DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

शुक्रवार, १६ डिसेंबर, २०११

पालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे

 महापालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या भूखंडांवरील मालमत्तांच्या पुनर्विकासासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहे. त्यानुसार निवासी वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या मालमत्तांचे हस्तांतरण करताना आता बाजारभावाच्या १० पट रक्कम शुल्कापोटी मोजावी लागणार आहे. त्याचबरोबर व्यापारी वापरासाठी देण्यात येणाऱ्या मालमत्तेसाठी थेट दुप्पट रक्कम शुल्कापोटी द्यावी लागणार आहे. पालिकेने या संदर्भात तयार केलेली नवी मार्गदर्शक तत्त्वे लवकरच सुधार समितीपुढे सादर करण्यात येणार आहेत.
महापालिकेने आपले भूखंड एक रुपया भाडे आकारून निवासी, औद्योगिक, वाणिज्य, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय, मुंबई सार्वजनिक विश्वस्त, पालिका कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण सोसायटय़ांना भाडेतत्त्वावर दिले आहेत. या भूखंडांवर आज इमारती उभ्या राहिल्या असून या भूखंडांवरील इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव आता पालिकेकडून सादर करण्यात येत आहेत. महापालिकेच्या १२४७ मालमत्ता कायमस्वरूपी नाममात्र एक रुपया भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर २१४८ मालमत्ता ९९९ वर्षांसाठी, एक मालमत्ता १२० वर्षांसाठी, ५८४ मालमत्ता ९९ वर्षांसाठी १९२ मालमत्ता २५ ते ७० वर्षांसाठी, तर चार मालमत्ता १० वर्षांसाठी एक रुपया भाडय़ाने भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. पालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांचा भाडेकरू तसेच विविध संस्थांना अधिक फायदा होत आहे. मात्र पालिकेला त्यातून उत्पन्न मिळत नाही. आता या मालमत्तांवर पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव पालिकेकडे सादर करण्यात येत आहे. या मालमत्तांवरील पुनर्विकासाच्या प्रस्तावांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने महापालिकेने या संदर्भात आता मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
पालिकेने भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांचा कालावधी विचारात घेऊन सदर ठिकाणच्या पुनर्विकासासाठी त्यांच्याकडून वसूल करण्यात येणारा दर मार्गदर्शक तत्त्वांमध्ये निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार आता भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांवर विकास करताना बाजारभावाने शुल्क वसूल करण्यात येणार आहे. नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ९९ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या मालमत्तांवरील बांधकामांसाठी १०० टक्के, तर व्यापारी तत्त्वावर दिलेल्या मालमत्तांवरील बांधकामांसाठी २०० टक्के दर आकारण्यात येणार आहेत. तसेच ३० वर्षांसाठी दिलेल्या निवासी मालमत्तांसाठी ५० टक्के, तर व्यापारी मालमत्तांसाठी १०० टक्के दर आकारण्यात येणार आहेत.
या मालमत्तांवर पुनर्विकास करताना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविण्यापूर्वी २५ टक्के रक्कम पालिकेला देणे बंधनकारक राहणार आहे. उर्वरित ७५ टक्के रक्कम तीन वर्षांच्या आत द्यावी लागेल. ही रक्कम नियोजित वेळेत न भरल्यास त्यावर १८ टक्के व्याज आकारण्यात येणार आहे.

Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा