![alt](http://loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20120211/va03.jpg)
आपलं एक स्वत:चं असं हक्काचं घर असावं, जिथून आपल्याला कोणी जा म्हणणार नाही, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण माणूस हा स्वप्न बघणारा प्राणी आहे; आणि म्हणूनच एक स्वप्न पूर्ण झालं की, माणूस दुसरं स्वप्न बघू लागतो. अर्थातच घर घेतलं की, ते इतरांसारखंच किंवा काकणभर अधिकच सुंदर असावं, असं वाटणंही स्वाभाविक असतं. म्हणूनच नवीन घर घेतल्यावर माणसं त्या घराचं नूतनीकरण हाती घेतात. तसंच नियोजनाच्या बाबतीत सुसूत्रता असणारे आणि त्याकरताच ठरावीक वर्षांनंतर नित्यनेमानं घराच्या नूतनीकरणाचं काम घेणारे चांगले नियोजकही असतात. आपलं घर सुंदर दिसावं, यासाठी आपण जितके दक्ष असतो, तितक्याच दक्षतेने आपलं घर ज्या वास्तूत किंवा इमारतीत आहे, तिचीही काळजी घेणं, तिची देखभाल करणं हेही आवश्यक असतं.
माणसाच्या आयुष्याला जशी मर्यादा असते, तशीच मर्यादा इमारतींच्याही आयुष्याला असते. इमारतीच्या आयुष्यासंदर्भात ‘इकॉनॉमिकल लाइफ’ अशी संज्ञा वापरली जाते. या संज्ञेचा नेमका अर्थ समजून घ्यायचा तर असं म्हणता येईल की, एखादी इमारत जुनी झाल्यावर तिच्यावर होणारा खर्च, जेव्हा तिच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा किंवा फायद्यापेक्षा अधिक व्हायला लागतो; तेव्हा तिचं ‘इकॉनॉमिकल लाइफ’ संपलं असं मानायला हरकत नाही. म्हातारपण माणसाचं असो वा इमारतीचं, म्हातारपण म्हटलं की आरोग्यविषयक कुरबुरी आल्या आणि कालांतरानं ओढवणारा मृत्यूही आला. परंतु एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढवतो तेव्हा फक्त ती व्यक्तीच मरण पावते. पण इमारत कोसळली की मात्र त्या इमारतीत वावरणाऱ्या अनेक व्यक्ती आपले प्राण गमावू शकतात. त्यामुळे कुठलीही इमारत कोसळेपर्यंत न थांबता, वेळीच तिची आवश्यक ती मोठी दुरूस्ती अगर पुनर्बाधणी करून घेणं गरजेचं असतं. इमारतीच्या बांधकामापासूनच तिची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी जशी इमारत बांधणारा बिल्डर, कंत्राटदार, आíकटेक्ट अगर सिव्हिल इंजिनीअर यांची असते, तशीच तिचा वापर करायला लागल्यावर आपल्या सर्वाचीही ती तितकीच जबाबदारी असते. यासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगचं सखोल ज्ञान असण्याची गरज नाही. परंतु इमारतीच्या संदर्भातली काही जुजबी, प्राथमिक परंतु महत्त्वाची माहिती आपण करून घेतली, तर आपल्या इमारतीची आणि पर्यायाने आपल्या घराची काळजी घेणं आपल्याला शक्य होईल.
आपलं घर सुंदर दिसावं असं कोणाला वाटणार नाही? परंतु घराचं सौंदर्य वाढवताना आपण त्याच्या सुरक्षिततेबरोबर किंवा एकूणच इमारतीच्या आयुष्याबरोबर तर खेळत नाही ना, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे, नाहीतर काही वर्षांपूर्वी मुंबईत बोरिवली इथं लक्ष्मीछाया इमारत कोसळून जसं मोठं नुकसान झालं होतं, तसं व्हायची शक्यता असते. पाण्यामुळे माणसांना जसे आजार होतात, तसे इमारतींना होतात का, ते कुठले आणि त्यावर उपाय काय, भूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये इमारतींना कुठला धोका संभवतो, भूकंपाच्या वेळी या इमारतींखालच्या जमिनीत नेमकं काय घडत असतं, आपल्या राज्यातली भूकंपप्रवण क्षेत्रं कुठली हे जाणूान घेणंही महत्त्वाचं आहे.
त्याबरोबरच आपण कंत्राटदाराकडून फसवले जाऊ नये, यासाठी या कामासंदर्भातली जुजबी प्राथमिक माहिती आपल्यापकी प्रत्येकाला असणं गरजेचं असतं. त्यासाठी घराच्या नूतनीकरणाचं किंवा दुरुस्तीचं काम हाती घेताना नेमकी कोणती काळजी घेणं आवश्यक असतं, कंत्राटदाराला कंत्राट देताना कोणत्या प्रकारे देता येईल, मूलभूत बांधकाम साहित्याच्या दर्जाविषयी कशी खात्री करून घ्यायची, स्वयंपाकाचा ओटा घालताना, फ्लोअिरगच्या लाद्या घालताना, घराचं रंगकाम करून घेताना कोणती मूलभूत तांत्रिक माहिती आपल्याला असायला हवी. सध्या पुनर्वकिासाची कामंही जोरात सुरू असतात. अशा वेळी नवी इमारत बांधली जात असताना संपूर्ण इमारतीचा भार तोलून धरणाऱ्या इमारतीच्या पायासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, जुन्या घरांमध्ये अनेकदा बीम, कॉलमवर तडे गेलेले आढळतात. या तडय़ांच्या किंवा भेगांच्या माध्यमातून इमारतीच्या आरोग्याची आपल्याला कल्पना कशी येऊ शकते, ही माहिती असणे आवश्यक आहे.
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा