DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

वन रुम किचनचे विश्व साकारताना


alt
दिवसेंदिवस घराच्या किमती जसजशा गगनास भिडत आहेत, तसतसं मोठं घर घेणं मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे. म्हणूनच ‘सगळे पिकते, पण जागा पिकत नाही’, ही म्हण आज प्रकर्षांने जाणवते. प्रत्येक चौरस फुटाला काही हजार रुपये मोजल्यावर एक चौरस इंचही जागा फुकट घालवणे जड जाते.जेव्हा आम्ही वन रूम किचन डिझाइन करतो; तेव्हा आमच्या डोक्यात ‘मिनिमम फíनचर विथ मॅक्झिमम स्पेस’ हीच संकल्पना असते. याचाच अर्थ जास्तीत जास्त मोकळी जागा मिळवण्यासाठी कमीत कमी फíनचर वापरणे योग्य. सगळ्याच ग्राहकांच्या अपेक्षा असतात की, त्यांच्या पूर्ण गरजा भागवून जास्तीत जास्त मोकळी जागा मिळाली पाहिजे. मुळातच जागेचे क्षेत्रफळ २५० ते ३५० चौरस फूट असते. त्यात टॉयलेट, बाथरूम व पॅसेजमध्ये साधारण ६० ते ७० चौ. फूट जागा जाते. उरलेल्या जागेत सगळे फíनचर बसवायचे म्हणजे एक आव्हान असते.

वन रूम किचन डिझाइन करताना बठकीची खोली हीच तुमची बेडरूम असते. दोन्ही खोल्यांच्या फíनचरच्या व्याख्या वेगवेगळ्या असल्या तरी त्याचे सफाईदारपणे मिश्रण करणे व सगळ्या गरजा भागवून मोठय़ा जागेचा फील आणणे, हाच महत्त्वाचा उद्देश असतो. आपण आता स्पेस सेिव्हग फíनचरचा उपयोग कसा करता येईल ते पाहू .

सर्वप्रथम न लागणाऱ्या अनावश्यक वस्तू काढून टाकणे. त्याचप्रमाणे आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंची यादी करून त्यांची मापं घेऊन ठेवणे. आता आपण लििव्हग रूम कम बेडरूमचा विचार करू. लििव्हग रूममध्ये कमीत कमी तीन ते चार प्रकारांत फíनचर मोडते. ते म्हणजे सीटिंग, टी.व्ही. युनिट, शू रॅक व चौथे म्हणजे डायिनग टेबल. बैठकीसाठी कधीही मोठमोठे सोफा सेट निवडू नयेत. छोटे सोफा सेट निवडले तर जागा कमी व्यापली जाते व सुटसुटीतपणा येतो. सोफा कम बेड हा वन रूम किचनसाठी पर्याय असतोच. जर लििव्हग रूम लहान असेल तर भारतीय बठकीचा पर्यायही उत्तम ठरू शकतो. एकावर एक गाद्या ठेवण्याऐवजी कमी उंचीचे दिवाणही आपण भारतीय बैठक म्हणून वापरू शकतो. या दिवाणांमध्ये ड्रॉवर करून बऱ्याचशा गोष्टी त्यात ठेवू शकतो. तसेच बेड म्हणूनही त्याचा वापर करू शकतो. या दिवाणांवरील मॅटेसेसना वेगवेगळ्या बेडशीट्स वापरून रोज नवा लूक देता येतो. आपल्या इंटिरियर डिझायनरला सांगून जागेच्या लेआऊटप्रमाणे सरळ, ‘एल’ किंवा ‘सी’ आकाराची भारतीय बैठक करून घेऊ शकता. कॉर्नर्समध्ये ग्लास टॉप किंवा वुडन टेबल्स, तसेच कमी उंचीचे सेंटर टेबल त्या सीटिंग बरोबर ठेवल्यास खूप छान असा परिपूर्ण बैठक आकाराला ेयेते. हे सीटिंग कमी उंचीचे असल्याने रूम भरलेली वाटत नाही. सोफ्याच्या तुलनेत हे खूप सुटसुटीत दिसते. मध्यभागी टेबलचा विचार करतानाही एकात एक जाणारी किंवा वेगवेगळ्या लेव्हल्सवर स्लाइिडग टेज करून त्याचा वापर अनेक गोष्टींसाठी करता येतो. त्याचप्रमाणे कमीत कमी जागा व्यापली जाते. लििव्हग रूममधील दुसरा फíनचरचा प्रकार म्हणजे टी.व्ही. युनिट. काही वर्षांपासून प्रचलित असलेल्या शोकेस हा प्रकार बाद झालेला आहे. पूर्वी पूर्ण िभत व्यापणारे टी.व्ही. युनिट असायचे; परंतु आता केवळ टी.व्ही.साठी एक छोटेसे युनिट बनविले जाते व बाकीच्या अनावश्यक गोष्टींना कात्री लावली जाते. टी.व्ही. युनिटची लांबी साधारणपणे ४ फूट, उंची दीड ते २ फूट व रुंदी टी.व्ही. युनिटच्या प्रकारावर अवलंबून असते. म्हणजेच साधारण टी.व्ही. असेल तर तो मावेल एवढी रुंदी ठेवावी लागते व एल.सी.डी. किंवा प्लाझ्मा टी.व्ही. असेल तर केवळ सव्वा ते दीड फूट रुंदी असते. ही रुंदी आपण डी.व्ही.डी. प्लेयर, सेट टॉप बॉक्स व होम थिएटर या गोष्टींच्या आकारावर अवलंबून असते. या सगळ्या गोष्टींची तंतोतंत मापे घेऊन आपला इंटिरियर डिझायनर हे युनिट डिझाइन करून देतो. हे युनिट जमिनीला लागू न देता स्कìटग लेव्हलपासून वर ठेवावे, जेणेकरून ती जागा सुटसुटीत दिसेल व साफसफाई करणेही सोपे जाईल.

पुढील प्रकार म्हणजे शू-रॅक. शू-रॅकची जागा ही शक्यतो मुख्य दरवाजाच्या जवळ आसावी. मुख्य दरवाजा उघडल्यावर जागा असल्यास मागच्या भिंतीवर शू-रॅक बसवू शकता. हल्ली सात इंच रुंदीत बसणारे फोल्डिंग शू-रॅकही उपलब्ध आहेत. त्याच्या आतले शेल्फ हे अ‍ॅडजेस्टेबल असावे. जेणेकरून बुटांच्या, चपलांच्या आकारानुसार ते वर खाली करता येतात. वन रूम किचनमध्ये वॉर्डरोब (कपाट) हे बठकीच्या खोलीत किंवा पॅसेज असल्यास पॅसेजमध्ये डिझाइन करू शकता. साधारण वॉर्डरोबची रुंदी दोन ते सव्वा दोन फूट ठेवण्याऐवजी पावणेदोन फूट केली तरी चालू शकते. आपल्या गरजेनुसार वॉर्डरोब डिझाइन करून घ्यावा व जागेचा पूर्णत: वापर करावा. पुरुषांच्या व स्त्रियांच्या वॉर्डरोबच्या कल्पना व गरजा खूप वेगवेगळ्या असतात. म्हणून सरसकट अंतर्गत सजावट करणे टाळावे. आपल्या आवडीनिवडी व गरजांप्रमाणे इंटिरियर डिझायनरकडून त्याचे डिझाइन करून घ्यावे. ड्रेसिंगकरिता वेगळे युनिट न करता वॉर्डरोबच्या दरवाजावर आतल्या बाजूस आरसा लावून घेऊ शकता. वॉर्डरोबच्या वरच्या बाजूस स्टोरेज करून (डेड स्टोरेज) मोठय़ा बॅगा, सूटकेसेस ठेवू शकता. तसेच खालच्या बाजूस शूजसाठी ६ ते ७ इंच उंचीचे स्लाइिडग ड्रॉवर करता येईल. अभ्यासाकरीता किंवा लिहिण्याकरीता पूर्ण फिक्सड टेबल करण्यापेक्षा फोल्डिंग टेबल हा उत्तम पर्याय आहे. डायनिंग टेबल िभतीवरती फोल्डिंग होऊ शकते. त्याचप्रमाणे नऊ इंच ते एक फूट रुंदीचे ेक्रॉकरी युनिट डिझाइन करून त्याच्यावरही फोल्डिंग डायिनग टेबल करू शकतो. या युनिटमध्ये लागणारी क्रॉकरी तसेच काचेच्या शेल्फ लावून त्यात जॅम, सॉस, लोणचे इत्यादी बाटल्यांसह काटे, चमचेही ठेवता येतात. विशेष म्हणजे हे डायिनग टेबल वापरत नसताना कोणालाही सहजासहजी कळणार नाही की हे एक फोल्डेबल डायिनग टेबल आहे. जागे अभावी अशा प्रकारच्या युनिटला बठकीच्या व किचनच्या मधल्या सामायिक भिंतीवर घेऊ शकता. किंवा ती भिंत काढून त्या ठिकाणी असे मल्टिपर्पज स्टोरेज करू शकता. परंतु हे केवळ सिव्हिल इंजिनीअरच्या सल्ल्याने तसेच सोसायटीच्या परवानगीनेच करावे.

घरातील पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे किचन. गृहिणीच्या गरजेनुसार, सूचनेनुसार ते डिझाइन करावे. किचन प्लॅटफॉर्मवरील ओव्हरहेड स्टोरेजची उंची खिडकीच्या उंचीपर्यंत मर्यादित ठेवावी. ते चांगले दिसेल व मोकळेही वाटेल. स्टोरेजचा अतिरेक झाला की रूम खूप लहान व कोंदट वाटेल. डब्यांच्या तसेच भांडय़ांच्या मापानुसार प्लॅटफॉर्मच्या खालील स्टेनलेस स्टीलचे ड्रॉवर्स डिझाइन करावेत. या ड्रॉवर्समध्येही अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे किचनमधील इतर उपकरणांची- उदा. मिक्सर, ज्युसर, मायक्रोवेव्ह इत्यादींची यादी करून त्यांची जागा आधीच निश्चित करून त्यानुसार इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, बोर्डस करून घ्यावेत.

हे सर्व करताना रंगाच्या शेड्सही काळजीपूर्वक वापराव्यात. शक्यतो शीत रंग, लायटर शेड्स वापरावे जेणेकरून घर प्रकाशमय वाटेल. पडदे निवडताना शेअर कर्टन्सचा पर्याय हा वन रूम किचनसाठी उत्तम ठरू शकतो. शक्य झाल्यास मोकळ्या िभतीवर मिरर पॅनिलग केल्यानेही खोलीचे आकारमान मोठे दिसण्यास मदत होते.

याचप्रमाणे आपला कुशल इंटिरियर डिझायनर आपणास अनेक गोष्टी सुचवू शकतो. या गोष्टींचा आपण आपल्या डिझाइनमध्ये तंतोतंत वापर केला तर आपले छोटे घर नक्कीच प्रशस्त व मनमोहक दिसेल, यात शंकाच नाही.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा