DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

बुधवार, २९ फेब्रुवारी, २०१२

सुरक्षित घर : इमारतीचा बांधा आणि घराचं सौंदर्य


alt
आपण ज्या घरात राहतो, त्याच्याविषयी किमान इमारतीचे महत्त्वाचे भाग कशासाठी असतात, त्याचं कार्य काय असतं हे कळलं, त्यांची योग्य काळजी कशी घ्यायची हे कळलं तर त्या इमारतीचा योग्य वापर झाल्यामुळे तिचं आयुष्य काहीसं वाढू शकतं किंवा तिच्या दुरुस्तीवर होणारा खर्च कमी होऊ शकतो. तसंच घराचं नूतनीकरण करीत असताना नेमकी कोणती खबरदारी घ्यायची ते कळतं. तसंच काहीजण खोल्यांमध्ये बदल करून घेतात. तसे बदल करताना कोणत्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत, हे समजून घेण्यासाठी इमारतीच्या रचनेविषयीची प्राथमिक माहिती असणं गरजेचं असतं.

माणसाचं वर्णन करताना आपण ज्याप्रमाणे मध्यम बांधा किंवा सुदृढ बांधा, असं वर्णन करतो; त्याचप्रमाणे इमारतीलाही तिच्या रचनेनुसार बांधा असतो. ही इमारतीची रचना प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते. त्यापकी एक प्रकार म्हणजे ‘लोडबेअरिंग स्ट्रक्चर्स’ आणि दुसरा प्रकार म्हणजे ‘फ्रेम्ड स्ट्रक्चर्स’. ‘लोडबेअरिंग स्ट्रक्चर्स’ या प्रकारात प्रत्येक 
मजल्याच्या छपराचं म्हणजेच स्लॅबचं वजन हे त्याखाली असलेल्या घराच्या बाह्य भिंतींवर येतं. पूर्वीच्या काळची घरं ही याच प्रकारची असत. सध्याच्या काळातही बठी किंवा दुमजली घरं जिथे आहेत, अशा ठिकाणी त्यांची रचना ही बऱ्याचदा याच प्रकाराची असते. या घरांच्या भिंती खूपच जाडजूड म्हणजे सुमारे दीड फूट जाडी असलेल्या असतात. 

(छायाचित्र १ पाहा). कधीकधी स्वयंपाकघरातल्या अशा जाड भिंतींमध्ये फडताळ म्हणजेच आजच्या भाषेत सांगायचं तर ‘किचन कॅबिनेट’ असायचं. या भिंती त्यांचं स्वत:चं आणि त्यांनी तोलून धरलेल्या स्लॅबचं वजन, हे त्यांच्या खाली असलेल्या इमारतीच्या पायावर देतात. इमारतीचा पाया, त्याच्यावर येणारं हे वजन त्याच्याखाली असलेल्या टणक जमिनीवर अथवा खडकावर देऊन त्यावर रेलून उभा असतो.

‘फ्रेम्ड स्ट्रक्चर्स’मध्ये बीम आणि कॉलम असतात. बऱ्याचदा या दोन्ही भागांना काहीजण बीम असंच म्हणतात. परंतु प्रत्यक्षात खांबांना म्हणजेच उभ्या भागांना ‘कॉलम’ म्हणतात, तर तुळयांना म्हणजेच आडव्या भागांना ‘बीम’ म्हणतात. या प्रकारच्या रचनेत मजल्याच्या स्लॅबचं वजन हे आडव्या बीमवर येत असतं आणि हे बीम्स त्यांना तोलून धरणाऱ्या कॉलमवर हे सर्व वजन टाकत असतात. कॉलमकडून मग हे वजन इमारतीच्या पायावर आणि पायाकडून मग जमिनीवर अथवा खडकावर हे वजन टाकलं जातं.

कुठल्याही इमारतीखाली असणाऱ्या जमिनीची किंवा खडकाची वजन पेलण्याची एक क्षमता असते. आणि ती अमर्याद नसते, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे इमारतीच्या पायाची ताकद न वाढवता किंवा नव्यानं वेगळा पाया न घालता इमारतीवर नवीन मजले कधीही चढवू नयेत. कारण तसं केलं तर इमारत कोसळण्याचीही भीती असू शकते.

घराचं नूतनीकरण करीत असताना अनेकदा वन रूम किचनला वन बेडरूम किचनमध्ये किंवा वन बीएचके हा टू बीएचकेमध्ये परिवर्तित करण्यासाठी किंवा सौंदर्यीकरणासाठी वा जागा मोठी करण्यासाठी खोल्यांच्या भिंतींमध्ये बदल केले जातात. काही वेळा आपण भिंती काढून टाकतो. जर आपल्या इमारतीची रचना लोडबेअरिंग प्रकारची असेल, तर त्या प्रकारात स्लॅबचं वजन थेट भिंतीवर येत असल्यामुळे असे बदल करणं धोक्याचं असतं. परंतु जर फ्रेम्ड स्ट्रक्चर्स या प्रकारात आपली इमारत येत असेल, तर बीम-कॉलमच्या चौकटीत एखादा पडदा लावावा, त्याप्रमाणे तुलनेने पातळ भिंती या चौकटीत उभारलेल्या असतात. त्यांच्यावर इमारतीचा भार नसतो. त्यामुळे असे बदल करता येऊ शकतात. मात्र, ते तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करावेत. 

त्याप्रमाणेच भिंत तोडताना बीम-कॉलमला कुठेही धक्का लागणार नाही, याची काळजी घेणं आवश्यक असतं. कधीकधी इमारतींचं वय जास्त असेल, तर अशी काळजी घेऊनही भिंत तोडताना होणाऱ्या कंपनांमुळे बीम-कॉलमला तडे जाऊ शकतात. याव्यतिरिक्त असे बदल करताना इतरही अनेक तांत्रिक मुद्दे लक्षात घेणं आवश्यक असतं. त्यामुळे एखाद्या तज्ज्ञ सिव्हिल इंजिनीअरला आपलं घर दाखवलं तर सर्व मुद्दे लक्षात घेऊन तो योग्य तो सल्ला देईल. किंवा बदल करताना कोणते पर्यायी उपाय योजता येतील, याविषयी आपल्याला योग्य ती माहिती त्याच्याकडून मिळू शकेल. इमारतीची रचना जाणून न घेता केवळ अधिक जागेची गरज म्हणून असे बदल केलेत, तर आपण केवळ स्वत:लाच नाही, तर इमारतीत राहणाऱ्या इतर रहिवाशांनाही धोक्याच्या उंबरठय़ावर लोटतो आहोत, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. दोन खोल्या एकत्र केल्यावर जर मध्येच असा कॉलम येत असेल, तर त्या मध्येच येणाऱ्या कॉलमच्या 
तळाशी जमिनीलगत एखादं प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं सुंदर कमळ करून घेता येईल. त्यामुळे त्या कमळातून तो कॉलम वर येत असल्याचा आभास निर्माण करता येऊ शकतो. तसंच या कॉलमवर बाहेरच्या बाजूने कोरीव नक्षीकाम केलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं किंवा लाकडी आवरण लावता येईल. 

(छायाचित्र २ पाहा). त्यामुळे त्या नक्षीदार कॉलमची शोभा वाढून त्यामध्येच येणाऱ्या कॉलमच्या अडथळ्याचं रूपांतर खोलीतलं मुख्य आकर्षण म्हणूनही करता येऊ शकतं.घराचं नूतनीकरण किंवा सौंदर्यीकरण करताना इमारतीच्या रचनेचा प्रकार लक्षात घ्यायला विसरू नका.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१२

वास्तुमार्गदर्शन : शनिवार , १८ फेब्रुवारी २०१२


वरच्या मजल्यावरून खालच्या मजल्यावरील सदनिकेत गळती (शौचालय, बाथरूम, बेसिन इ. मधून) होत असेल व मूळ मालक त्या ठिकाणी राहत नसेल तर याबाबत कोणती कारवाई करावी? 

आपण विचारलेला प्रश्न ही अनेकांसाठी मोठी समस्याच आहे. या ठिकाणी काही गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत त्या अशा -
सोसायटीच्या इमारतीत टेरेस वा बाजूच्या भिंतीतून जर गळती झाली असेल तर ती गळती दूर करण्याची जबाबदारी ही संबंधित संस्थेची असते व त्याचा खर्च हा संस्थेने करायचा असतो.  मात्र वरील मजल्यावरून खालील मजल्यावर एखाद्या सदस्याच्या शौचालय, बाथरूम, बेसिनमधून खालील मजल्यावर गळती होत असेल तर ती गळती बंद करण्याची जबाबदारी ही संबंधित सदनिकाधारकाचीच असते. आणि कायद्याने ती तो टाळू शकत नाही. अशा वेळी प्रथम ज्याला त्रास होत आहे त्यांनी ज्याच्या सदनिकेतून गळती होत आहे अशा सदस्याला पत्र पाठवून गळती थांबवण्याची विनंती करावी. त्याने न ऐकल्यास त्याबाबत सोसायटीकडे तक्रार करावी. सोसायटीने संबंधित सदस्याला समज देऊन त्याला गळती थांबवण्यासाठी कारवाई करण्याच्या कामी समज द्यावी. तरीही तो ऐकला नाही तर सोसायटीने स्वखर्चाने गळती दुरुस्त करून द्यावी व ते पैसे त्याच्याकडून थकबाकी म्हणून वसूल करावेत.  समजा, त्या सदस्याने त्याच्या सदनिकेत प्रवेश करण्यास परवानगी दिली नाही तर त्याविरुद्ध संस्थेने सहकारी न्यायालय अथवा दिवाणी न्यायालयात दाद मागणे जरुरीचे आहे.  ज्या व्यक्तीच्या सदनिकेत ही गळती होत असेल ती व्यक्तीसुद्धा वरील मजल्यावरील संबंधित सदनिकाधारक तसेच त्याच्याविरुद्ध संबंधित सोसायटी जर कारवाई करीत नसेल, तर त्या दोघांविरुद्धही सहकार न्यायालय अथवा संबंधित दिवाणी न्यायालयात दाद मागता येईल व त्याचा खर्चदेखील त्याला संबंधित सदस्याकडून वसूल करता येईल. याबाबत संबंधित सदस्य वेळकाढूपणा करू शकतो; परंतु पिडित सदस्याने चिकाटीने लढा दिला तर तो यशस्वी होऊन न्याय मिळवू शकेल.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

मेकओव्हर : खोल्यांच्या प्राथमिक गरजा

alt
घर छोटं असो किंवा मोठं, तिथल्या प्रत्येक खोलीच्या काही प्राथमिक गरजा असतात. त्यांची पूर्तता करून प्रत्येक खोलीची अर्थपूर्ण रचना कशी करता येईल, हे प्राधान्याने लक्षात घ्यायला हवं. खोलीच्या प्राथमिक गरजा म्हणजे नेमकं काय, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. अर्थात हे करताना किंवा घरातली कुठलीही खोली सजवताना तिचं आकारमान आणि तिथल्या गरजांची नीट सांगड घालता आली पाहिजे. दिवाणखाना अर्थात लिव्हिंग रूम- दिवाणखाना हा प्रत्येक घराचा आरसा असतो. कारण घरातल्या व्यक्तींची अभिरुची, कलात्मक नजर, जीवनशैली त्यातून व्यक्त होत असते. या खोलीची अंतर्गत सजावट करताना प्रामुख्याने ही गोष्ट लक्षात घ्यावी, की घरातल्या व्यक्तींप्रमाणेच बाहेरील व्यक्तींनाही या खोलीत पाऊल ठेवल्यावर प्रसन्न वाटलं पाहिजे. 

दिवाणखाना म्हणजे घरातल्या व्यक्तींनी एकत्र बसून टीव्ही बघणे, पाहुण्यांचं स्वागत, गप्पाटप्पा यासाठीची जागा आहे. त्यामुळे इथे वस्तूंची, फíनचरची गर्दी नको, अडगळीच्या वस्तू तर नकोच नको. स्टोअरेज असलं तरी त्याचा अतिरेक असता कामा नये. दिवाणखान्यात दोन प्रकारच्या बठकीची रचना करता येते. १) फॉर्मल सीटिंग, २) इनफॉर्मल सीटिंग. फॉर्मल सीटिंगमध्ये थ्री सीटर सोफा, टू सीटर सोफा, एल शेप सोफा सीटिंग, सिंगल सोफा अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोफा सेट, डायिनग टेबलचा समावेश होतो. 

फॉर्मल सीटिंगला एक प्रकारचा वेस्टर्न लूक असतो, आणि इनफॉर्मलमध्ये दिवाण, भारतीय बठक, आरामखुर्ची, झोपाळा यांचा अंतर्भाव असतो. वेगळी फॅमिली रूम असेल तर त्या ठिकाणी अशी इनफॉर्मल रचना जास्त सयुक्तिक ठरते. कधी कधी गरजेनुसार फॉर्मल आणि इनफॉर्मल सीटिंगचं फ्युजन करूनही छान बैठकीची व्यवस्था करता येते.  

या खोलीत नैसíगक प्रकाश भरपूर प्रमाणात असावा. रंगसंगतीमध्ये िभतीचे रंग, फíनचरचा रंग, टेश्चर, पडदे, कुशन्स यांचे रंग या सगळ्यांच्या रंगांचा ताळमेळ असावा. जेणेकरून दिवाणखान्यातली रंगसंगती परिपूर्ण दिसेल. पण हे करताना खोलीचं आकारमान, तिथला नसíगक प्रकाश इ. गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

या प्राथमिक गरजांचा विचार झाल्यावर मग इथे म्युझिक सिस्टम, बुक शेल्फ, इतर शोभेच्या वस्तू हव्या असतील तर त्यांची मांडणी कशा प्रकारे करता येईल याचा विचार होतो.

स्वयंपाकघर: घरातली ही खोलीसुद्धा अतिशय महत्त्वाची असून ती नीटनेटकी, आकर्षक व सुटसुटीत असणं गरजेचं असतं. या खोलीची प्राथमिक गरज म्हणजे गॅस, फ्रीज व सिंक यांची रचना. यांचा प्रथम विचार करणं आवश्यक आहे. पाणी, गॅस आणि इलेक्ट्रिक उपकरणं यांची योजना करताना काळजी घेण्यात यावी. स्टोअरेजशिवाय किचनला पूर्णत्व नाही. भांडय़ांची जागा, धान्यांची जागा या निश्चित कराव्या लागतात. धान्याच्या वस्तूंचं स्टोअरेज हे पाण्याच्या जागी किंवा ओलावा असेल अशा ठिकाणी असू नये. 

स्वयंपाकघराचं प्लॅिनग करताना तिथला वावर अधिक सोयीचा कसा होईल, हे लक्षात घ्यायला हवं. कारण इथे काम करणाऱ्या स्त्रीच्या श्रमाची, वेळेची बचत झाली पाहिजे. गॅस, इलेक्ट्रिकल पॉइंट्स, मायक्रोवेव्ह, मिक्सी, धारदार वस्तू (सुऱ्या, विळी इ.) मुलांच्या हाताला सापडणार नाहीत, अशा पद्धतीने मांडणी केलेली असावी. आज मॉडय़ुलर किचनची खूपच चलती आहे. असं किचन खूप सोयीचंही असतं. याच्या बास्केट्स स्टेनलेस स्टीलच्या असून त्यावर क्रोम व इलेक्ट्रो अशा दोन प्रकारच्या कोटिंग्स करता येतात. पूर्वी प्लॅस्टिक कोटेड करून मिळायचं. मॉडय़ुलर किचन हे सोयीचं आहे. ठरावीक काळानंतर सíव्हसिंग करून घेतलं तर त्याचा टिकाऊपणा निश्चितच वाढतो. 

बेडरूम: या खोलीची सजावट करताना ती खोली कोणाची आहे म्हणजे, तरुण जोडप्याची , मध्यमवयीन जोडप्याची की वयस्कर जोडप्याची आहे, ते बघून बेडरूमची सजावट केली जाते. या ठिकाणी आराम करणं अभिप्रेत आहे. शक्यतो बेड दरवाजासमोर येणार नाही, याची काळजी घ्यावी. बेडच्या बरोबरीने वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल, स्टडी टेबल या गोष्टींची योजनाही अभिप्रेत असते. इथली रंगसंगती आणि प्रकाशयोजना ही प्रसन्न, आल्हाददायक, उत्साही असली पाहिजे. तरुण जोडप्यासाठी बेडरूम डिझाइन करताना डीम लाईट्सची रचना हटकून केली जाते. बेडरूम आकाराने मोठी असेल तर कॉफी टेबल, छोटी सीटिंग या गोष्टीही करता येतात. इथे गॅलरी मिळत असेल व ती मोठी असेल तर  तिथे कॉफी टेबलची रचना करता येते. तसंच छोटी बाग, झोपाळा हे पर्यायही निवडता येतात. 

बाथरूम: एरवी ही जागा सगळ्यात दुर्लक्षित असते. मात्र आमच्या दृष्टीने इतर खोल्यांप्रमाणेच ही जागाही तितकीच महत्त्वपूर्ण व आकर्षकरीत्या सजवणं गरजेचं असतं. या जागेत शॉवर, टॉयलेट, गीझर, थंड पाणी आणि गरम पाणी यांच्या पाइप लाइन्स, सांडपाण्याचा योग्य निचरा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. इथली रंगसंगतीसुद्धा तितकीच महत्त्वाची असून टाईल्सचे रंग, डिझाइन इथल्या आकारमानानुसार ठरवाव्या लागतात. 

अशा प्रकारे घरातील प्रत्येक खोल्यांच्या गरजांची तिथल्या व्यक्तींच्या गरजा, अपेक्षांबरोबर योग्य ती सांगड घालून रचना केली जाते. अशी रचना ही जास्त नियोजनबद्ध, अर्थपूर्ण व नेत्रसुखद दिसते.  


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

सदनिका खरेदी आणि सेवाकर


alt
आज माणसाचे घराचे स्वप्न प्रत्यक्षात साकार होईल किंवा नाही, असा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सरकारने केलेली ‘रेडी रेकनर’मधील वाढ व महसूल गोळा करण्यासाठी लादलेले अनेक जुजबी कर. त्याचा आढावा घेणारे लेख.

वास्तविक बांधकाम सेवेवर सेवाकर आल्याला सात आणि निवासी बांधकामावर सेवाकर आल्याला सहा वर्षे लोटली. आरंभी व्यावसायिक आणि औद्योगिक बांधकाम सेवाकराखाली आणले गेले. १० सप्टेंबर २००४ पासून यावर सेवाकर आकारणी सुरू झाली. त्या पाठोपाठ निवासी बांधकामदेखील करपात्र करण्यात आले. अगदी ही सेवा करपात्र करण्याचे जाहीर झाल्याबरोबर यात गोंधळाला सुरुवात झाली. एकतर घर घेणे ही गमतीची बाब नाही. त्यासाठी निधी उभारणी आणि त्यानंतर त्याची परतफेड हा अखंड चालत राहणाऱ्या कौटुंबिक मालिकांइतका प्रदीर्घ विषय असतो. त्यात यावर सेवाकर भरायचा म्हटल्यावर सदनिका घेणाऱ्यांचे धाबे दणाणले. 

बिल्डर समुदायाने सेवाकर भरायचा की नाही त्यात मतभेद होत गेले. सदनिका या व्यवहारात साधारण बिल्डर, ठेकेदार आणि ग्राहक असे तीन घटक असतात. ठेकेदाराने बिल्डरला बांधकाम करून घ्यायचे आणि बिल्डरने ती सदनिका त्याच्या ग्राहकास विकायची अशा स्वरूपाचे व्यवहार होत असतात. यात बिल्डर त्याच्या ग्राहकाला तयार सदनिका देत असतो. सदनिका विक्री ही वास्तू विक्री असते, यात सेवेचा भाग नसतो. परिणामी बिल्डरने ग्राहकाकडून सेवाकर वसूल करण्याचे कारण नाही. तरीही सरकारी अधिकारी, बिल्डर समाजाला सेवाकर भरण्याचा आग्रह करीत होते. यावर अनेक वाद झाले. अनेकांनी सेवाकराखाली नोंदणी करवून सेवाकर भरायला सुरुवातही केली. मात्र बिल्डरांनी सेवाकर भरायचा की नाही, यात सेवा आहे का? यावर मतभेद कायमच होते.

२०११च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी यावर पडदा टाकला. त्यांनी सदनिका विक्री हा बांधकाम सेवेचाच एक भाग असल्याचे सांगून, व्याख्येत तशी तरतूद करून चर्चा संपविली आणि खऱ्या अर्थाने सदनिका विक्री सेवेवर सेवाकराची आकारणी सुरू झाली. १ जुलै २०१० पासून सदनिका विक्री ही सेवा करपात्र झाली. सदनिका घेताना साधारण खालील प्रकारात व्यवहार होत असतात. एखादा बिल्डर घरे विक्रीसाठी जाहीर करतो. त्याकडे ग्राहक येतो. नकाशा, जागा वगैरे पाहून भाव पटल्यावर खरे तर, परवडल्यावर प्रकरण पुढे सरकते. त्यानंतर करार होतो. करार करताना काही रक्कम आकारली जाते आणि करारात ठरल्यानुसार टप्प्याटप्प्याने हप्ते बिल्डरला दिले जातात. अखेरचा हप्ता भरल्यावर सदनिकेची किल्ली आणि ताबा खरेदीदारास दिला जातो. खरेदीदार जसजशी रक्कम देत राहतो त्यावर सेवाकर आकारून तो सरकारजमा करण्याचे काम बिल्डर करीत असतात. बांधकाम सेवेत (म्हणजे सदनिका विक्री व्यवहारातही) ग्राहकाला वस्तू आणि सेवा असे दोन्ही प्रकार संयुक्तपणे दिले जात असतात. मात्र वस्तूवर सेवाकर आकाराला जात नाही. म्हणजेच सदनिका तयार होताना लागणाऱ्या वस्तूंवर सेवाकर नसतो. 

त्यामुळे लोखंड, सिमेंट (वज्र चूर्ण), फरश्या, रंग, काचा, विटा, डबर, विद्युत साहित्य वगैरेंच्या किमतीवर आकारला जात नाही, तर केवळ मजुरी आणि कौशल्य यांवरच सेवाकराची आकारणी होते. ही रक्कम कशी निश्चित करायची असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारने बांधकाम सेवा करपात्र झाल्यापासून त्यावर ६७ टक्केची वजावट घोषित केली आहे. सर्वसाधारण अभ्यासावरून सरकारने दोनतृतीयांश सामानाची आणि एकतृतीयांश सेवेची किंमत नक्की केली आहे. म्हणजेच सेवेच्या मूल्यावर अर्थात व्यवहाराच्या ३३ टक्के रकमेवर सेवाकर आकारणी होत होती. १ जुलै २०१० पासून सदनिका विक्री करपात्र झाल्यापासून यात आणखी बदल केले आहेत. सदनिका घेताना जमिनीची किंमतही ग्राहकाकडून वसूल करण्यात येते. याच कारणासाठी शहराच्या मध्यवस्तीतील सदनिका अधिक किंवा अतोनात किमतीस विकल्या जातात, तर गावाबाहेरील त्याच दर्जाची सदनिका माफक किमतीस मिळू शकते. जमीन ही वस्तूही नाही आणि सेवाही नाही म्हणून त्यावर सेवाकर आकारणे गैर आहे याची जाणीव ठेवून सरकारने ६७ टक्केची वजावट ७५ टक्केपर्यंत वाढविली आहे. परिणामी ग्राहकाला व्यवहारमूल्याच्या २५ टक्के रकमेवर सेवाकर भरावा लागतो. २५ टक्केच्या १०.३ टक्के म्हणजेच एकूण रकमेच्या २.५७५ टक्के इतका सेवाकर सदनिका खरेदीवर भरावा लागतो. भारतात सदनिका घेताना दोन प्रकारे व्यवहार होत असतात. काही राज्यांमध्ये आधी जमिनीचा व्यवहार होतो, त्या भूखंडावर ग्राहकाचे नाव चढते आणि त्यानंतर सदनिकेचा व्यवहार होतो. अशा वेळी अर्थातच सदनिका व्यवहाराचे मूल्य कमी होते म्हणून ज्या राज्यांमध्ये अशी व्यवस्था असते, त्या ठिकाणी मात्र ३३ टक्के रकमेवरच सेवाकर आकारणी होते.

ही सेवा करपात्र करताना अर्थमंत्र्यांनी एक गंमत केली आहे. पार्किंग विकले असल्यास त्या रकमेवर सेवाकर आकारला जाणार 
नाही, अशी उदार घोषणा केली आहे. मात्र पार्किंग विकण्यास बंदी आहे. यामुळे बिल्डर तोंडी सांगताना जरी पार्किंगचे 
दोन लाख असे सांगत असले तरी प्रत्यक्षात ती रक्कम सदनिकेच्या मूल्यात वाढविली जाते. त्यावर सेवाकर भरावा लागतो. महाराष्ट्र वीज वितरणसाठी काही रक्कम घ्यावी लागते. वास्तविक यापोटी जी पावती वीज वितरण कंपनीकडून मिळते त्यावर सेवाकर भरणे अपेक्षित नाही. मात्र बिल्डर त्यामध्येही ‘गाळा काढतात’ व परिणामी ग्राहकाला सेवा रकमेवर सेवाकर भरावा लागतो. बरेचदा बिल्डर ‘एकरकमी दुरुस्ती’पोटी मोठी रक्कम घेतात आणि नंतर ती सोसायटीला वर्ग करतात. त्यावर बिल्डरांनी सेवाकर आकारण्याचे कारण नाही, ते काम पुढे सोसायटी करील.

१ जुलै २०११ पासून बिल्डर समुदायाला (आणि एकूणच सेवा देणाऱ्यांना) देयक (बिल) बनविल्यावर महिना, तिमाही काळ संपल्यावर सेवाकर भरणे क्रमप्राप्त आहे. भले मग त्यांना ती रक्कम प्राप्त झाली असो अथवा नसो. यामुळे आता बिल्डर ग्राहकांना रक्कम देण्याचा तगादा लावतात. याव्यतिरिक्त १ टक्के मूल्यवर्धित करही भरावा लागतो. आपल्या इमारतीत केवळ १२ सदनिका असतील तर त्यावर सेवाकर आकारणी होत नाही. त्याचप्रमाणे सदनिका पूर्ण होऊन पूर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर जर करार झाला व रक्कम दिली गेल्यास त्यावर अजिबात सेवाकर घेता येत नाही. थोडक्यात, रेडी पझेशन सदनिकेवर सेवाकर नाही. मात्र, बुकिंगमध्ये करार केल्यास त्यावर सेवाकर भरावा लागतो? याखेरीज ग्राहकाने विशिष्ट सदनिका मागितली व त्यासाठी वेगळी रक्कम आकारली अथवा काही बदल करवून घेतला तर त्या पूर्ण रकमेवर १०.३ टक्के इतका सेवाकर आकारला जातो. सदनिका घ्यायची आहे ना, मग या साऱ्याला तयार व्हायलाच हवे.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

घरसजावटीतले राशीरंगं

alt
प्रत्येक राशीचं स्वत:चं असं खास वैशिष्टय़ मानलं गेलं आहे. त्या- त्या राशीची माणसं त्या- त्या राशीची स्वभाववैशिष्टय़ं घेऊन येतात, असा समज जगभर प्रचलित आहे. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या नेहमीच्या व्यवहारात दिसून येतं. घरसजावटीतूनही ते कोणत्या राशीच्या माणसाचं घर आहे, हे प्रतीत होतं. या पाश्र्वभूमीवर बारा राशींच्या माणसांची घरं कशी असतील, हे पाहणं गंमतीशीर ठरेल.

आपलं घर इतरांच्या तुलनेत जरा जास्तच हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. मग गृहसजावट करताना त्या-त्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची आवडनिवड, स्वभाव वैशिष्टय़ं यांचं प्रतिबिंब त्यात पडतं. प्रत्येक राशीची स्वत:ची अशी वैशिष्टय़ं असतात. ती गृहसजावटीतही कशी उतरतात ते पाहू.


मेष : मेष राशीच्या माणसांच्या घरात अनेकदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं दर्शन घडतं. मेष राशीच्या व्यक्ती या अत्यंत धडाडीच्या आणि कार्यक्षम असतात, परिणामी त्या फारच कमी वेळ घरी असतात. म्हणूनच त्यांना घर हे राहण्यापेक्षाही स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगणारं  असावं, असं त्यांना वाटत असतं. आखीवरेखीव घररचना, लख्ख आणि विविध प्रकाशयोजनांचा वापर आणि आटोपशीर सामान असं सुबक घर असतं. त्यांना वेगळं आणि सहज रचना बदलता  यईल किंवा हलवता येणारं फíनचर आवडतं. सतत उत्साही मेष राशीला घरातील फíनचरमध्ये फेरफार करायचीही फार आवड असते. मेष राशीला शक्यतो तेजस्वी आणि गडद रंगसंगती आवडते. विरोधात्मक रंगसंगती हे जणू त्यांच्या घराचं वैशिष्टच! जसे- काळा-पांढरा-लाल.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांना रंगसंगतीपेक्षा नॅचरल लूक जास्त हवाहवासा वाटतो. आत्मविश्वासू असलेली वृषभ राशीची माणसं आरामदायी जीवनशैली आणि स्थर्याला पसंती देतात. त्यांच्या मते घर म्हणजे निवारा, जेथे त्यांना आपलेपणा वाटेल. वृषभ राशीची व्यक्ती फारच जाणीवपूर्वक आपल्या घरातील सजावटी व वस्तूंच्या दर्जाला महत्त्व देते. प्रेमळवृत्ती असलेल्या वृषभ राशीच्या माणसांचे घरातील सर्वात आवडते ठिकाण म्हणजे बेडरूम, जे अगदी रचनात्मक असते. जसे- मोठा बेड, भरपूर कुशन्स. त्यांना पेस्टल रंगातील फíनचर, आरामदायी खुच्र्या आणि लाकडाचे सोफे आवडतात. संगीत आणि कला यांतून प्रेरणा घेणारी वृषभ रास आहे. ते पुस्तक, गाण्यांचं कलेक्शन, विविध रोपटी, मेणबत्त्या आणि कलाकुसर असलेल्या अ‍ॅन्टिक वस्तूंनी घर सजवायला जास्त प्राधान्य देतात.

मिथुन : समजूतदार आणि समाजप्रिय अशी मिथुन राशीची माणसं! ज्यांना नेहमीच नवनवीन गृहसजावटीच्या कल्पना प्रशंसनीय वाटतात. वायू तत्त्व असलेली मिथुन रास ही हलक्या आणि सहज रचना बदलता येईल अशा फíनचरला पसंती देते. त्यांना वैविध्यपूर्ण प्रकाशयोजना आवडते. गडद पिवळा, कॉफी आणि तपकिरी हे मिथुन राशीचे आवडते रंग. स्वातंत्र्यप्रिय मिथुन राशीला वेगवेगळ्या प्रकारचे लॅम्पस् (भिंतीवरील आणि
 जमिनीवरील), मोठे, आकर्षक आणि विविध आकारांचे आरसे यांची त्यांना आवड असते.


कर्क : वास्तुप्रिय कर्क रास आपल्या घरात सहजता, सुरक्षितता आणि आराम या गोष्टींना प्राधान्य देते. कर्क राशीचे लोक आपल्या घराला स्वत:चा असा खास टच देणे पसंत करतात. ज्यात जुन्या आठवणींना उजाळा देणाऱ्या फोटो फ्रेम्सचा समावेश असतो. काहीशा आत्मकेंद्री कर्कला निळा, तपकिरी आणि चंदेरी छटा असलेल्या कापडाचे फíनचर आवडतं. तसेच त्यांचं स्वप्नातील घर हे नेहमी लाकडाच्या वस्तूंनी युक्त असतं. जसं- मोठं गोल टेबल आणि वूड किचन यांनी सजलेलं असतं. कर्क आपलं घर नेहमी गालिचे, जुन्या वस्तू, मेणबत्या आणि रोपांनी सजवतात.

सिंह : सौंदर्यदृष्टी असणारी सिंह ही रास. त्यांचं घर त्यांना आकर्षक आणि स्वागतार्ह असावं असंच वाटतं. सिंह राशीच्या घराची ओळख म्हणजे मोठे आरसे, अभिजात पेंटिंग्ज आणि स्फूर्तिदायी प्रकाशयोजना. सिंह राशीची माणसे आधुनिक आणि सहज सोपी सजावट पसंत करतात. त्यांच्या घरात सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग असतो. कलासक्त सिंह रास आपल्या घरातही कलेला तेवढेच प्राधान्य देते. त्यांना प्रखर अशा रंगसंगती आवडतात, जसे- सफेद, निळा, तपकिरी.

कन्या : कन्या रास नेहमी सुटसुटीतपणा आणि उपयुक्ततेला प्राधान्य देते. आधुनिक ट्रेंड्सपेक्षा पर्यावरणाशी जुळणाऱ्या वस्तूंना ते प्राधान्य देतात. त्यांना घर सजावटीत विविध मिश्र गोष्टी करून बघायला आवडतात. जसे- लाकूड, दगड, संगमरवर. त्यांना सरळ रेषा आणि भौमितिक प्रकारचे लाकडी आणि स्टोन फíनचर आवडते. करडा, गडद निळा, हिरवा आणि उबदार अशा क्रीम आणि कॉफी कलरचा समावेश त्यांना घरसजावटीत आवडतो. फिरण्याची आवड असणाऱ्या कन्या राशीला विविध ठिकाणांहून आणलेल्या हस्तकलेच्या वस्तू, चित्रे आणि शोभेच्या वस्तूंनी आपले घर सजवायला आवडते.

तूळ :  शांत आणि संयमित गृहसजावट ही तूळ राशीची खासियत. त्यांना ऐसपैस, मोठी, स्वच्छ अशी घरे आवडतात. आटोपशीर फíनचर म्हणजे तूळ राशीचे घर. फíनचर निवडताना ते आखीव आणि गोल आकाराच्या फíनचरला पसंती देतात. उबदार असे पेस्टल शेड्स त्यांना आवडतात. तूळ राशीचे आवडते रंग म्हणजे जांभळा, गडद निळा, जे डोळ्यांनाही सुखद वाटतात. तूळ रास ही प्रेमळ वृत्तीची असल्याने प्रखर प्रकाशयोजनेला पसंती नसते. तसंच त्यांना फुलांनी आणि जलरंग, लॅंडस्केप यांनी घर सजवायला फार आवडते.

वृश्चिक : वृश्चिक राशीच्या माणसांना आपल्या घरातूनच  भावनात्मक आधार मिळत असतो. तसंच जगापासून दूर असा स्वत:चा असा कोपरा असलेला त्यांना आवडतो. वृश्चिक नेहमी प्रखर आणि गडद रंगसंगती, जसे-काळा आणि पांढरा रंगं यांना पसंती देतात. त्यांना कमीतकमी फíनचर आवडते; जे घरात कमीतकमी जागा व्यापेल. या राशीच्या व्यक्ती गूढ व आत्मकेंद्री प्रवृत्तीच्या असतात. त्यामुळे त्यांना सौम्य प्रकाशयोजना आवडते. तसेच त्यांना घरात चामडय़ाच्या आणि लोखंडाच्या वस्तू ठेवणं आवडतात.

धनू : धाडसी धनुर्धारी धनू नेहमी हटके गृहसजावटीची निवड करते. या राशीच्या व्यक्ती नेहमी नवनवीन आणि आकर्षक गोष्टी पसंत करतात. व्यक्तिस्वातंत्र्यप्रिय आणि चंचल असलेले धनू राशीचे लोक नेहमीच लगेचच बदलता येईल अशा गृहसजावटीला पसंती देतात. उपयोग आणि सुलभता यावर त्यांचा भर असतो. म्हणूच त्यांना साधे, पण ओरिजिनल डिझाइन फíनचर आवडते.  त्यांना आकाशी, निळा, हिरवा, नारंगी रंग आवडतात. घरातील पडदे आणि अन्य गोष्टी त्यांना फिकट रंगाचेच आवडतात. धनू राशीला पुस्तकाचा कोपरा हवाच! शोभेच्या वस्तू आणि संगीतसंग्रह करायलाही त्यांना आवाडते.

मकर : ही सर्वात जास्त आत्मकेंद्री रास आहे. म्हणून त्यांची गृहसजावट त्यांचं समाजातील स्थानावर भर देणारी असते. मकर राशीचा ओढा हा पारंपरिक सजावटीचे फíनचर आणि रंगाकडे असतो. जसे- लाल, काळा, पांढरा, क्रीम आणि कॉफी. त्यांना लाकूड, संगमरवर व चामडय़ाच्या वस्तू यांची आवड असते. वाचनप्रेमी मकर राशीच्या माणसांच्या घरात ग्रंथालय हे हवेच! आपल्या घरात त्यांना विविध वस्तूंचा संग्रह करायला आवडतो.

कुंभ : कुंभ राशीला नवीन आणि हटके सजावटीची आवड असते. या हटके आवडीचा जोर अनेकदा प्रकाशयोजनेवर दिसून येतो. त्यांचं घर हे त्यांना नेहमीच इतरांपेक्षा वेगळं आणि स्वत:चं असं आवडतं. त्यांना बहुउपयोगी, नवीन आणि अनोखं फíनचर आवडतं, जे त्यांचं स्वातंत्र्यप्रिय व्यक्तिमत्त्व प्रतििबबित करतं. सजावटीत ते ग्लॉसी आणि लोखंडाच्या वस्तूंना पसंती देतात.

मीन : काल्पनिक जगात रमणारी मीन रास. आरामदायी आणि सुबक सजावटीला मीन राशीचं माणसं पसंती देतात. त्यांच्या कल्पनातीत जगात पूर्ण ब्रम्हांड म्हणजे त्यांचंच घर! ज्यात फक्त त्यांचेच नियम आणि कायदे असतात. त्यांना फिकट जांभळा, निळा, हिरवा आणि करडा असे रंग आवडतात. प्रकाशरचना सौम्य लागते. मीन राशीला नेहमी साधेसरळ, पण मोहक फíनचर आवडते. ज्यात गोलाकार वस्तू. मऊ गालिचे, भरपूर पडदे आणि उशांचा समावेश असतो. मीन राशीची व्यक्ती आपले घर नेहमी उत्साहात सजवते आणि त्यामुळे त्यांचे घर सामानाने भरलेले असते.     



Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१२

गृहहिताय : निवासी इमारतींसाठी आगीचा विमा


alt
नुकतीच वरळीतील एका निवासी इमारतीमध्ये आग लागली. या घटनेत नुकसान विशेष झाले नसले तरी अशा प्रकारच्या घटना हाताबाहेर गेल्यास मोठी हानी संभवते. अशा प्रकारच्या घटनांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य असले, तरी सुजाणपणे विमा घेतल्यास होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण बऱ्याच अंशी कमी करता येऊ शकते. असाच एक विम्याचा प्रकार ज्यावर योग्य विचार करण्याची गरज आहे, तो म्हणजे आगीचा विमा. आगीच्या विम्याविषयीची तथ्ये

आगीचा विमा इमारतींना आणि आतील वस्तूंना संरक्षण पुरवतो. इमारतीमध्ये केवळ बांधकामाचा समावेश होत नसून कायमस्वरूपी बसवलेल्या वस्तू, सॅनिटरी फिटिंग आणि इतर स्थायी फिटिंगचासुद्धा त्यात समावेश होतो.
 
त्याचप्रमाणे गॅरेज, आच्छादित पोर्चचा भाग, कॅनोपी आणि अगदी सीमेच्या िभतींचासुद्धा आगसंरक्षण पॉलिसीमध्ये अंतर्भाव होऊ शकतो. शिवाय, त्यात खाजगी रस्ते, तरण तलाव आणि इमारतीचा पाया या गोष्टीही येऊ शकतात. इमारतीच्या पायाला आगीचा धोका नसला तरी भूकंपामुळे त्याला हानी पोहोचू शकते. मात्र, या सर्व मालमत्ता विमा संरक्षण घेताना स्पष्टपणे नमूद केल्या गेल्या पाहिजेत. 

आगीचा विमा
* हा विमा कंपनी आणि विमाधारक यांच्यातील वैयक्तिक स्वरूपाचा करार आहे. म्हणजेच मालमत्तेची विक्री वा अन्य कारणांसाठी, वारसाहक्काचा अपवाद वगळून पॉलिसी इतर व्यक्तींच्या नावावर हस्तांतरित करता येत नाही.

* विशिष्ट मालमत्तेसाठीच ती लागू आहे. मालमत्ता जर त्या ठिकाणावरून हलवली तर त्यावर पॉलिसीचे संरक्षण मिळणार नाही. 

* ही अजूनही नियंत्रणाखाली असलेल्या पॉलिसींपकी एक असल्याने, देऊ करण्यात येणारे संरक्षण आणि पॉलिसीचा मसुदा देशभरात मूलत: सारखाच असतो. 

आगीच्या विम्याखाली संरक्षण पुरवण्यात येणारी जोखीम - निवासी इमारतींसाठी देण्यात येणाऱ्या आगीच्या बहुतेक विमा पॉलिसींमध्ये खालील गोष्टींमुळे होणाऱ्या नुकसानाला संरक्षण देण्यात येते. 
०    आग
०    आकाशातील वीज पडून होणारे नुकसान
०    विस्फोट / इमारत कोसळणे
०    विमानाद्वारे नुकसान
०    दंगल / संप / द्वेषहेतूने केले गेलेले नुकसान 
०    एसटीएफआय
०    धक्क्यामुळे नुकसान
०    इमारत / जमीन खचणे
०    टाक्यांचा स्फोट 
०    मिसाइल चाचणी
०    स्वयंचलित जल शिडकावा करणाऱ्या यंत्रणेतून गळती
०    झाडाझुडपांमुळे/ जंगताल लागलेली आग 

अनेक विमा कंपन्या मूळ आगीच्या विमा पॉलिसीवर अतिरिक्त फायदे देतात. असा अतिरिक्त फायदा (अ‍ॅड-ऑन) मूळ पॉलिसीमध्ये नसलेल्या जोखमीपासून संरक्षण देतो. वाढीव जोखमीचा धोका पत्करण्यासाठी अधिक हप्ता घेतला जाऊ शकतो. निवासी मालमत्तांसाठी खास शिफारस करण्यात येणारे काही ‘अ‍ॅड-ऑन’ खालीलप्रमाणे आहेत. 

१.    भूकंप
२.    जागेच्या भाडय़ाचे नुकसान-मालमत्ता मालकांसाठी.
३.    पर्यायी वसतिस्थानासाठी लागणारे भाडे-मालमत्तेत राहणाऱ्यांसाठी योग्य
४.    दहशतवाद
५.    स्थापत्यविशारद आणि सव्‍‌र्हेअर यांच्या फीची वाढीव सीमा आणि ढिगारा हलवण्याचा खर्च 

अगीचा विमा घेण्यापूर्वी विचारात घ्यावयाच्या मुख्य गोष्टी-
०    मालमत्तेचे मूल्यांकन आणि पुरेसे विमा संरक्षण
०    विमा रक्कम 

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘विमा रक्कम’. मालमत्तेचा योग्य रकमेचा विमा काढणे महत्त्वाचे असते. जर काही नुकसान झाले तर आगीच्या  विमा पॉलिसीखाली विमा कंपनीने द्यावयाची कमाल रक्कम  किती असेल याची सीमा विमा रक्कम निर्देशित करते. मालमत्तेचे बाजारदराप्रमाणे मूल्य किंवा पुनíनर्माणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या आधारे येणारे मूल्य याच्याबरोबरीने विम्याची रक्कम असली पाहिजे.

बाजारदराप्रमाणे मूल्य (एमव्ही) विरूद्ध  पुनíनर्माणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या आधारे येणारे मूल्य (आरआयव्ही)
पुनíनर्माणासाठी लागणाऱ्या खर्चाच्या आधारे येणारे मूल्य हे साध्या शब्दामध्ये ‘जुन्याच्या जागी नवीन’ दर्शविते. म्हणजे विम्याची रक्कम देताना घसारा किंवा वापराद्वारे कमी झालेले मूल्य वजा केले जात नाही. 

एमव्ही किंवा आरआयव्ही असा कोणताही पर्याय निवडला तरी हप्त्याचा दर बदलत नाही. तरीही मूल्य निर्देशित करणारी विम्याची रक्कम मूलत: वेगळी असते. अशा रीतीने विम्याची रक्कम म्हणून ‘एमव्ही’ असे घोषित करता येत नाही. आणि पॉलिसी आरआयव्ही आधारावर दिली जाते. कारण अशाबाबतीत ‘आवश्यकतेपेक्षा कमी विमा’ हे तत्त्व लागू केले जाते. निवडलेली विम्याची रक्कम पुरेशी आहे, याची खात्री करण्याची हीच वेळ असते. ‘आवश्यकतेपेक्षा कमी विमा’ही संज्ञा हे दर्शविते की, विमाधारकाने एमव्ही / आरआयव्हीपेक्षा कमी रकमेचा विमा घेतला असेल तर त्याला उर्वरित नुकसान सोसावे लागते.
उणे करण्यात येणाऱ्या गोष्टी 

लागू असणाऱ्या उणे करण्यात येणाऱ्या गोष्टी / अतिरिक्त याची नोंद घेण्याकडे दुर्लक्ष करू नये. कारण ही रक्कम विमाधारकासाठी महत्त्वाची असते. या रकमेपेक्षा कमी झालेले नुकसान विमा कंपनीकडून दिले जात नाही. आणि या रकमेपेक्षा अधिकच्या नुकसानाची उर्वरित रक्कम दिली जाते. किमान किती रक्कम उणे केली जाईल हे ठरलेले असले तरी जोखमीची एकंदरीत व्याप्ती विचारात घेऊन विमा कंपनी ही रक्कम वाढवू शकते.

दरपत्रक (कोटेशन) देण्यासाठी लागणारी माहिती-

जेव्हा तुम्ही आगीचा विमा घेण्यासाठी विमा कंपनीकडे जाता; तेव्हा ते दरपत्रक देण्यासाठी विनंती (आरएफक्यू-रिक्वेस्ट फॉर कोटेशन) हे प्रपत्र भरण्यास सांगतात. ज्यामध्ये कोटेशन देण्यासाठी आवश्यक तो तपशील द्यावा लागतो. सामान्यपणे विचारलेली माहिती खालीलप्रमाणे असते.
० जागेच्या वापराविषयी
० बांधकाम आणि इमारतीचे वय
०    बेसमेंट कोणत्या कारणासाठी वापरले जात आहे याविषयी माहिती
०    नुकसानाचा इतिहास
०    मागील विम्याचा तपशील
०    आग संरक्षण सुविधा
०    आसपासच्या परिसरातील पाणीसाठा आणि त्याचे अंतर
०    इतर कोणतेही खास वैशिष्टय़

पॉलिसी डॉक्युमेंट वाचण्याचे महत्त्व:
शेवटचे, पण महत्त्वाचे म्हणजे एकदा का तुम्ही पॉलिसी खरेदी केली की पॉलिसी डॉक्युमेंट काळजीपूर्वक वाचले पाहिजे आणि खालील गोष्टीची शहानिशा केली पाहिजे.
१.    पॉलिसीमध्ये लिहिलेले नाव, पत्ता वगरे तपशील बरोबर आहे की नाही.
२.     कोणत्या संकटांसाठी पॉलिसीसंरक्षण मिळेल आणि ‘अ‍ॅड-ऑन’ गोष्टी.
३.    पॉलिसीखाली उणे करण्यात येणारी गोष्ट / अतिरिक्त
४.    पॉलिसीमध्ये नमूद केलेली खास वॉरंटी, बंधने किंवा वगळलेल्या गोष्टी 
५.    विमाधारकाने पॉलिसी काळात पाळावयाच्या शर्ती व अटी 
६.    दावा उत्पन्न झाल्यास दावा दाखल करण्याची पद्धत 
७.    विमा कंपनीने नमूद केलेल्या ‘कराव्यात’ आणि ‘करू नयेत’ अशा गोष्टी.

हे केले असता दावा दाखल करताना तुम्हाला आश्चर्याचा कोणताही धक्का बसणार नाही.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

वन रुम किचनचे विश्व साकारताना


alt
दिवसेंदिवस घराच्या किमती जसजशा गगनास भिडत आहेत, तसतसं मोठं घर घेणं मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर जात आहे. म्हणूनच ‘सगळे पिकते, पण जागा पिकत नाही’, ही म्हण आज प्रकर्षांने जाणवते. प्रत्येक चौरस फुटाला काही हजार रुपये मोजल्यावर एक चौरस इंचही जागा फुकट घालवणे जड जाते.जेव्हा आम्ही वन रूम किचन डिझाइन करतो; तेव्हा आमच्या डोक्यात ‘मिनिमम फíनचर विथ मॅक्झिमम स्पेस’ हीच संकल्पना असते. याचाच अर्थ जास्तीत जास्त मोकळी जागा मिळवण्यासाठी कमीत कमी फíनचर वापरणे योग्य. सगळ्याच ग्राहकांच्या अपेक्षा असतात की, त्यांच्या पूर्ण गरजा भागवून जास्तीत जास्त मोकळी जागा मिळाली पाहिजे. मुळातच जागेचे क्षेत्रफळ २५० ते ३५० चौरस फूट असते. त्यात टॉयलेट, बाथरूम व पॅसेजमध्ये साधारण ६० ते ७० चौ. फूट जागा जाते. उरलेल्या जागेत सगळे फíनचर बसवायचे म्हणजे एक आव्हान असते.

वन रूम किचन डिझाइन करताना बठकीची खोली हीच तुमची बेडरूम असते. दोन्ही खोल्यांच्या फíनचरच्या व्याख्या वेगवेगळ्या असल्या तरी त्याचे सफाईदारपणे मिश्रण करणे व सगळ्या गरजा भागवून मोठय़ा जागेचा फील आणणे, हाच महत्त्वाचा उद्देश असतो. आपण आता स्पेस सेिव्हग फíनचरचा उपयोग कसा करता येईल ते पाहू .

सर्वप्रथम न लागणाऱ्या अनावश्यक वस्तू काढून टाकणे. त्याचप्रमाणे आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंची यादी करून त्यांची मापं घेऊन ठेवणे. आता आपण लििव्हग रूम कम बेडरूमचा विचार करू. लििव्हग रूममध्ये कमीत कमी तीन ते चार प्रकारांत फíनचर मोडते. ते म्हणजे सीटिंग, टी.व्ही. युनिट, शू रॅक व चौथे म्हणजे डायिनग टेबल. बैठकीसाठी कधीही मोठमोठे सोफा सेट निवडू नयेत. छोटे सोफा सेट निवडले तर जागा कमी व्यापली जाते व सुटसुटीतपणा येतो. सोफा कम बेड हा वन रूम किचनसाठी पर्याय असतोच. जर लििव्हग रूम लहान असेल तर भारतीय बठकीचा पर्यायही उत्तम ठरू शकतो. एकावर एक गाद्या ठेवण्याऐवजी कमी उंचीचे दिवाणही आपण भारतीय बैठक म्हणून वापरू शकतो. या दिवाणांमध्ये ड्रॉवर करून बऱ्याचशा गोष्टी त्यात ठेवू शकतो. तसेच बेड म्हणूनही त्याचा वापर करू शकतो. या दिवाणांवरील मॅटेसेसना वेगवेगळ्या बेडशीट्स वापरून रोज नवा लूक देता येतो. आपल्या इंटिरियर डिझायनरला सांगून जागेच्या लेआऊटप्रमाणे सरळ, ‘एल’ किंवा ‘सी’ आकाराची भारतीय बैठक करून घेऊ शकता. कॉर्नर्समध्ये ग्लास टॉप किंवा वुडन टेबल्स, तसेच कमी उंचीचे सेंटर टेबल त्या सीटिंग बरोबर ठेवल्यास खूप छान असा परिपूर्ण बैठक आकाराला ेयेते. हे सीटिंग कमी उंचीचे असल्याने रूम भरलेली वाटत नाही. सोफ्याच्या तुलनेत हे खूप सुटसुटीत दिसते. मध्यभागी टेबलचा विचार करतानाही एकात एक जाणारी किंवा वेगवेगळ्या लेव्हल्सवर स्लाइिडग टेज करून त्याचा वापर अनेक गोष्टींसाठी करता येतो. त्याचप्रमाणे कमीत कमी जागा व्यापली जाते. लििव्हग रूममधील दुसरा फíनचरचा प्रकार म्हणजे टी.व्ही. युनिट. काही वर्षांपासून प्रचलित असलेल्या शोकेस हा प्रकार बाद झालेला आहे. पूर्वी पूर्ण िभत व्यापणारे टी.व्ही. युनिट असायचे; परंतु आता केवळ टी.व्ही.साठी एक छोटेसे युनिट बनविले जाते व बाकीच्या अनावश्यक गोष्टींना कात्री लावली जाते. टी.व्ही. युनिटची लांबी साधारणपणे ४ फूट, उंची दीड ते २ फूट व रुंदी टी.व्ही. युनिटच्या प्रकारावर अवलंबून असते. म्हणजेच साधारण टी.व्ही. असेल तर तो मावेल एवढी रुंदी ठेवावी लागते व एल.सी.डी. किंवा प्लाझ्मा टी.व्ही. असेल तर केवळ सव्वा ते दीड फूट रुंदी असते. ही रुंदी आपण डी.व्ही.डी. प्लेयर, सेट टॉप बॉक्स व होम थिएटर या गोष्टींच्या आकारावर अवलंबून असते. या सगळ्या गोष्टींची तंतोतंत मापे घेऊन आपला इंटिरियर डिझायनर हे युनिट डिझाइन करून देतो. हे युनिट जमिनीला लागू न देता स्कìटग लेव्हलपासून वर ठेवावे, जेणेकरून ती जागा सुटसुटीत दिसेल व साफसफाई करणेही सोपे जाईल.

पुढील प्रकार म्हणजे शू-रॅक. शू-रॅकची जागा ही शक्यतो मुख्य दरवाजाच्या जवळ आसावी. मुख्य दरवाजा उघडल्यावर जागा असल्यास मागच्या भिंतीवर शू-रॅक बसवू शकता. हल्ली सात इंच रुंदीत बसणारे फोल्डिंग शू-रॅकही उपलब्ध आहेत. त्याच्या आतले शेल्फ हे अ‍ॅडजेस्टेबल असावे. जेणेकरून बुटांच्या, चपलांच्या आकारानुसार ते वर खाली करता येतात. वन रूम किचनमध्ये वॉर्डरोब (कपाट) हे बठकीच्या खोलीत किंवा पॅसेज असल्यास पॅसेजमध्ये डिझाइन करू शकता. साधारण वॉर्डरोबची रुंदी दोन ते सव्वा दोन फूट ठेवण्याऐवजी पावणेदोन फूट केली तरी चालू शकते. आपल्या गरजेनुसार वॉर्डरोब डिझाइन करून घ्यावा व जागेचा पूर्णत: वापर करावा. पुरुषांच्या व स्त्रियांच्या वॉर्डरोबच्या कल्पना व गरजा खूप वेगवेगळ्या असतात. म्हणून सरसकट अंतर्गत सजावट करणे टाळावे. आपल्या आवडीनिवडी व गरजांप्रमाणे इंटिरियर डिझायनरकडून त्याचे डिझाइन करून घ्यावे. ड्रेसिंगकरिता वेगळे युनिट न करता वॉर्डरोबच्या दरवाजावर आतल्या बाजूस आरसा लावून घेऊ शकता. वॉर्डरोबच्या वरच्या बाजूस स्टोरेज करून (डेड स्टोरेज) मोठय़ा बॅगा, सूटकेसेस ठेवू शकता. तसेच खालच्या बाजूस शूजसाठी ६ ते ७ इंच उंचीचे स्लाइिडग ड्रॉवर करता येईल. अभ्यासाकरीता किंवा लिहिण्याकरीता पूर्ण फिक्सड टेबल करण्यापेक्षा फोल्डिंग टेबल हा उत्तम पर्याय आहे. डायनिंग टेबल िभतीवरती फोल्डिंग होऊ शकते. त्याचप्रमाणे नऊ इंच ते एक फूट रुंदीचे ेक्रॉकरी युनिट डिझाइन करून त्याच्यावरही फोल्डिंग डायिनग टेबल करू शकतो. या युनिटमध्ये लागणारी क्रॉकरी तसेच काचेच्या शेल्फ लावून त्यात जॅम, सॉस, लोणचे इत्यादी बाटल्यांसह काटे, चमचेही ठेवता येतात. विशेष म्हणजे हे डायिनग टेबल वापरत नसताना कोणालाही सहजासहजी कळणार नाही की हे एक फोल्डेबल डायिनग टेबल आहे. जागे अभावी अशा प्रकारच्या युनिटला बठकीच्या व किचनच्या मधल्या सामायिक भिंतीवर घेऊ शकता. किंवा ती भिंत काढून त्या ठिकाणी असे मल्टिपर्पज स्टोरेज करू शकता. परंतु हे केवळ सिव्हिल इंजिनीअरच्या सल्ल्याने तसेच सोसायटीच्या परवानगीनेच करावे.

घरातील पुढील महत्त्वाचा भाग म्हणजे किचन. गृहिणीच्या गरजेनुसार, सूचनेनुसार ते डिझाइन करावे. किचन प्लॅटफॉर्मवरील ओव्हरहेड स्टोरेजची उंची खिडकीच्या उंचीपर्यंत मर्यादित ठेवावी. ते चांगले दिसेल व मोकळेही वाटेल. स्टोरेजचा अतिरेक झाला की रूम खूप लहान व कोंदट वाटेल. डब्यांच्या तसेच भांडय़ांच्या मापानुसार प्लॅटफॉर्मच्या खालील स्टेनलेस स्टीलचे ड्रॉवर्स डिझाइन करावेत. या ड्रॉवर्समध्येही अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे किचनमधील इतर उपकरणांची- उदा. मिक्सर, ज्युसर, मायक्रोवेव्ह इत्यादींची यादी करून त्यांची जागा आधीच निश्चित करून त्यानुसार इलेक्ट्रिकल कनेक्शन्स, बोर्डस करून घ्यावेत.

हे सर्व करताना रंगाच्या शेड्सही काळजीपूर्वक वापराव्यात. शक्यतो शीत रंग, लायटर शेड्स वापरावे जेणेकरून घर प्रकाशमय वाटेल. पडदे निवडताना शेअर कर्टन्सचा पर्याय हा वन रूम किचनसाठी उत्तम ठरू शकतो. शक्य झाल्यास मोकळ्या िभतीवर मिरर पॅनिलग केल्यानेही खोलीचे आकारमान मोठे दिसण्यास मदत होते.

याचप्रमाणे आपला कुशल इंटिरियर डिझायनर आपणास अनेक गोष्टी सुचवू शकतो. या गोष्टींचा आपण आपल्या डिझाइनमध्ये तंतोतंत वापर केला तर आपले छोटे घर नक्कीच प्रशस्त व मनमोहक दिसेल, यात शंकाच नाही.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१२

सुरक्षित घर : घराचं नूतनीकरण


alt
आपलं एक स्वत:चं असं हक्काचं घर असावं, जिथून आपल्याला कोणी जा म्हणणार नाही, असं प्रत्येकाला वाटत असतं. पण माणूस हा स्वप्न बघणारा प्राणी आहे; आणि म्हणूनच एक स्वप्न पूर्ण झालं की, माणूस दुसरं स्वप्न बघू लागतो. अर्थातच घर घेतलं की, ते इतरांसारखंच किंवा काकणभर अधिकच सुंदर असावं, असं वाटणंही स्वाभाविक असतं. म्हणूनच नवीन घर घेतल्यावर माणसं त्या घराचं नूतनीकरण हाती घेतात. तसंच नियोजनाच्या बाबतीत सुसूत्रता असणारे आणि त्याकरताच ठरावीक वर्षांनंतर नित्यनेमानं घराच्या नूतनीकरणाचं काम घेणारे चांगले नियोजकही असतात. आपलं घर सुंदर दिसावं, यासाठी आपण जितके दक्ष असतो, तितक्याच दक्षतेने आपलं घर ज्या वास्तूत किंवा इमारतीत आहे, तिचीही काळजी घेणं, तिची देखभाल करणं हेही आवश्यक असतं.


माणसाच्या आयुष्याला जशी मर्यादा असते, तशीच मर्यादा इमारतींच्याही आयुष्याला असते. इमारतीच्या आयुष्यासंदर्भात ‘इकॉनॉमिकल लाइफ’ अशी संज्ञा वापरली जाते. या संज्ञेचा नेमका अर्थ समजून घ्यायचा तर असं म्हणता येईल की, एखादी इमारत जुनी झाल्यावर तिच्यावर होणारा खर्च, जेव्हा तिच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा किंवा फायद्यापेक्षा अधिक व्हायला लागतो; तेव्हा तिचं ‘इकॉनॉमिकल लाइफ’ संपलं असं मानायला हरकत नाही. म्हातारपण माणसाचं असो वा इमारतीचं, म्हातारपण म्हटलं की आरोग्यविषयक कुरबुरी आल्या आणि कालांतरानं ओढवणारा मृत्यूही आला. परंतु एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढवतो तेव्हा फक्त ती व्यक्तीच मरण पावते. पण इमारत कोसळली की मात्र त्या इमारतीत वावरणाऱ्या अनेक व्यक्ती आपले प्राण गमावू शकतात. त्यामुळे कुठलीही इमारत कोसळेपर्यंत न थांबता, वेळीच तिची आवश्यक ती मोठी दुरूस्ती अगर पुनर्बाधणी करून घेणं गरजेचं असतं. इमारतीच्या बांधकामापासूनच तिची योग्य ती काळजी घेण्याची जबाबदारी जशी इमारत बांधणारा बिल्डर, कंत्राटदार, आíकटेक्ट अगर सिव्हिल इंजिनीअर यांची असते, तशीच तिचा वापर करायला लागल्यावर आपल्या सर्वाचीही ती तितकीच जबाबदारी असते. यासाठी सिव्हिल इंजिनीअरिंगचं सखोल ज्ञान असण्याची गरज नाही. परंतु इमारतीच्या संदर्भातली काही जुजबी, प्राथमिक परंतु महत्त्वाची माहिती आपण करून घेतली, तर आपल्या इमारतीची आणि पर्यायाने आपल्या घराची काळजी घेणं आपल्याला शक्य होईल.


आपलं घर सुंदर दिसावं असं कोणाला वाटणार नाही? परंतु घराचं सौंदर्य वाढवताना आपण त्याच्या सुरक्षिततेबरोबर किंवा एकूणच इमारतीच्या आयुष्याबरोबर तर खेळत नाही ना, याची खबरदारी घेणं गरजेचं आहे, नाहीतर काही वर्षांपूर्वी मुंबईत बोरिवली इथं लक्ष्मीछाया इमारत कोसळून जसं मोठं नुकसान झालं होतं, तसं व्हायची शक्यता असते. पाण्यामुळे माणसांना जसे आजार होतात, तसे इमारतींना होतात का, ते कुठले आणि त्यावर उपाय काय, भूकंपप्रवण क्षेत्रांमध्ये इमारतींना कुठला धोका संभवतो, भूकंपाच्या वेळी या इमारतींखालच्या जमिनीत नेमकं काय घडत असतं, आपल्या राज्यातली भूकंपप्रवण क्षेत्रं कुठली हे जाणूान घेणंही महत्त्वाचं आहे. 

त्याबरोबरच आपण कंत्राटदाराकडून फसवले जाऊ नये, यासाठी या कामासंदर्भातली जुजबी प्राथमिक माहिती आपल्यापकी प्रत्येकाला असणं गरजेचं असतं. त्यासाठी घराच्या नूतनीकरणाचं किंवा दुरुस्तीचं काम हाती घेताना नेमकी कोणती काळजी घेणं आवश्यक असतं, कंत्राटदाराला कंत्राट देताना कोणत्या प्रकारे देता येईल, मूलभूत बांधकाम साहित्याच्या दर्जाविषयी कशी खात्री करून घ्यायची, स्वयंपाकाचा ओटा घालताना, फ्लोअिरगच्या लाद्या घालताना, घराचं रंगकाम करून घेताना कोणती मूलभूत तांत्रिक माहिती आपल्याला असायला हवी. सध्या पुनर्वकिासाची कामंही जोरात सुरू असतात. अशा वेळी नवी इमारत बांधली जात असताना संपूर्ण इमारतीचा भार तोलून धरणाऱ्या इमारतीच्या पायासंदर्भात कोणती काळजी घ्यावी, जुन्या घरांमध्ये अनेकदा बीम, कॉलमवर तडे गेलेले आढळतात. या तडय़ांच्या किंवा भेगांच्या माध्यमातून इमारतीच्या आरोग्याची आपल्याला कल्पना कशी येऊ शकते, ही माहिती असणे आवश्यक आहे.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

मेकओव्हर : जागेचं सुनियोजन


alt
जागेचं नियोजन किंवा स्पेस प्लॅिनग हा इंटीरिअरमधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे. किंबहुना या आराखडय़ावरच तुमच्या संपूर्ण घराचं सुनियोजन अवलंबून असतं. उपलब्ध जागेच्या नियोजनाचा आराखडा चोख असेल तर असं घर नुसतंच सुंदर दिसत नाही तर तिथला वावर अधिक सहज व सुकर होतो. 

लेखात दिलेला मूळ आराखडा (एग्झििस्टग प्लॅन) बघितल्यावर लक्षात येईल की, हा वन बीएचके फ्लॅट आहे. या रॉ फ्लॅटच्या इंटीरिअरसाठी ग्राहकाला एकूण तीन आराखडे देण्यात आले. यातील पहिला आराखडा हा ग्राहकाला अपेक्षित असल्याप्रमाणे आखण्यात आला आहे. यामध्ये लििव्हग रूममध्ये प्रवेश केल्यावर डाव्या व उजव्या बाजूला बठकीची रचना  केली आहे. समोर दिसणाऱ्या  कोपऱ्याच्या जागेत डायिनग टेबलची रचना केली आहे. 

स्वयंपाकघरात प्रवेश करण्याआधी (बाहेरच्या बाजूला) उजव्या हाताला स्टोअरेज कम सíव्हस काऊंटर देण्यात आलेलं आहे. किचनमध्ये शिरल्यावर उजव्या हाताला वॉिशग मशीन, डाव्या हाताला फ्रीजची जागा असून किचनमध्ये समांतर असे दोन प्लॅटफॉर्म दिलेले आहेत. प्लॅटफॉर्मच्या खाली व वर स्टोअरेजसाठी जागा आहे. या आराखडय़ात इंडियन टॉयलेटऐवजी वेस्टर्न डब्ल्यूसी करून दिला आणि बाथरूममध्ये आणखी एक जास्तीचा वेस्टर्न डब्ल्यूसी दिला आहे. बेडरूममध्ये एक बेड, साइड टेबल, वॉर्डरोब, स्टडी टेबल या चार गोष्टींचा अंतर्भाव केला आहे. पुढील दोन आराखडे हे शास्त्रोक्त पद्धतीने सजविले आहेत. ते समजून घेतल्यावर यातील वैविध्य लगेचच लक्षात येईल.

दुसऱ्या आराखडय़ात हॉलच्या इथली िभत तोडण्यात आली आहे आणि इथे दोन प्रवेश सूचविले आहेत. लििव्हग रूममध्ये प्रेवश केल्यावर समोर सीटिंग एरिया केला आहे आणि  मध्यभागी पॅनलिंग. उजव्या हाताला डायिनग टेबल. कॉर्नरला टीव्ही युनिट आहे. इथे आणखी एक बदल करता येईल, तो म्हणजे टीव्ही युनिटच्या जागी क्रिएटिव्ह पॅनिलग करून समोरच्या िभतीवर फ्लॅटस्क्रीनसाठी रचना करता येईल. 

डायिनग टेबलच्या इथून किचनमध्ये जाण्यासाठी मार्ग केलाय. इथे उजव्या हाताला मॉडय़ुलर स्टोअरेज दिलंय, तर त्याच्यासमोर वॉिशग मशीन आणि फ्रीजची जागा केली आहे. याच्या बाजूला सíव्हस काऊंटर दिलाय. दुसऱ्या बाजूला प्रवेश केल्यावर वॉश बेसीन देण्यात आलंय. मूळ आराखडय़ातील बाथरूमची जागा कमी करून टॉयलेटची जागा वाढवून ते बेडरूमला जोडून शॉवर एरिया केला आहे. या ठिकाणी बेसीनची सोयही केली आहे. बेडरूममध्ये बेडच्या बाजूला साइड टेबल, ड्रेसिंग टेबल तर समोरच्या बाजूला स्टोअरेज आणि स्टोअरेजच्या बाजूला स्टडी टेबल ठेवलेलं आहे. 

आता आपण तिसऱ्या आराखडय़ाचा विचार करूया. यामध्ये लििव्हग रूमच्या इथली उजव्या बाजूची िभत संपूर्णत: तोडलेली आहे. मूळ आराखडा आणि पहिला आराखडा यामध्ये जी मधली जागा आहे ती तसं पाहिलं तर फारशी वापरात येत नव्हती. म्हणून दुसऱ्या आणि तिसऱ्या आराखडय़ामध्ये त्या जागेचा पुरेपूर वापर करण्यासाठी िभत तोडण्यात आली. तिसऱ्या आराखडय़ामध्ये सगळी िभत तोडल्यामुळे हॉल मोठा, प्रशस्त दिसतोय. डाव्या बाजूला बैठकीसाठीची जागा तशीच ठेवली आहे. उजव्या बाजूला  फ्लॅटस्क्रीनची जागा केली आहे. या आराखडय़ात कॉमन टॉयलेट हे किचनच्या बाजूला देण्यात आलं आहे. उजव्या हाताला वॉिशग मशीन, फ्रीज ठेवलाय तर त्याच्यासमोर अ‍ॅडिशनल प्लॅटफॉर्म करून तो चॉिपग-स्लायसिंगसाठी किंवा अन्य कारणांसाठी वापरता येईल. या इथेसुद्धा समांतर ओटे असून स्टोअरेजची रचना सारखीच आहे. बेडरूममध्ये बेड िभतीला लागून ठेवाला आहे व तिथे बाजूला स्टडी टेबल आहे. बेडच्या स्ोमोर वॉर्डरोब असून त्याच्या बाजूला क्रिएटिव्ह पॅनिलग केलंय. ही जागा अनेक कारणांसाठी वापरता येईल. 


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२

ग्राहकाला घर देण्यापूर्वी...


alt

विकासकांनी सदनिकांची विक्री करताना ग्राहकांना कोणकोणत्या गोष्टींची माहिती द्यावी, याविषयी..

‘महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री’ ही विकासकांची शिखर संस्था आहे. या संस्थेने आपल्या सभासद विकासकांसाठी आचारसंहिता तयार केली असून, ती १३ सप्टेंबर २०११ पासून अमलात आली आहे. विकासकांनी आपल्या सदनिकांची विक्री करताना सदनिका विकत घेणाऱ्यांसमवेत कसा व्यवहार करावा, याबाबतचे केलेले मार्गदर्शन हे या आचारसंहितेचे स्वरूप आहे. ही आचारसंहिता सर्व सभासद विकासकांना बंधनकारक आहे. तिचा भंग करणाऱ्या सभासद विकासकाला पूर्ण चौकशीअंती सभासदत्वावरून काढून टाकण्याची तरतूद आहे.

आचारसंहितेत विकासकांसाठी नमूद केलेल्या अटी-
*    विकासकाने गाळा खरेदीदाराबरोबर गाळा विक्रीखत करताना  गाळा खरेदी करू इच्छिणाऱ्याला मंजुरी अधिकाऱ्याने मंजूर केलेले इमारतीचे आराखडे, कमेन्टमेंट सर्टिफिकेट, एन. ए. परवानगी, (आवश्यक असल्यास) कमाल जमीन धारणा कायद्यात मिळविलेली सूट, इत्यादींना मिळालेली मंजुरी ही कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत.

*    सदनिकेचे बुकिंग करताना/सदनिकेची विक्री करताना, मोफा कायद्यातील सर्व संबंधित तरतुदींची माहिती देणे आवश्यक आहे. 

*    विक्रीबाबतच्या सर्व बाजू गाळा खरेदीदारापुढे मांडाणे.

*    विक्री व्यवहारात भविष्यकाळात वाढ होण्याची शक्यता असली, तर ही वाढ कोणत्या मुद्दय़ावर होणे शक्य आहे, त्याची माहिती द्यावी.

*    वॉरंटीचे स्वरूप, तिचा कालावधी ही वॉरंटी विकासकामार्फत पुरवठादारांकडून ग्राहकांपर्यंत पोहोचविली जात आहे, याची माहिती देण्यात यावी.

*    विकसित झालेले क्षेत्र, तसेच संपूर्ण प्रकल्प तयार कधी होईल, तो हस्तांतरीत करण्याची पद्धत, तसेच कोणत्या परिस्थितीत गाळा हस्तांतरीत करण्यासाठी विलंब लागण्याची शक्यता आहे, त्या परिस्थितीची माहिती देणे.    

*    जमिनीच्या टायटलची सविस्तर माहिती द्यावी.

*    ग्राहकांनी रकमेचे हप्ते कसे भरावेत, त्याची माहिती देणे. उदा. हप्त्यांचा कालावधी, बांधकामाचा प्रत्येक टप्पा इत्यादी.

*    विकासकाच्या नियंत्रणापलीकडील कारणांमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब होत असेल तर त्याबाबतची कारणे देणे. ही कारणे शक्य तितक्या लवकर द्यावीत.

*    ग्राहकांना कोणत्या परिस्थितीत लिक्विडेटेड डॅमेजेस देण्यात येतील. हे डॅमेजेस कसे ठरविले जातील आणि ते देण्याची पद्धत याबद्दलही माहिती द्यावी.

*    व्यवहारात जास्तीत जास्त स्पष्टता आणि पारदर्शकता आणण्यासाठी व्यवहाराला वेळोवेळी लागू होणारे कर यांची ग्राहकांना माहिती देण्यात येईल.

*    कार्पेट एरिया- मोफा कायद्यातील तरतुदींनुसार सदनिकेचा कार्पेट एरिया जाहीर करणे.

*    कायद्याचे पालन- इमारतींचे बांधकाम करताना इमारत नियमांचे काटेकोर पालन करू, असे ग्राहकांना आश्वासन देणे. या नियमांचा विकासकांकडून भंग झाल्यास ही हमी कंप्लिशन सर्टिफिकेट आणि/ किंवा ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या स्वरूपात असेल.

*    विकासकांकडून जाणता/अजाणता काही चुका  झाल्यास त्या चुकांचा ग्राहकांना फटका बसू नये.

*    कायद्याने विहित केलेल्या कालावधीत सोसायटीच्या नावे जमिनीचे कन्व्हेअन्स करून देऊ.

सदनिकांचा ताबा ग्राहकांना कधी दिला जाईल ते इमारतीच्या आराखडय़ाला मिळालेल्या मंजुरीची तारीख/बिल्डिंग परमिट मिळाल्याची तारीख किंवा विकासक आणि ग्राहक यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार ठरविले जाईल.

पैशांचा परतावा- करारात नमूद केलेल्या मुदतीनंतर इमारतीचे बाह्य काम पूर्ण झाल्यामुळे विहित मुदतीत ग्राहकाला त्याची सदनिका देता आली नाही, तर विकासक करारात नमूद केल्याप्रमाणे गाळा खरेदीदाराकडून घेतलेले सर्व पैसे व्याजासह परत करील. पैसे परत करण्याची पद्धत किंवा नुकसानभरपाईबद्दल करारात स्पष्टपणे नमूद केले जाईल.

सदनिकेचा ताबा- इमारत वेळेत पूर्ण करणे, खरेदीदाराला सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा देणे, या बाबी विकासक कसोशीने पाळाव्यात.
कंप्लिशन आणि ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळवून देणे ही विकासकाची जबाबदारी राहील.

सोसायटी स्थापन करणे- कायद्याप्रमाणे गाळेधारकांची सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्यासाठी विकासकाने पावले उचलावीत.

असे विकासकांसाठीच्या या आचारसंहितेचे स्वरूप आहे. अर्थात ही आचारसंहिता काटेकोरपणे पाळली जात आहे, हे पाहण्याची जबाबदारी गाळेधारकांची आहे.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com

‘बिल्डर लॉबी’पुढे राज्य सरकार शक्तिहीन!


alt
पोलीस यंत्रणा नागरिकांसाठी आहे की बिल्डर लॉबीच्या संरक्षणासाठी, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने गुरुवारी पोलीस आणि राज्य सरकारला फैलावर घेतले. बिल्डर लॉबीच्या सुळसुळाटापुढे राज्य सरकार  शक्तिहीन असल्याचेच चित्र सध्या राज्यभर दिसत आहे, असा सणसणीत टोलाही या वेळी न्यायालयाने लगावला. वरळी कोळीवाडय़ातील आपली जागा बळकाविण्यासाठी त्यांना बिल्डर संदेश गोवलकर, त्याची पत्नी आणि त्यांच्या गुंडांनी आपणास मारहाण केली, अशी अनुसया पाटील या ६८ वर्षांच्या वृद्धेची तक्रार होती. याबाबत दादर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यासाठी त्या गेल्या होत्या; परंतु विजय मोरे या पोलीस उपनिरीक्षकाने गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला. त्यानंतर पाटील यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे जाऊन संबंधित बिल्डरविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचे आदेश देण्याची विनंती केली.

परंतु त्यांच्या पदरी तेथेही निराशा पडल्याने पाटील यांनी अॅड. जितेंद्र मिश्रा यांच्याकरवी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे आणि न्यायमूर्ती प्रमोद कोदे यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी त्यावर सुनावणी झाली. पोलीस उपनिरीक्षक मोरे यांनी पाटील यांची तक्रार केवळ अदखलपात्र तक्रार म्हणून नोंद केली. त्यानंतर या प्रकरणी कुठलाच तपास झाला नाही, असे अॅड. मिश्रा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर संतापलेल्या न्यायालयाने ही समस्या सध्या सर्वत्र दिसत असल्याचे नमूद करीत बिल्डर लॉबीच्या प्रभावापुढे राज्य सरकार शक्तिहीन बनल्याचे ताशेरे ओढले.

एवढेच नव्हे, तर पाटील यांच्यासारख्या अनेक प्रकरणांमधून बिल्डरांचे गुंड जागा बळकाविण्यासाठी जागेच्या मालकांची छळवणूक करीत असल्याचे आणि संरक्षणाची जबाबदारी पार पाडण्याऐवजी पोलीस त्याकडे काणाडोळा करीत असल्याचे पुढे येत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने या वेळी नोंदविले.

त्यावर सुरुवातीच्या तक्रारीनंतर पोलीस चौकशी करतात, परंतु त्यांचेही हात बांधलेले असून वरिष्ठांकडून जोपर्यंत गुन्हा नोंदवून घेण्याचे आदेश दिले जात नाहीत, तोपर्यंत गुन्हा नोंदविला जात नसल्याचे सरकारी वकिलांकडून या वेळी सांगण्यात आले. परंतु या उत्तरावर संतापून, पोलीस यंत्रणा नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आहे की बिल्डर लॉबीच्या संरक्षणासाठी आहे, असा सवाल करीत न्यायालयाने पोलीस व राज्य सरकारला धारेवर धरले. गरीब आणि असाहाय्य लोकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची आहे. परंतु बिल्डर लॉबी आणि पोलिसांच्या कृतीतून देशात आणि मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या गरीब आणि असाहाय्य लोकांना कुठलेच अधिकार नसल्याचेच दिसत असल्याचेही न्यायालय म्हणाले. त्याचप्रमाणे या प्रकरणी कारवाई केली गेली नाही, तर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालय आपला निर्णय सुनावील, असा इशाराही न्यायालयाने या वेळी अतिरिक्त सरकारी वकिलांना दिला.


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :-
Ravindra Mhatre Email Id :- ravimhatre1172@gmail.com