DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

मेकओव्हर : खोल्यांच्या प्राथमिक गरजा

alt
घर छोटं असो किंवा मोठं, तिथल्या प्रत्येक खोलीच्या काही प्राथमिक गरजा असतात. त्यांची पूर्तता करून प्रत्येक खोलीची अर्थपूर्ण रचना कशी करता येईल, हे प्राधान्याने लक्षात घ्यायला हवं. खोलीच्या प्राथमिक गरजा म्हणजे नेमकं काय, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थात हे करताना किंवा घरातली कुठलीही खोली सजवताना तिचं आकारमान आणि तिथल्या गरजांची नीट सांगड घालता आली पाहिजे. दिवाणखाना अर्थात लिव्हिंग रूम- दिवाणखाना हा प्रत्येक घराचा आरसा असतो. कारण घरातल्या व्यक्तींची अभिरुची, कलात्मक नजर, जीवनशैली त्यातून व्यक्त होत असते. या खोलीची अंतर्गत सजावट करताना प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घ्यावी, की घरातल्या व्यक्तींप्रमाणेच बाहेरील व्यक्तींनाही या खोलीत पाऊल ठेवल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे. 

दिवाणखाना म्हणजे घरातल्या व्यक्तींनी एकत्र बसून टीव्ही बघणे, पाहुण्यांचं स्वागत, गप्पाटप्पा यासाठीची जागा आहे. त्यामुळे इथे वस्तूंची, फíनचरची गर्दी नको, अडगळीच्या वस्तू तर नकोच नको. स्टोअरेज असलं तरी त्याचा अतिरेक असता कामा नये. दिवाणखान्यात दोन प्रकारच्या बठकीची रचना करता येते. १) फॉर्मल सीटिंग, २) इनफॉर्मल सीटिंग. फॉर्मल सीटिंगमध्ये थ्री सीटर सोफा, टू सीटर सोफा, एल शेप सोफा सीटिंग, सिंगल सोफा अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोफा सेट, डायिनग टेबलचा समावेश होतो. 

फॉर्मल सीटिंगला एक प्रकारचा वेस्टर्न लूक असतो, आणि इनफॉर्मलमध्ये दिवाण, भारतीय बठक, आरामखुर्ची, झोपाळा यांचा अंतर्भाव असतो. वेगळी फॅमिली रूम असेल तर त्या ठिकाणी अशी इनफॉर्मल रचना जास्त सयुक्तिक ठरते. कधी कधी गरजेनुसार फॉर्मल आणि इनफॉर्मल सीटिंगचं फ्युजन करूनही छान बैठकीची व्यवस्था करता येते.  

या खोलीत नैसíगक प्रकाश भरपूर प्रमाणात असावा. रंगसंगतीमध्ये िभतीचे रंग, फíनचरचा रंग, टेश्चर, पडदे, कुशन्स यांचे रंग या सगळ्यांच्या रंगांचा ताळमेळ असावा. जेणेकरून दिवाणखान्यातली रंगसंगती परिपूर्ण दिसेल. पण हे करताना खोलीचं आकारमान, तिथला नसíगक प्रकाश इ. गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

या प्राथमिक गरजांचा विचार झाल्यावर मग इथे म्युझिक सिस्टम, बुक शेल्फ, इतर शोभेच्या वस्तू हव्या असतील तर त्यांची मांडणी कशा प्रकारे करता येईल याचा विचार होतो.

स्वयंपाकघर: घरातली ही खोलीसुद्धा अतिशय महत्त्वाची असून ती नीटनेटकी, आकर्षक व सुटसुटीत असणं गरजेचं असतं. या खोलीची प्राथमिक गरज म्हणजे गॅस, फ्रीज व सिंक यांची रचना. यांचा प्रथम विचार करणं आवश्यक आहे. पाणी, गॅस आणि इलेक्ट्रिक उपकरणं यांची योजना करताना काळजी घेण्यात यावी. स्टोअरेजशिवाय किचनला पूर्णत्व नाही. भांडय़ांची जागा, धान्यांची जागा या निश्चित कराव्या लागतात. धान्याच्या वस्तूंचं स्टोअरेज हे पाण्याच्या जागी किंवा ओलावा असेल अशा ठिकाणी असू नये. 

स्वयंपाकघराचं प्लॅिनग करताना तिथला वावर अधिक सोयीचा कसा होईल, हे लक्षात घ्यायला हवं. कारण इथे काम करणाऱ्या स्त्रीच्या श्रमाची, वेळेची बचत झाली पाहिजे. गॅस, इलेक्ट्रिकल पॉइंट्स, मायक्रोवेव्ह, मिक्सी, धारदार वस्तू (सुऱ्या, विळी इ.) मुलांच्या हाताला सापडणार नाहीत, अशा पद्धतीने मांडणी केलेली असावी. आज मॉडय़ुलर किचनची खूपच चलती आहे. असं किचन खूप सोयीचंही असतं. याच्या बास्केट्स स्टेनलेस स्टीलच्या असून त्यावर क्रोम व इलेक्ट्रो अशा दोन प्रकारच्या कोटिंग्स करता येतात. पूर्वी प्लॅस्टिक कोटेड करून मिळायचं. मॉडय़ुलर किचन हे सोयीचं आहे. ठरावीक काळानंतर सíव्हसिंग करून घेतलं तर त्याचा टिकाऊपणा निश्चितच वाढतो. 

बेडरूम: या खोलीची सजावट करताना ती खोली कोणाची आहे म्हणजे, तरुण जोडप्याची , मध्यमवयीन जोडप्याची की वयस्कर जोडप्याची आहे, ते बघून बेडरूमची सजावट केली जाते. या ठिकाणी आराम करणं अभिप्रेत आहे. शक्यतो बेड दरवाजासमोर येणार नाही, याची काळजी घ्यावी. बेडच्या बरोबरीने वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल, स्टडी टेबल या गोष्टींची योजनाही अभिप्रेत असते. इथली रंगसंगती आणि प्रकाशयोजना ही प्रसन्न, आल्हाददायक, उत्साही असली पाहिजे. तरुण जोडप्यासाठी बेडरूम डिझाइन करताना डीम लाईट्सची रचना हटकून केली जाते. बेडरूम आकाराने मोठी असेल तर कॉफी टेबल, छोटी सीटिंग या गोष्टीही करता येतात. इथे गॅलरी मिळत असेल व ती मोठी असेल तर  तिथे कॉफी टेबलची रचना करता येते. तसंच छोटी बाग, झोपाळा हे पर्यायही निवडता येतात. 

बाथरूम: एरवी ही जागा सगळ्यात दुर्लक्षित असते. मात्र आमच्या दृष्टीने इतर खोल्यांप्रमाणेच ही जागाही तितकीच महत्त्वपूर्ण व आकर्षकरीत्या सजवणं गरजेचं असतं. या जागेत शॉवर, टॉयलेट, गीझर, थंड पाणी आणि गरम पाणी यांच्या पाइप लाइन्स, सांडपाण्याचा योग्य निचरा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथली रंगसंगतीसुद्धा तितकीच महत्त्वाची असून टाईल्सचे रंग, डिझाइन इथल्या आकारमानानुसार ठरवाव्या लागतात. 

अशा प्रकारे घरातील प्रत्येक खोल्यांच्या गरजांची तिथल्या व्यक्तींच्या गरजा, अपेक्षांबरोबर योग्य ती सांगड घालून रचना केली जाते. अशी रचना ही जास्त नियोजनबद्ध, अर्थपूर्ण व नेत्रसुखद दिसते.  


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा