चंद्रशेखर प्रभू
शहर नियोजन तज्ज्ञ
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com
शहर नियोजन तज्ज्ञ
१ ) आमच्या इमारतीचा पुनर्विकास होऊन अडीच वर्षे झाली तरी अजूनही बिल्डरने सोसायटी स्थापन केलेली नाही . आमची इमारत गृह संकुलात असून चार टॉवर्स बांधून झाले आहेत .बिल्डर सर्व रहिवाश्यांकडून जो देखभाल खर्च जमा करतो तो बिल्टअप एरीयावर आकारत असून त्यावर सर्व्हीस टॅक्सही घेतो . प्रत्यक्षात खरेदी खतामध्ये कार्पेट एरीयाचा उल्लेख आहेजो बिल्टअप एरीयापेक्षा कमी आहे . तरी सभासदांनी कोणत्या एरीयाप्रमाणे पैसे द्यावेत ? तसेच लाइटचा मीटर रहिवाश्यांच्या नावावर करून देण्याची जबाबदारी कुणाची आहे ?
केदार देशपांडे , ठाणे
उत्तर - लाइटचा मीटर रहिवाश्यांचा नावावर करून देणे ही जबाबदारी विकसकाची असते . सोसायटीची स्थापना करणे हे कामही त्यानेच करायचे आहे . खरेदी खतावर जे लिहिले आहेत्यानुसारच देखभाल खर्च आकाराला गेला पाहिजे . पण जर त्यानुसार होत नसेल आणि खरेदीखताचे उल्लंघन केले जात असेल तर याबाबत कायदेशीर सल्ला घ्यावा आणि विकसकालाकायदेशीर समज द्यावी .
.............
प्रश्न २ ) आम्ही दीड वर्षापूर्वी डेव्हलपरने विकासाकरीता घेतलेल्या प्लॉटवरील एका इमारतीत एक फ्लॅट घेतला . त्यावेळी विकसकाने ताबापत्र न देता ताबा दिला आणि लवकरच ओसीमिळवून अपार्टमेंट करून देतो असे सांगितले . मात्र आता ओसीविषयी विचारले असता माझा अजून एफएसआय शिल्लक आहे , तो वापरून अजून दोन माळे चढवल्यानंतर ओसी मिळेलअसे सांगतो . तसेच फ्लॅट घेताना कव्हर पार्कींग देण्याचे बोलला होता पण आता त्याचे रहिवाश्यांकडून वेगळे पैसे मागतो . यावरून वाद झाल्याने बिल्डरने लिफ्ट बंद केली आहे . आम्हीतरीही मेन्टेनन्स नियमित भरतो आहोत . तर वरील त्रासाबाबत कुणाकडे तक्रार करावी ?
दीपाली काकडे , बोरीवली .
उत्तर - अशा प्रकारच्या तक्रारी अनेक वर्षांपासून येत आहेत . तरीही लोक बिल्डरकडेच जातात याचे आश्चर्य वाटते . अशा गोष्टींपासूनच वाचण्यासाठी स्वयंविकास करावा अशी सूचनाआम्ही वारंवार देतो . बिल्डरशी झालेल्या तुमच्या कराराची अंमलबजावणी व्हायला पाहजिे पण तसे होत नसल्यास कायद्याचाच आधार घ्यावा लागेल . कायदेतज्ज्ञांकडून याबाबतअधिक माहिती मिळविता येईल . मात्र वीज , पाणी , लिफ्ट या मूलभूत गरजा असून त्या कोणत्याही परिस्थिीतीत बंद करता येत नाहीत . याप्रश्नी आपण कायद्याची मदत घ्यावी .
............
प्रश्न ३ ) आमच्या इथे ३३ / ७ अंतर्गत इस्टेट आणि झोपटपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवला जात आहे . परंतु झोपडपट्टीत एक किंवा दोन घरं अस्तित्वात असताना त्याव्यतिरिक्तफोटोपास दाखवून डेव्हलपर्सकडून आणखी जागा मिळविता येते का ? घर नसताना काही लोकांना फोटोपास कसे दिले जातात याची चौकशी कशी केली जाईल ? याचा परिणामपुनर्विकासावर होईल का ?
- लतेश कोरगावकर , वडाळा .
उत्तर - जागा अस्तित्वात नसताना खोटे फोटोपास दाखवून जर कुणी जागा मिळविण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याबाबत योग्य ती तक्रार कलेक्टर , एसआरए , बीएमसी , सरकारकडेकरता येते . तक्रार केली नाही तर जागा नसणाऱ्यांना जागा देण्यास आपली मूक संमती आहे असं समजलं जाईल . मात्र घर अस्तित्वात असलेल्यांना एक किंवा दोन पेक्षा अधिक जागामिळविता येणार नाहीत . चुकीच्या गोष्टी होत असतील याची खात्री असेल तर तक्रार करणे हा मार्ग आहे .
.....
प्रश्न ४ ) दहा वर्षांपूर्वी आम्ही आमची जमीन एका बिल्डरला विकास करण्याकरीता दिली . त्याने ती स्वत : च्या नावावर करून घेत त्यावर तीन मजली अपार्टमेंटसाठी पालिकेकडूनपरवानगी घेतली . इमारतीच्या तळमजल्यावर त्याने ज्यादा एफएसआय विकत घेऊन दोन फ्लॅट बांधले . त्यामुळे पार्किंगसाठी असलेली जागा कमी झाली . आता तो पार्कींगच्या काहीभागावर स्वत : चा हक्क सांगून अपार्टमेंटमधील लोकांना गाड्या पार्क करू देत नाही . तसेच एकूण चौदा फ्लॅट असून अजून सोसायटी निर्माण झालेली नाही . अशा परिस्थितीत बिल्डरपार्कींगच्या जागेवर हक्क सांगू शकतो का आणि नसल्यास त्याच्यावर कोणती कारवाई करू शकतो ?
- अनिल राऊत , पुणे
उत्तर - करारात नेमके काय नमूद केले आहे यावर सगळे अवलंबून आहे . दहा वर्षांपूर्वी नेमका कोणत्या पद्धतीचा करार झाला याविषयी आम्हाला कल्पना नाही . करारातील मुद्दे एकदातपासून पाहावेत आणि त्याची अंमलबजावणी होत आहे की उल्लंघन होत आहे हे तपासून पाहावे . सर्वसाधारणत : पार्कींगच्या जागेवर बिल्डरला हक्क सांगण्याची मुभा करारात नसतेपण आपण आपल्या करारात बिल्डरला तशी मुभा दिली आहे का हे पाहावे लागेल . त्यासाठी करारात नमूद केलेल्या गोष्टींचा धांडोळा घ्यावा लागेल .
Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
Email Id :- ravimhatre1172@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा