![alt](http://loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20120218/vas01.jpg)
प्रत्येक राशीचं स्वत:चं असं खास वैशिष्टय़ मानलं गेलं आहे. त्या- त्या राशीची माणसं त्या- त्या राशीची स्वभाववैशिष्टय़ं घेऊन येतात, असा समज जगभर प्रचलित आहे. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या नेहमीच्या व्यवहारात दिसून येतं. घरसजावटीतूनही ते कोणत्या राशीच्या माणसाचं घर आहे, हे प्रतीत होतं. या पाश्र्वभूमीवर बारा राशींच्या माणसांची घरं कशी असतील, हे पाहणं गंमतीशीर ठरेल.
आपलं घर इतरांच्या तुलनेत जरा जास्तच हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. मग गृहसजावट करताना त्या-त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची आवडनिवड, स्वभाव वैशिष्टय़ं यांचं प्रतिबिंब त्यात पडतं. प्रत्येक राशीची स्वत:ची अशी वैशिष्टय़ं असतात. ती गृहसजावटीतही कशी उतरतात ते पाहू.
मेष : मेष राशीच्या माणसांच्या घरात अनेकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं. मेष राशीच्या व्यक्ती या अत्यंत धडाडीच्या आणि कार्यक्षम असतात, परिणामी त्या फारच कमी वेळ घरी असतात. म्हणूनच त्यांना घर हे राहण्यापेक्षाही स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगणारं असावं, असं त्यांना वाटत असतं. आखीवरेखीव घररचना, लख्ख आणि विविध प्रकाशयोजनांचा वापर आणि आटोपशीर सामान असं सुबक घर असतं. त्यांना वेगळं आणि सहज रचना बदलता यईल किंवा हलवता येणारं फíनचर आवडतं. सतत उत्साही मेष राशीला घरातील फíनचरमध्ये फेरफार करायचीही फार आवड असते. मेष राशीला शक्यतो तेजस्वी आणि गडद रंगसंगती आवडते. विरोधात्मक रंगसंगती हे जणू त्यांच्या घराचं वैशिष्टच! जसे- काळा-पांढरा-लाल.
वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना रंगसंगतीपेक्षा नॅचरल लूक जास्त हवाहवासा वाटतो. आत्मविश्वासू असलेली वृषभ राशीची माणसं आरामदायी जीवनशैली आणि स्थर्याला पसंती देतात. त्यांच्या मते घर म्हणजे निवारा, जेथे त्यांना आपलेपणा वाटेल. वृषभ राशीची व्यक्ती फारच जाणीवपूर्वक आपल्या घरातील सजावटी व वस्तूंच्या दर्जाला महत्त्व देते. प्रेमळवृत्ती असलेल्या वृषभ राशीच्या माणसांचे घरातील सर्वात आवडते ठिकाण म्हणजे बेडरूम, जे अगदी रचनात्मक असते. जसे- मोठा बेड, भरपूर कुशन्स. त्यांना पेस्टल रंगातील फíनचर, आरामदायी खुच्र्या आणि लाकडाचे सोफे आवडतात. संगीत आणि कला यांतून प्रेरणा घेणारी वृषभ रास आहे. ते पुस्तक, गाण्यांचं कलेक्शन, विविध रोपटी, मेणबत्त्या आणि कलाकुसर असलेल्या अॅन्टिक वस्तूंनी घर सजवायला जास्त प्राधान्य देतात.
मिथुन : समजूतदार आणि समाजप्रिय अशी मिथुन राशीची माणसं! ज्यांना नेहमीच नवनवीन गृहसजावटीच्या कल्पना प्रशंसनीय वाटतात. वायू तत्त्व असलेली मिथुन रास ही हलक्या आणि सहज रचना बदलता येईल अशा फíनचरला पसंती देते. त्यांना वैविध्यपूर्ण प्रकाशयोजना आवडते. गडद पिवळा, कॉफी आणि तपकिरी हे मिथुन राशीचे आवडते रंग. स्वातंत्र्यप्रिय मिथुन राशीला वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्पस् (भिंतीवरील आणि
जमिनीवरील), मोठे, आकर्षक आणि विविध आकारांचे आरसे यांची त्यांना आवड असते.
कर्क : वास्तुप्रिय कर्क रास आपल्या घरात सहजता, सुरक्षितता आणि आराम या गोष्टींना प्राधान्य देते. कर्क राशीचे लोक आपल्या घराला स्वत:चा असा खास टच देणे पसंत करतात. ज्यात जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटो फ्रेम्सचा समावेश असतो. काहीशा आत्मकेंद्री कर्कला निळा, तपकिरी आणि चंदेरी छटा असलेल्या कापडाचे फíनचर आवडतं. तसेच त्यांचं स्वप्नातील घर हे नेहमी लाकडाच्या वस्तूंनी युक्त असतं. जसं- मोठं गोल टेबल आणि वूड किचन यांनी सजलेलं असतं. कर्क आपलं घर नेहमी गालिचे, जुन्या वस्तू, मेणबत्या आणि रोपांनी सजवतात.
सिंह : सौंदर्यदृष्टी असणारी सिंह ही रास. त्यांचं घर त्यांना आकर्षक आणि स्वागतार्ह असावं असंच वाटतं. सिंह राशीच्या घराची ओळख म्हणजे मोठे आरसे, अभिजात पेंटिंग्ज आणि स्फूर्तिदायी प्रकाशयोजना. सिंह राशीची माणसे आधुनिक आणि सहज सोपी सजावट पसंत करतात. त्यांच्या घरात सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग असतो. कलासक्त सिंह रास आपल्या घरातही कलेला तेवढेच प्राधान्य देते. त्यांना प्रखर अशा रंगसंगती आवडतात, जसे- सफेद, निळा, तपकिरी.
कन्या : कन्या रास नेहमी सुटसुटीतपणा आणि उपयुक्ततेला प्राधान्य देते. आधुनिक ट्रेंड्सपेक्षा पर्यावरणाशी जुळणाऱ्या वस्तूंना ते प्राधान्य देतात. त्यांना घर सजावटीत विविध मिश्र गोष्टी करून बघायला आवडतात. जसे- लाकूड, दगड, संगमरवर. त्यांना सरळ रेषा आणि भौमितिक प्रकारचे लाकडी आणि स्टोन फíनचर आवडते. करडा, गडद निळा, हिरवा आणि उबदार अशा क्रीम आणि कॉफी कलरचा समावेश त्यांना घरसजावटीत आवडतो. फिरण्याची आवड असणाऱ्या कन्या राशीला विविध ठिकाणांहून आणलेल्या हस्तकलेच्या वस्तू, चित्रे आणि शोभेच्या वस्तूंनी आपले घर सजवायला आवडते.
तूळ : शांत आणि संयमित गृहसजावट ही तूळ राशीची खासियत. त्यांना ऐसपैस, मोठी, स्वच्छ अशी घरे आवडतात. आटोपशीर फíनचर म्हणजे तूळ राशीचे घर. फíनचर निवडताना ते आखीव आणि गोल आकाराच्या फíनचरला पसंती देतात. उबदार असे पेस्टल शेड्स त्यांना आवडतात. तूळ राशीचे आवडते रंग म्हणजे जांभळा, गडद निळा, जे डोळ्यांनाही सुखद वाटतात. तूळ रास ही प्रेमळ वृत्तीची असल्याने प्रखर प्रकाशयोजनेला पसंती नसते. तसंच त्यांना फुलांनी आणि जलरंग, लॅंडस्केप यांनी घर सजवायला फार आवडते.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या माणसांना आपल्या घरातूनच भावनात्मक आधार मिळत असतो. तसंच जगापासून दूर असा स्वत:चा असा कोपरा असलेला त्यांना आवडतो. वृश्चिक नेहमी प्रखर आणि गडद रंगसंगती, जसे-काळा आणि पांढरा रंगं यांना पसंती देतात. त्यांना कमीतकमी फíनचर आवडते; जे घरात कमीतकमी जागा व्यापेल. या राशीच्या व्यक्ती गूढ व आत्मकेंद्री प्रवृत्तीच्या असतात. त्यामुळे त्यांना सौम्य प्रकाशयोजना आवडते. तसेच त्यांना घरात चामडय़ाच्या आणि लोखंडाच्या वस्तू ठेवणं आवडतात.
धनू : धाडसी धनुर्धारी धनू नेहमी हटके गृहसजावटीची निवड करते. या राशीच्या व्यक्ती नेहमी नवनवीन आणि आकर्षक गोष्टी पसंत करतात. व्यक्तिस्वातंत्र्यप्रिय आणि चंचल असलेले धनू राशीचे लोक नेहमीच लगेचच बदलता येईल अशा गृहसजावटीला पसंती देतात. उपयोग आणि सुलभता यावर त्यांचा भर असतो. म्हणूच त्यांना साधे, पण ओरिजिनल डिझाइन फíनचर आवडते. त्यांना आकाशी, निळा, हिरवा, नारंगी रंग आवडतात. घरातील पडदे आणि अन्य गोष्टी त्यांना फिकट रंगाचेच आवडतात. धनू राशीला पुस्तकाचा कोपरा हवाच! शोभेच्या वस्तू आणि संगीतसंग्रह करायलाही त्यांना आवाडते.
मकर : ही सर्वात जास्त आत्मकेंद्री रास आहे. म्हणून त्यांची गृहसजावट त्यांचं समाजातील स्थानावर भर देणारी असते. मकर राशीचा ओढा हा पारंपरिक सजावटीचे फíनचर आणि रंगाकडे असतो. जसे- लाल, काळा, पांढरा, क्रीम आणि कॉफी. त्यांना लाकूड, संगमरवर व चामडय़ाच्या वस्तू यांची आवड असते. वाचनप्रेमी मकर राशीच्या माणसांच्या घरात ग्रंथालय हे हवेच! आपल्या घरात त्यांना विविध वस्तूंचा संग्रह करायला आवडतो.
कुंभ : कुंभ राशीला नवीन आणि हटके सजावटीची आवड असते. या हटके आवडीचा जोर अनेकदा प्रकाशयोजनेवर दिसून येतो. त्यांचं घर हे त्यांना नेहमीच इतरांपेक्षा वेगळं आणि स्वत:चं असं आवडतं. त्यांना बहुउपयोगी, नवीन आणि अनोखं फíनचर आवडतं, जे त्यांचं स्वातंत्र्यप्रिय व्यक्तिमत्त्व प्रतििबबित करतं. सजावटीत ते ग्लॉसी आणि लोखंडाच्या वस्तूंना पसंती देतात.
मीन : काल्पनिक जगात रमणारी मीन रास. आरामदायी आणि सुबक सजावटीला मीन राशीचं माणसं पसंती देतात. त्यांच्या कल्पनातीत जगात पूर्ण ब्रम्हांड म्हणजे त्यांचंच घर! ज्यात फक्त त्यांचेच नियम आणि कायदे असतात. त्यांना फिकट जांभळा, निळा, हिरवा आणि करडा असे रंग आवडतात. प्रकाशरचना सौम्य लागते. मीन राशीला नेहमी साधेसरळ, पण मोहक फíनचर आवडते. ज्यात गोलाकार वस्तू. मऊ गालिचे, भरपूर पडदे आणि उशांचा समावेश असतो. मीन राशीची व्यक्ती आपले घर नेहमी उत्साहात सजवते आणि त्यामुळे त्यांचे घर सामानाने भरलेले असते.
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा