद्धीमध्ये शुभ गुणांची वृद्धी केली जाते. ग्रह नक्षत्रांचे प्रतिनिधी म्हणजे आराध्यवृक्ष यांना देवत्व दिल्यामुळे पर्यावरण रक्षणाचा हेतू आपोआपच साध्य होतो. वनस्पती आपल्या औषधी गुणांबरोबर सुप्त जीवनरस व वैश्विक ऊर्जा प्रक्षेपित करतात. स्वास्थ्यदायी वृक्षांची लागवड आयुर्वेदातील सूत्रानुसार दिशाप्रभागात केली जाते. आपल्या कक्षेत भ्रमण करताना प्रत्येक ग्रह, उपग्रह, नक्षत्र व तारे एक विशिष्ट ध्वनि निर्माण करतो, ज्याचे एक संगीत निर्माण होते. ज्याचा वापर स्वरकुंडली बनवून वास्तुदोष कमी करण्यासाठी होतो. शिवाय वास्तूच्या मालकाच्या जन्मवेळच्या आकाशस्थ ग्रहस्थितीनुसार वर दिलेल्या मार्गानी वा संगीतोपचारांनी उपाय योजले जातात.
अमेरिकेच्या कॅथे बॅचलर (Cathe Bachelor) यांनी तर भूगर्भदोषाच्या तणावामुळे (Geopathic Stress) हृदयविकार, रक्तविकार, निद्रानाश, पाठीच्या तक्रारी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे इ. व्याधी होतात; व असा तणाव नसणाऱ्या जागी हे विकार बरे होतात हेही सप्रयोग सिद्ध केलंय.  विश्व हे ‘मॅटर’ आणि जीवन यांनी बनलं आहे. या सगळयांची संरसचना ही अणुसदृश असते. प्रत्येकाला कंपनसंख्या असते. ही कंपनसंख्या मोजण्यासाठी  अणुवैज्ञानिकांनी युनिव्हर्सल स्कॅनिंग नावाचा मॉलिक्युलर रिझोनन्सच्या तत्त्वावर बनवलेला, नऊ होल्ट बॅट्रीवर चालणारा व स्वत:भोवती फिरणारा सेन्सर्स बनविला आहे.  त्याच्या मदतीनं विविध प्रकारच्या ऊर्जा, अदृश्य शक्ती, नकारात्मक ऊर्जा अपघात प्रवण जागा, आत्महत्येची ठिकाणं, अनिष्ठ गोष्टींचं अस्तित्त्व तसेच सगळया पॅथींची ओषधे, रत्न आणि वास्तू यांचं परिक्षण करता येतात. यामुळे शंभर ते दोनशे मीटर्स अंतरापर्यंतच्या विविध ऊर्जा ओळखता येते. रशियननांनी किर्लिअन कॅमेरा शोधला आहे. ज्यामुळे व्यक्तीचं प्रभामंडळ (ऑरा) मोजता येतं.
ओरिसातल्या चक्रिवादळात तर आधुनिक तंत्रज्ञानानं बांधलेल्या सर्व प्रकारच्या इमारती भुईसपाट झाल्या, तेव्हा राज्यातली अठराशे मंदिरच नव्हे तर त्यांचे ध्वजस्तंभही हलले नाहीत. भारतीय वास्तुनियमानुसार बांधलेलं अंजारचं मंदिर सहिसलामत राहिलं व भूजच्या भूकंपातील निर्वासितांना त्यात आसरा मिळाला. 
निसर्गातील उपलब्ध घटकांचा अधिकाधिक उपयोग करून आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर करावे. हे त्या निसर्गाचेच देणे आहे, ते भरभरून घेऊयात!


Source :- Click Here

Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा