![alt](http://loksatta.com/images/stories/newlok/newweekly/20120204/vr02.jpg)
जागेचं नियोजन किंवा स्पेस प्लॅिनग हा इंटीरिअरमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किंबहुना या आराखडय़ावरच तुमच्या संपूर्ण घराचं सुनियोजन अवलंबून असतं. उपलब्ध जागेच्या नियोजनाचा आराखडा चोख असेल तर असं घर नुसतंच सुंदर दिसत नाही तर तिथला वावर अधिक सहज व सुकर होतो.
लेखात दिलेला मूळ आराखडा (एग्झििस्टग प्लॅन) बघितल्यावर लक्षात येईल की, हा वन बीएचके फ्लॅट आहे. या रॉ फ्लॅटच्या इंटीरिअरसाठी ग्राहकाला एकूण तीन आराखडे देण्यात आले. यातील पहिला आराखडा हा ग्राहकाला अपेक्षित असल्याप्रमाणे आखण्यात आला आहे. यामध्ये लििव्हग रूममध्ये प्रवेश केल्यावर डाव्या व उजव्या बाजूला बठकीची रचना केली आहे. समोर दिसणाऱ्या कोपऱ्याच्या जागेत डायिनग टेबलची रचना केली आहे.
स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी (बाहेरच्या बाजूला) उजव्या हाताला स्टोअरेज कम सíव्हस काऊंटर देण्यात आलेलं आहे. किचनमध्ये शिरल्यावर उजव्या हाताला वॉिशग मशीन, डाव्या हाताला फ्रीजची जागा असून किचनमध्ये समांतर असे दोन प्लॅटफॉर्म दिलेले आहेत. प्लॅटफॉर्मच्या खाली व वर स्टोअरेजसाठी जागा आहे. या आराखडय़ात इंडियन टॉयलेटऐवजी वेस्टर्न डब्ल्यूसी करून दिला आणि बाथरूममध्ये आणखी एक जास्तीचा वेस्टर्न डब्ल्यूसी दिला आहे. बेडरूममध्ये एक बेड, साइड टेबल, वॉर्डरोब, स्टडी टेबल या चार गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. पुढील दोन आराखडे हे शास्त्रोक्त पद्धतीने सजविले आहेत. ते समजून घेतल्यावर यातील वैविध्य लगेचच लक्षात येईल.
दुसऱ्या आराखडय़ात हॉलच्या इथली िभत तोडण्यात आली आहे आणि इथे दोन प्रवेश सूचविले आहेत. लििव्हग रूममध्ये प्रेवश केल्यावर समोर सीटिंग एरिया केला आहे आणि मध्यभागी पॅनलिंग. उजव्या हाताला डायिनग टेबल. कॉर्नरला टीव्ही युनिट आहे. इथे आणखी एक बदल करता येईल, तो म्हणजे टीव्ही युनिटच्या जागी क्रिएटिव्ह पॅनिलग करून समोरच्या िभतीवर फ्लॅटस्क्रीनसाठी रचना करता येईल.
डायिनग टेबलच्या इथून किचनमध्ये जाण्यासाठी मार्ग केलाय. इथे उजव्या हाताला मॉडय़ुलर स्टोअरेज दिलंय, तर त्याच्यासमोर वॉिशग मशीन आणि फ्रीजची जागा केली आहे. याच्या बाजूला सíव्हस काऊंटर दिलाय. दुसऱ्या बाजूला प्रवेश केल्यावर वॉश बेसीन देण्यात आलंय. मूळ आराखडय़ातील बाथरूमची जागा कमी करून टॉयलेटची जागा वाढवून ते बेडरूमला जोडून शॉवर एरिया केला आहे. या ठिकाणी बेसीनची सोयही केली आहे. बेडरूममध्ये बेडच्या बाजूला साइड टेबल, ड्रेसिंग टेबल तर समोरच्या बाजूला स्टोअरेज आणि स्टोअरेजच्या बाजूला स्टडी टेबल ठेवलेलं आहे.
आता आपण तिसऱ्या आराखडय़ाचा विचार करूया. यामध्ये लििव्हग रूमच्या इथली उजव्या बाजूची िभत संपूर्णत: तोडलेली आहे. मूळ आराखडा आणि पहिला आराखडा यामध्ये जी मधली जागा आहे ती तसं पाहिलं तर फारशी वापरात येत नव्हती. म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या आराखडय़ामध्ये त्या जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी िभत तोडण्यात आली. तिसऱ्या आराखडय़ामध्ये सगळी िभत तोडल्यामुळे हॉल मोठा, प्रशस्त दिसतोय. डाव्या बाजूला बैठकीसाठीची जागा तशीच ठेवली आहे. उजव्या बाजूला फ्लॅटस्क्रीनची जागा केली आहे. या आराखडय़ात कॉमन टॉयलेट हे किचनच्या बाजूला देण्यात आलं आहे. उजव्या हाताला वॉिशग मशीन, फ्रीज ठेवलाय तर त्याच्यासमोर अॅडिशनल प्लॅटफॉर्म करून तो चॉिपग-स्लायसिंगसाठी किंवा अन्य कारणांसाठी वापरता येईल. या इथेसुद्धा समांतर ओटे असून स्टोअरेजची रचना सारखीच आहे. बेडरूममध्ये बेड िभतीला लागून ठेवाला आहे व तिथे बाजूला स्टडी टेबल आहे. बेडच्या स्ोमोर वॉर्डरोब असून त्याच्या बाजूला क्रिएटिव्ह पॅनिलग केलंय. ही जागा अनेक कारणांसाठी वापरता येईल.
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा