DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

दादरमधील भूखंड टॉवरसाठी बिल्डरला आंदण



उपजिल्हाधिकाऱ्यानेच लपविली संपादनाची वस्तुस्थिती



दादर पश्चिमेकडील रानडे रोडवरील मोक्याच्या ठिकाणी असलेला भूखंड बिल्डरला टॉवरसाठी उपलब्ध 
व्हावा, यासाठी संपादनाची कारवाई रद्द करण्याची प्रक्रिया म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाने सुरू
 केलेली असतानाच हा भूखंड संपादित झाल्याची बाब लपवून ठेवण्यामागे शासनाच्या जिल्हाधिकारी 
कार्यालयातील संपादन विभागातील एक वरिष्ठ अधिकारी असल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत निष्पन्न
 झाल्याचे कळते.


 रानडे रोडवरील उपकरप्राप्त इमारत असलेला सुमारे २० हजार चौरस फुट इतका भूखंड बिल्डरला 
टॉवर बांधण्यासाठी आंदण देण्याचा डाव असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने कालच्या अंकात प्रसिद्ध 
केल्यानंतर एकच खळबळ माजली. म्हाडातील आणखी एक घोटाळा उघड झाल्याने संक्रमण
 शिबिरात खितपत पडलेल्या रहिवाशांच्या हक्काच्या सदनिकांवरच त्यामुळे गदा येणार होती. 
वास्तविक एखादा भूखंड संपादित झाला तर तो खासगी बिल्डरला पुनर्विकासासाठी देता येत
 नाही. असे असतानाही या भूखंडावर पुनर्विकास प्रस्ताव राबविण्याच्या हालचाली सुरू 
झाल्या होत्या. हे वृत्त प्रसिद्ध होताच गृहनिर्माण विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक
 घेऊन याबाबत सविस्तर माहिती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. गृहनिर्माण विभागाचे प्रधान
 सचिव गौतम चॅटर्जी हे रजेवर असल्यामुळे त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. ही माहिती 
लपवून ठेवण्यामागे एक उपजिल्हाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी चौकशी
 केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वास्तविक या भूखंडाची संपादनाची कारवाई अगोदरच पूर्ण झाल्याचे पत्र जून २००९ मध्ये 
उपजिल्हाधिकारी तसेच विशेष भूसंपादन अधिकारी यांनी अवर सचिवांना पाठविले तेव्हाच
 ही बाब उघड झाली. अवर सचिव पुलकुंडवार यांनी सादर केलेल्या टीप्पणीवर शेरा मारताना 
उपसचिव दिलीप शिंदे यांनी ही गंभीर बाब आहे व अहवाल मागविणे योग्य इतकेच नमूद केले. 
मात्र तत्कालीन गृहनिर्माण सचिव सिताराम कुंटे यांनी मात्र याची गंभीर दखल घेतल्याचे
 टिप्पणीवरून दिसून येत आहे. त्यांनी म्हटले आहे की, हा प्रकार पूर्ण सत्य दडवून ठेवायचे
आणि अर्धसत्य किंवा असत्याच्या आधारावर अहवाल पाठवून शासनाला चुकीचे निर्णय 
घ्यायला भाग पाडायचे हा म्हाडाच्या कामकाजाचा लांच्छनास्पद प्रकार पुन्हा पुढे आला आहे.
 म्हणून ज्या अधिकाऱ्यांनी हे केले त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
 वास्तविक ही बाब तत्कालीन उपजिल्हाधिकारी व विशेष भूसंपादन अधिकाऱ्याने लपवून 
ठेवली, असा बचावाचा पवित्रा दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने घेतला आहे. हा उपजिल्हाधिकारी
 कोण आहे हेही स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावीत
 करण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही

दादरमधील भूखंड टॉवरसाठी बिल्डरला आंदण

Dadoji Kondev Co-operative SocietyOffice ;- Adinath Gurudatta Mandir,
Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071.
Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा