DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

गृहहिताय : निवासी इमारतींसाठी आगीचा विमा


alt
नुकतीच वरळीतील एका निवासी इमारतीमध्ये आग लागली. या घटनेत नुकसान विशेष झाले नसले तरी अशा प्रकारच्या घटना हाताबाहेर गेल्यास मोठी हानी संभवते. अशा प्रकारच्या घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य असले, तरी सुजाणपणे विमा घेतल्यास होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकते. असाच एक विम्याचा प्रकार ज्यावर योग्य विचार करण्याची गरज आहे, तो म्हणजे आगीचा विमा. आगीच्या विम्याविषयीची तथ्ये

आगीचा विमा इमारतींना आणि आतील वस्तूंना संरक्षण पुरवतो. इमारतीमध्ये केवळ बांधकामाचा समावेश होत नसून कायमस्वरूपी बसवलेल्या वस्तू, सॅनिटरी फिटिंग आणि इतर स्थायी फिटिंगचासुद्धा त्यात समावेश होतो.
 
त्याचप्रमाणे गॅरेज, आच्छादित पोर्चचा भाग, कॅनोपी आणि अगदी सीमेच्या िभतींचासुद्धा आगसंरक्षण पॉलिसीमध्ये अंतर्भाव होऊ शकतो. शिवाय, त्यात खाजगी रस्ते, तरण तलाव आणि इमारतीचा पाया या गोष्टीही येऊ शकतात. इमारतीच्या पायाला आगीचा धोका नसला तरी भूकंपामुळे त्याला हानी पोहोचू शकते. मात्र, या सर्व मालमत्ता विमा संरक्षण घेताना स्पष्टपणे नमूद केल्या गेल्या पाहिजेत. 

आगीचा विमा
* हा विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील वैयक्तिक स्वरूपाचा करार आहे. म्हणजेच मालमत्तेची विक्री वा अन्य कारणांसाठी, वारसाहक्काचा अपवाद वगळून पॉलिसी इतर व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित करता येत नाही.

* विशिष्ट मालमत्तेसाठीच ती लागू आहे. मालमत्ता जर त्या ठिकाणावरून हलवली तर त्यावर पॉलिसीचे संरक्षण मिळणार नाही. 

* ही अजूनही नियंत्रणाखाली असलेल्या पॉलिसींपकी एक असल्याने, देऊ करण्यात येणारे संरक्षण आणि पॉलिसीचा मसुदा देशभरात मूलत: सारखाच असतो. 

आगीच्या विम्याखाली संरक्षण पुरवण्यात येणारी जोखीम - निवासी इमारतींसाठी देण्यात येणाऱ्या आगीच्या बहुतेक विमा पॉलिसींमध्ये खालील गोष्टींमुळे होणाऱ्या नुकसानाला संरक्षण देण्यात येते. 
०    आग
०    आकाशातील वीज पडून होणारे नुकसान
०    विस्फोट / इमारत कोसळणे
०    विमानाद्वारे नुकसान
०    दंगल / संप / द्वेषहेतूने केले गेलेले नुकसान 
०    एसटीएफआय
०    धक्क्यामुळे नुकसान
०    इमारत / जमीन खचणे
०    टाक्यांचा स्फोट 
०    मिसाइल चाचणी
०    स्वयंचलित जल शिडकावा करणाऱ्या यंत्रणेतून गळती
०    झाडाझुडपांमुळे/ जंगताल लागलेली आग 

अनेक विमा कंपन्या मूळ आगीच्या विमा पॉलिसीवर अतिरिक्त फायदे देतात. असा अतिरिक्त फायदा (अ‍ॅड-ऑन) मूळ पॉलिसीमध्ये नसलेल्या जोखमीपासून संरक्षण देतो. वाढीव जोखमीचा धोका पत्करण्यासाठी अधिक हप्ता घेतला जाऊ शकतो. निवासी मालमत्तांसाठी खास शिफारस करण्यात येणारे काही ‘अ‍ॅड-ऑन’ खालीलप्रमाणे आहेत. 

१.    भूकंप
२.    जागेच्या भाडय़ाचे नुकसान-मालमत्ता मालकांसाठी.
३.    पर्यायी वसतिस्थानासाठी लागणारे भाडे-मालमत्तेत राहणाऱ्यांसाठी योग्य
४.    दहशतवाद
५.    स्थापत्यविशारद आणि सव्‍‌र्हेअर यांच्या फीची वाढीव सीमा आणि ढिगारा हलवण्याचा खर्च 

अगीचा विमा घेण्यापूर्वी विचारात घ्यावयाच्या मुख्य गोष्टी-
०    मालमत्तेचे मूल्यांकन आणि पुरेसे विमा संरक्षण
०    विमा रक्कम 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘विमा रक्कम’. मालमत्तेचा योग्य रकमेचा विमा काढणे महत्त्वाचे असते. जर काही नुकसान झाले तर आगीच्या  विमा पॉलिसीखाली विमा कंपनीने द्यावयाची कमाल रक्कम  किती असेल याची सीमा विमा रक्कम निर्देशित करते. मालमत्तेचे बाजारदराप्रमाणे मूल्य किंवा पुनíनर्माणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या आधारे येणारे मूल्य याच्याबरोबरीने विम्याची रक्कम असली पाहिजे.

बाजारदराप्रमाणे मूल्य (एमव्ही) विरूद्ध  पुनíनर्माणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या आधारे येणारे मूल्य (आरआयव्ही)
पुनíनर्माणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या आधारे येणारे मूल्य हे साध्या शब्दामध्ये ‘जुन्याच्या जागी नवीन’ दर्शविते. म्हणजे विम्याची रक्कम देताना घसारा किंवा वापराद्वारे कमी झालेले मूल्य वजा केले जात नाही. 

एमव्ही किंवा आरआयव्ही असा कोणताही पर्याय निवडला तरी हप्त्याचा दर बदलत नाही. तरीही मूल्य निर्देशित करणारी विम्याची रक्कम मूलत: वेगळी असते. अशा रीतीने विम्याची रक्कम म्हणून ‘एमव्ही’ असे घोषित करता येत नाही. आणि पॉलिसी आरआयव्ही आधारावर दिली जाते. कारण अशाबाबतीत ‘आवश्यकतेपेक्षा कमी विमा’ हे तत्त्व लागू केले जाते. निवडलेली विम्याची रक्कम पुरेशी आहे, याची खात्री करण्याची हीच वेळ असते. ‘आवश्यकतेपेक्षा कमी विमा’ही संज्ञा हे दर्शविते की, विमाधारकाने एमव्ही / आरआयव्हीपेक्षा कमी रकमेचा विमा घेतला असेल तर त्याला उर्वरित नुकसान सोसावे लागते.
उणे करण्यात येणाऱ्या गोष्टी 

लागू असणाऱ्या उणे करण्यात येणाऱ्या गोष्टी / अतिरिक्त याची नोंद घेण्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ही रक्कम विमाधारकासाठी महत्त्वाची असते. या रकमेपेक्षा कमी झालेले नुकसान विमा कंपनीकडून दिले जात नाही. आणि या रकमेपेक्षा अधिकच्या नुकसानाची उर्वरित रक्कम दिली जाते. किमान किती रक्कम उणे केली जाईल हे ठरलेले असले तरी जोखमीची एकंदरीत व्याप्ती विचारात घेऊन विमा कंपनी ही रक्कम वाढवू शकते.

दरपत्रक (कोटेशन) देण्यासाठी लागणारी माहिती-

जेव्हा तुम्ही आगीचा विमा घेण्यासाठी विमा कंपनीकडे जाता; तेव्हा ते दरपत्रक देण्यासाठी विनंती (आरएफक्यू-रिक्वेस्ट फॉर कोटेशन) हे प्रपत्र भरण्यास सांगतात. ज्यामध्ये कोटेशन देण्यासाठी आवश्यक तो तपशील द्यावा लागतो. सामान्यपणे विचारलेली माहिती खालीलप्रमाणे असते.
० जागेच्या वापराविषयी
० बांधकाम आणि इमारतीचे वय
०    बेसमेंट कोणत्या कारणासाठी वापरले जात आहे याविषयी माहिती
०    नुकसानाचा इतिहास
०    मागील विम्याचा तपशील
०    आग संरक्षण सुविधा
०    आसपासच्या परिसरातील पाणीसाठा आणि त्याचे अंतर
०    इतर कोणतेही खास वैशिष्टय़

पॉलिसी डॉक्युमेंट वाचण्याचे महत्त्व:
शेवटचे, पण महत्त्वाचे म्हणजे एकदा का तुम्ही पॉलिसी खरेदी केली की पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि खालील गोष्टीची शहानिशा केली पाहिजे.
१.    पॉलिसीमध्ये लिहिलेले नाव, पत्ता वगरे तपशील बरोबर आहे की नाही.
२.     कोणत्या संकटांसाठी पॉलिसीसंरक्षण मिळेल आणि ‘अ‍ॅड-ऑन’ गोष्टी.
३.    पॉलिसीखाली उणे करण्यात येणारी गोष्ट / अतिरिक्त
४.    पॉलिसीमध्ये नमूद केलेली खास वॉरंटी, बंधने किंवा वगळलेल्या गोष्टी 
५.    विमाधारकाने पॉलिसी काळात पाळावयाच्या शर्ती व अटी 
६.    दावा उत्पन्न झाल्यास दावा दाखल करण्याची पद्धत 
७.    विमा कंपनीने नमूद केलेल्या ‘कराव्यात’ आणि ‘करू नयेत’ अशा गोष्टी.

हे केले असता दावा दाखल करताना तुम्हाला आश्चर्याचा कोणताही धक्का बसणार नाही.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा