DKN ADDhitz

हा ब्लॉग शोधा

Haldi Kunku 2012

(SRA Self Devlopment Project) Guru Datta Jyanti and Haldi Kunku Samarabh Photes

शनिवार, ३ डिसेंबर, २०११

वरदान

महाराष्ट्र राज्य शासनाच्या एस.आर.ए. योजनेचा मूळ उद्देश आहे गलिच्छ झोपडपट्टय़ा व जुन्या धोकादायक चाळी व इमारतींचे उच्चाटन करणे. तसेच मूळ भाडेकरू रहिवाशांचे रहात असलेल्या जमिनींवर पुनर्वसन करणे. वर्षांनुवर्षे भाडे नियंत्रण कायदा-१९४० प्रमाणे छोटय़ा पण जरुरीपुरत्या जागेत राहणारा भाडेकरू सहजासहजी मालमत्ता कर, देखभाल खर्च हजारांच्या आकडय़ात कसा काय खर्च करणार? तसेच चाळ मालक स्वत:चा मालकी हक्क भाडेकरूंना सहजासहजी कसा बहाल करणार? या दोघांचा सुवर्णमध्य शोधून पुनर्विकास योजना आखण्यात आली आहे.


वर्षांनुवर्षे १००/२०० रुपये भाडे भरणारा भाडेकरू मालमत्ता कर कसा भरणार, म्हणून मालमत्ता करामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेने पुनर्विकसित इमारतींना करसवलत दिली आहे. सदर करसवलत अउळ-144 (D) प्रमाणे पुढीलप्रमाणे- पहिली १० वर्षे २०% कर भरणे.
नंतरची ५ वर्षे ५०% कर भरणे.

त्यानंतरची ५ वर्षे ८०% कर भरणे. एकूण येणाऱ्या मालमत्ता कराला १००% ऐवजी सुरुवातीला २० वर्षे वरीलप्रमाणे करसवलत दिली आहे. सदर सवलत फक्त मूळ भाडेकरूंसाठी आहे. तसेच सदर सवलत फक्त ३५० चौ.फूट चटई क्षेत्रापर्यंतच्या सदनिकांसाठी आहे. त्यापेक्षा मोठय़ा सदनिकांना १००% मालमत्ता कर भरावा लागतो. सदर चौ.फुटांची  मर्यादा ५५०% चौ.फुटांपर्यंत वाढविण्यासाठी पुनर्विकसित सोसायटी सध्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी अर्ज निवेदने सरकारदरबारी सादर झाली आहेत. एस.आर.ए. योजनेत मिळालेले घर भाडय़ाच्या खोलीपेक्षा निश्चितच मोठे म्हणजे कमीत कमी २४० चौ.फूट व त्यापेक्षा मोठय़ा क्षेत्रफळाचे असते. तसेच सदनिकाधारक नवीन पुनर्विकसित इमारतीत येताच भाडेकरू न राहता सदनिकेचा मालक होतो. भाडेकरूला आपोआप मालकी तत्त्वावर घर मिळते व तेदेखील पूर्वी रहात असलेल्या जागेवरच. हे या योजनेचे बलस्थान आहे.
नवीन इमारतीत मूळ भाडेकरू राहायला येताच, मूळ मालकाचा मालकी हक्क सदनिकाधारकांना मिळतो. या बदल्यात मालकाला हवी असलेली रक्कम म्हणजेच जमीन मूल्य व त्यांच्या निवासासाठी मालकी तत्त्वावर सदनिका विकासक देतो. या सर्वाच्या बदल्यात जादा F.S.I. मधून अतिरिक्त सदनिका विकून विकासक नफा कमावतो. मालकाला जमीनमूल्य मिळेपर्यंत विकासकाला सदनिका (अतिरिक्त) कायदेशीररीत्या विकता येत नाहीत. जमीनमूल्य न मिळाल्यास मालक इमारतीचे वीज, पाणी बंद करण्याबाबत कायदेशीररीत्या कारवाई करून जमीनमूल्य वसूल करू शकतो. ही पुनर्विकास योजनेतील तरतूद आहे. मूळ भाडेकरूंना पुनर्विकसित घर १००% मालकी तत्त्वावर हवे असल्यास डिम्ड कन्व्हेयन्स होणे आवश्यक आहे. त्यासाठी १००% भाडेकरूंनी मुद्रांक शुल्क सवलतीच्या दरात भरणे क्रमप्राप्त आहे. सुरुवातीला ज्या सभासदांनी सोसायटी स्थापन केली आहे त्यांनी उर्वरित सभासदांना सभासदत्वाचे रितसर आमंत्रण देणे व सर्वाना सोसायटी सभासदत्व बहाल करणे सक्तीचे आहे. या सर्व बाबींची पूर्तता केल्यानंतर चाळ मालक व विकासक यांचा इमारतीवरचा मालकी हक्क संपुष्टात येतो आणि सोसायटी  इमारतीची मालक होते. पुनर्विकास एस.आर.ए. योजनेप्रमाणे नवीन इमारत बांधण्यास २.५ ते ३.० F.S.I. मिळतो. वाढीव F.S.I.  मध्ये मूळ भाडेकरूसाठी व जादा सदनिका बांधून मालक त्या विकू शकतो किंवा स्वत: वापरू शकतो. पुनर्विकासामुळे रेंट अ‍ॅक्ट १९४०च्या जाचक नियमांपासून मालकाची सुटका होते.

वाढीव F.S.I च्या तरतुदीनुसार, साल १९९५ पूर्वी रहात असलेल्या भाडेकरूंना व अ‍ॅनेक्चर-२ झोपडपट्टीधारकांना २६९ चौ. फुटांपेक्षा जास्त क्षेत्रफळाची जागा देता येत नाही. ३३(७)च्या तरतुदीनुसार जुन्या चाळींचा पुनर्विकास करण्यासाठी उपकरप्राप्त (Cessed Buildings) ज्या साल १९४० व त्यापूर्वी बांधल्या आहेत अशा चाळी/इमारतींसाठी सध्या २.५ ते ३.० पर्यंत F.S.I. उपलब्ध केला जातो. खास क्षेत्रातील ३३(९) एस.आर.ए. योजनेप्रमाणे वाढीव F.S.I. ४.१ पर्यंत मिळतो. ही सवलत फक्त म्हाडा इमारतींसाठी, म्हाडाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी उपलब्ध केला जातो. परंतु म्हाडाच्याच काही इमारती ३३(५) सुधारित नियमानुसार सर्वसाधारण म्हाडा वसाहतीसाठी फक्त २.५ एवढाच उपलब्ध केला जातो.
मालमत्ता करामध्ये भरघोस सवलत, विकासकाकडून मिळणारा (Corpus Fund) राखीव निधी ज्याच्या व्याजाचा विनियोग मेंटेनन्स खर्च, इमारत देखभाल खर्च हलका करण्यासाठी होऊ शकतो, स्वत:चे मालकीचे घर जे १० वर्षांनंतर बाजारभावाने विकता येते. मुंबईतील मूळ जागेवर नवीन चकचकीत सदनिका या बाबी पुनर्विकास योजनेमुळे मिळालेले वरदान आहेत. पण..
‘‘पुनर्विकास शाप कसा ठरू शकतो? याचा विचार आपण आता करूया!’’ चाळ किंवा झोपडपट्टीतील ७०% भाडेकरूंनी पुनर्विकास योजनेसाठी मान्यता दिल्यानंतरच पुनर्विकसित इमारती बांधल्या जातात. ही योजना कार्यान्वित करण्याची महत्त्वाची पायरी आहे. विकासक आणि चाळमालक यांच्या देण्याघेण्याच्या कराराएवढाच महत्त्वाचा करार म्हणजे भाडेकरूचा संमती करारनामा.
विकासक आणि चाळमालक यांची युती सहमती करारनाम्यांवर सही घेण्याची (Consent Agreement) मोहीम सुरू होते. ज्यांना जुन्या चाळीचा कंटाळा आला आहे, ज्यांची आर्थिक कुवत वाढली आहे आणि ब्लॉकमध्ये राहण्यासाठी उत्सुक आहेत. ज्यांना ब्लॉक विकायचा आहे, अशा पुनर्विकासाच्या बाजूने खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यातल्या त्यात पदवीधर आणि बोलबच्चन तरुणांना विकासक हाताशी धरतो. मध्यमवर्गीय आणि गरीब चाळकरी या शिकलेल्या आणि तरुणांना पाहून यांना सर्वकाही कळते असे गृहीत धरतो, अतिविश्वास ठेवतो आणि करारनाम्यावर जुजबी चर्चा करून सही ठोकून मोकळा होतो. जे भाडेकरू सर्वसाधारण जुने घर सोडण्याचा फायदा-तोटय़ाचा मेळ घालण्याचा विचार करत असतात, फुकाच्या आश्वासनांना बळी पडत नाहीत. जे काही देणार-घेणार याबाबत कायदेशीर कागदपत्र करण्याचा आग्रह धरतात. अशा भाडेकरूंना धमकावले जाते. भांडण काढले जाते. हरतऱ्हेने सतावून, मारामाऱ्या करून दहशत निर्माण केली जाते. या बाबींचा उबग येऊन एक एक जण करारनाम्यावर सही करतो. विकासकाला फक्त ७०% सह्य़ांची आवश्यकता असते. तोपर्यंत हा खटाटोप चालू राहतो. नंतर पुनर्विकास सुरू होतो. उर्वरित ३०% भाडेकरूंचा एकही शब्द न ऐकता इमारती पाडल्या जातात. (उर्वरित भाडेकरूंचे म्हणणे ऐकले पाहिजे, याबाबत उच्च न्यायालयाने महिन्यापूर्वीच निकाल  दिला, परंतु पूर्ण तपशील कळला नाही.)

विकासकाने त्यांच्या दलालांतर्फे  दिलेली तोंडी आणि कागदी आश्वासने पाळली तर ठीक, तीही १००% पूर्तता होईलच याची शाश्वती नसतेच. मग स्वार्थासाठी सही करणारे, ब्लॉकमध्ये राहण्याचे स्वप्न बघणारे, सर्वाच्या भविष्याचा विचार करून योग्य विकासासाठी लढणारे सर्वच्या सर्व कायमचे फसतात. न्याय हक्काप्रमाणे वाढीव क्षेत्रफळाची सदनिका, भविष्यात सुरुवातीची १० वर्षे देखभाल खर्च, इमारत दुरुस्त खर्च भागेल एवढा राखीव निधी , भक्कम योग्य सोयीसुविधा, सज्ज नवीन आकर्षक इमारत मिळविण्यासाठी सर्व भाडेकरूंच्या चर्चेद्वारे ९५% सर्वमान्य असलेल्या निर्णयावर ठाम राहणे.  पुनर्विकास कमिटीत जास्तीत जास्त महिलांनाही प्रतिनिधित्व देणे, ज्यामुळे घरातल्या समस्यांचे निराकरण होण्याचा विचार होईल. महिलांना निर्णय घेण्याची जबरदस्ती पुरुषांनी करू नये; याचे कारण पुरुष प्रतिनिधींचे दारू पार्टीमुळे मत बदलू शकते. कमिटी सदस्य परस्पर चाळ मालक किंवा विकासकाला परस्पर भेटल्याचे कळल्यास त्याला कमिटीबाहेरचा रस्ता दाखविला जाईल हे कमिटी स्थापन करतानाच जाहीर करावे. ज्यावेळी सर्वाना मान्य होईल असा तोडगा निघाल्यानंतरच प्रत्येक भाडेकरूंनी सुधारित करारनामा लक्षपूर्वक वाचावा. शक्यतो मूळ करारनामा मराठी किंवा हिंदीत असावा. त्यातील सेवा शर्ती समजूनउमजून घ्याव्यात. सह्य़ा करण्यासाठी ठराविक दिवस सर्वसंमतीने ठरवून एकत्रच करारनाम्याचे वाचन करून सह्य़ांचा कार्यक्रम करावा. घिसडघाई, अतिविश्वास यामुळे पुनर्विकास मार्गी लागल्यास ही योजना मूळ भाडेकरूंसाठी भविष्यात शाप ठरू शकते. हे लक्षात घ्यावे. उदा. राखीव निधीवर पाणी सोडणे (Corpus Fund) रहायला गेल्यानंतर छता, भिंतीतून पाणीगळती सुरू होणे. खोल्यांमध्ये प्रकाश व वायुविजनाचा अभाव असणे, लिफ्ट वारंवार बंद पडणे, पाण्याचे पंप वारंवार बंद पडून लिफ्ट कायमची बंद पडणे, सांगितलेल्या रकमेपेक्षा जास्त देखभाल खर्च भरायला लागणे. थोडक्यात असंख्य समस्या निर्माण झालेली पुनर्विकसित इमारत. याऐवजी विचारपूर्वक पुनर्विकास झाल्यास, नवीन चकचकीत इमारतीमधला सर्व सुखसोयी सुविधायुक्त, सवलतीच्या दरातील मालमत्ता कर भरून मिळणारा ब्लॉक म्हणजे वरदानच. कारण मुंबईत, घर जिथे सूर्य मावळतो, पण वीज कधीच जात नाही! हे वरदान म्हणजे पुनर्विकासाबरोबर उच्च जीवनमानाचा जन्म.   


Source :- Click Here

Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre
हाऊसिंग सोसायटय़ांच्या नावे मालमत्तेचे शासकीय स्तरावरून कन्व्हेअन्स करता यावे म्हणून महाराष्ट्र शासनाने १९६३च्या ‘मोफा’ (महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस् अ‍ॅक्ट) मध्ये डिम्ड कन्व्हेअन्स (मानीव हस्तांतरणाची तरतूद केली. या संबंधीच्या दुरुस्त विधेयकाला २००८च्या फेब्रुवारीमध्ये राष्ट्रपतींची मंजुरी मिळून त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले. या घटनेला तीन वर्षे उलटून गेली आहेत.


हा कायदा फेब्रुवारी २००८ मध्ये झालेला असला तरी डिम्ड कन्व्हेअन्सची नियमावली तयार करण्यात आली नव्हती. त्यामुळे डिम्ड कन्व्हेअन्सची प्रक्रिया सुरू झाली नाही. ही नियमावली प्रसिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन वर्षांपेक्षा अधिक काळ घेतला. २०१०च्या सप्टेंबरमध्ये ती अंतिम स्वरूपात प्रसिद्ध झाली; परंतु त्यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्था आणि त्यांचे जिल्हा महासंघ यांना बराच संघर्ष करावा लागला. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी या कामी विशेष पुढाकार घेतला. ही नियमावली पहिल्या प्रथम जनतेच्या प्रतिक्रियेसाठी जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा डिम्ड कन्व्हेअन्स करून घेण्यासाठी लागणाऱ्या विविध दस्तऐवजांची संख्या २२ होती. ही संख्या अंतिम नियमावलीत फक्त १२ करण्यात आली.

हे दस्तऐवज पुढीलप्रमाणे :
१) डिम्ड कन्व्हेअन्स करून घेण्याच्या अर्जावर रुपये दोन हजारांचा कोर्ट फी स्टॅम्प लावणे २) सहकारी गृहनिर्माण संस्था नोंदणी प्रमाणपत्राची सत्य प्रत अथवा अपार्टमेंट असल्यास डीड डिक्लरेशन व अपार्टमेंट डीडची प्रत ३) जागेचा सात-बाराचा उतारा आणि मालमत्ता रजिस्टर्ड कार्डाचा उतारा ४) प्रतिपक्षाने सदनिका/दुकान खरीददार यांच्याशी केलेल्या विक्री करारनाम्याची प्रत ५) सभासदांची यादी ६) अभिहस्तांतरण (कन्व्हेअन्स) करण्याविषयी संबंधित मूळ मालक अथवा बिल्डर/प्रमोटर यांना दिलेल्या नोटिसीची प्रत ७) मूळ मालक अथवा बिल्डर/प्रमोटर यांचा पत्रव्यवहाराचा पत्ता ८) जागेचा सर्च अहवाल ९) बिगरशेती (एनए) आदेश १०) संबंधित महापालिका अथवा सक्षम प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या बांधकामाच्या नकाशाची प्रत ११) कन्व्हेअन्स डीडचा मसुदा १२) अभिहस्तांतरण करावयाच्या जागेच्या क्षेत्रफळाविषयी आर्किटेक्टचा दाखला.
कायद्याचे स्वरूप

डिम्ड कन्व्हेअन्स करण्यासाठी याबाबतच्या कायद्यांना पुढील तरतुदी आहेत - अ) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्या दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी हा विनिर्दिष्ट करण्यात येणाऱ्या क्षेत्रासाठी सक्षम प्राधिकारी असेल आणि तो प्रवर्तकाकडून अभिहस्तांतरण पत्र करून देण्यास कसूर झाल्यास, (एक) ज्या खरेदीदारांनी प्रवर्तकाकडून सदनिका खरेदी केल्या असतील अशा खरेदीदारांकडून अर्ज प्राप्त झाल्या अशा सदनिका मालकांचा सहकारी संस्थांची नोंदणी करण्याबाबत जिल्हा उपनिबंधक, उपनिबंधक किंवा साहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना निदेश देईल. (दोन) सदनिका मालकांच्या सहकारी संस्थेच्या सभासदांकडून अर्ज मिळाल्यावर कलम ११ मध्ये तरतूद केल्याप्रमाणे विहित कालावधीत अभिहस्तांतरण पत्रांची नोंदणी करून घेण्यास हक्कदार असल्याचे व उक्त संस्थेच्या नावे मानीव हस्तांतरणपात्र म्हणून नोंदणी अधिनियम १९०८ अन्वये एकपक्षीय अभिहस्तांतरणपत्र करण्यास ती संस्था पात्र असल्याचे प्रमाणित करणारे पत्र देईल.
(ब) प्रतिबंधक उपाययोजना म्हणून उक्त अधिनियमाखालील अपराध कलम १२ अ, अन्वये असेल ते खेरीज करून सिद्ध झाल्यानंतर अशा प्रवर्तकास संबंधित कायद्यान्वये सदनिका बांधण्यासाठी स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी मिळण्यास पाच वर्षांच्या कालावधीसाठी बंदी आणण्याकरिता तरतूद करण्यात आली असून आणि दंडाची रक्कम दहा हजार रुपयांवरून वाढवून ५०,००० करण्यासाठी कलम १३च्या पोटकलम (३) मध्येदेखील सुधारणा करण्यात आली आहे.
(क) तसेच कलम १३ ब, १३ क, १३ ड, व १३ ईचा समावेश करून त्याद्वारे भारतीय दंड संहितेच्या कलम १९३ व २२८ यांच्या प्रयोजनार्थ दिवाणी न्यायालय म्हणून समजण्यात येणार असून, या अधिनियमान्वये सद्भावनापूर्वक सक्षम अधिकाऱ्याने केलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत त्याच्याविरुद्ध कोणताही दावा किंवा कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार नाही व त्यापासून त्याचे हानीरक्षण करण्यात येईल, अशी तरतूद केली आहे. या कायद्याचे थोडक्यात स्वरूप हे असे आहे.


अशी असते प्रक्रिया

ज्या सोसायटीच्या नावे कन्व्हेअन्स झालेले नाही, अशी संस्था दोन हजार रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प लावून सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करील. हा अर्ज आल्यावर सक्षम अधिकारी, संबंधित संस्थेला तसा अर्ज करण्याचा अधिकार आहे काय याची शहानिशा करील. त्याची खात्री पटल्यावर तो संबंधित विकासक आणि सोसायटीचे पदाधिकारी यांची सुनावणी घेईल आणि त्याला जी बाजू न्याय्य वाटेल त्या बाजूने निर्णय देईल.
सक्षम अधिकाऱ्याने सहा महिन्यांच्या अवधीत डिम्ड कन्व्हेअन्सची प्रक्रिया पूर्ण करावयाची असते. सक्षम अधिकाऱ्याने सोसायटीच्या बाजूने निकाल दिल्यास हे प्रकरण अभिहस्तांतरण करून घेण्यास योग्य आहे, असे प्रमाणपत्र देईल.
हे प्रमाणपत्र सोसायटीने सबरजिस्ट्रार ऑफ अ‍ॅश्युअरन्सेस यांजकडे द्यावयाचे असते. तो हे पत्र आपल्या रजिस्टरमध्ये नोंद करून सोसायटय़ा इण्डेक्स-२ देईल. हा इण्डेक्स मिळणे म्हणजेच कन्व्हेअन्स होय! त्याशिवाय सक्षम अधिकारी सोसायटीस डिम्ड कन्व्हेअन्स प्रमाणपत्र देईल.


७५ हजार सोसायटय़ांच्या नावे कन्व्हेअन्स नाही
शासकीय आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात ८१ हजार सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. त्यांपैकी फक्त ६३३४ सोसायटय़ांच्या नावे कन्व्हेअन्स झालेले आहे. याचाच अर्थ ७५ हजार सोसायटय़ा कन्व्हेअन्सपासून वंचित आहेत.

बिल्डरांच्या आडमुठेपणामुळे सोसायटय़ांच्या नावे कन्व्हेअन्स होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणूनच डिम्ड कन्व्हेअन्सची ही योजना; परंतु ही प्रक्रिया सुरू झाल्यापासून १० महिन्यांत फक्त दोन सोसायटय़ांच्या नावे डिम्ड कन्व्हेअन्स झाले आहे. त्यापैकी एक घाटकोपरची असून, दुसरी बदलापूर (जि. ठाणे) येथील आहे. ठाणे जिल्ह्य़ातील अनेक सोसायटय़ा ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनकडे मार्गदर्शनासाठी येत असतात. तरीसुद्धा डिम्ड कन्व्हेअन्सचे प्रमाणपत्र मिळविणाऱ्या सोसायटय़ांची संख्या का वाढत नाही, हे एक गूढ आहे. असे का होते याचे स्पष्टीकरण शासनाने दिले पाहिजे. याबाबतची सर्व मार्गदर्शक माहिती वृत्तपत्रे आणि अन्य प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध केली पाहिजेत. आपल्या नावे डिम्ड कन्व्हेअन्स करून घेणे हे त्यांना फायदेशीर आहे, ही वस्तुस्थिती सोसायटय़ांनी पटविली पाहिजे. मोफा कायद्यात यापूर्वीही कन्व्हेअन्स करण्याची तरतूद होती; परंतु बिल्डरांनी एक ना अनेक कारणे दाखवून कन्व्हेअन्स करण्याचे टाळले. शेवटी त्यांच्यापुढे हतबल होऊन शासनाला डिम्ड कन्व्हेअन्सचा कायदा करावा लागला; परंतु अजून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

बिल्डर सुखासुखी कन्व्हेअन्स करून देणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. यावर शासनाने कठोर भूमिका घेतली पाहिजे. सरकार तशी ती घेईल, असे आज तरी वाटत नाही. याचा अर्थ डिम्ड कन्व्हेअन्सचा बार फुसका ठरू नये हीच इच्छा.


Source :- Click Here

Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre

वास्तुमार्गदर्शन


वास्तुरंगमधून घर आणि त्यासंबंधीच्या अनेक विषयांवर विविध माहितीपूर्ण लेख प्रसिद्ध होत असतात. त्यामध्ये घरसजावट वस्तूंची रचना इथपासून ते घर घेणे, सोसायटी स्थापन होणे, गृहनिर्माण संस्था, अपार्टमेंट, घरांचे करारनामे, गृहनिर्माण संस्थांचा दैनंदिन कारभार ते अगदी अलीकडील अतिशय परवलीचा ठरलेला विषय म्हणजे रिडेव्हलपमेंट अशा विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केले गेले आहे. त्यामुळेच आमचे असंख्य वाचक अनेक प्रश्न आमच्याकडे पाठवत असतात.
म्हणूनच या पुरवणीमधून आम्ही वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे तसेच त्यांचे शंकासमाधान करण्याचे आम्ही ठरवले आहे.
वाचकांच्या प्रश्नांची उत्तरे देतील प्रख्यात कर व कायदेतज्ज्ञ श्रीनिवास घैसास.
वाचकांनी आपले प्रश्न सुवाच्य अक्षरात व त्याचा नीट अर्थबोध होईल अशा तऱ्हेने लिहून पाठवावेत. प्रश्न शक्यतो अनेक जणांना उपयोगी पडतील अशा स्वरूपाचे असावेत. वैयक्तिक हेवेदावे असणारे प्रश्न टाळावेत. प्रश्न पाठविण्यासाठीचा पत्ता :-
द्वारा घैसास अ‍ॅण्ड असोसिएट्स
टॅक्स कन्सलन्टंट अ‍ॅण्ड
लीगल अ‍ॅडव्हायझर्स
ब्लॉक नं. २, ए विंग, तळमजला,
चंदन सोसायटी, कीर्तिकर कंपाऊंड,
नूरीबाबा दर्गा रोड,
ऑफ एल. बी. एस. रोड,
ठाणे (प.) झ्र् ४००६०१
१) एखादी संस्था नियमबाह्य़ बिनभोगवटा शुल्क आकारू शकते का?
- मधू पाटील, अंधेरी

आपण आपली सदनिका लीव्ह लायसन्सवर देऊ शकता. कायद्याने तसा अधिकार आपणाला दिला आहे. त्यासाठी आपण लीव्ह लायसन्स करारनामा करणे आवश्यक आहे व तो नोंद करणेदेखील आवश्यक आहे. तसेच सोसायटीची परवानगीदेखील घेणे जरुरीचे आहे. याशिवाय आपण भाडेकरू म्हणून ठेवलेल्या व्यक्तीची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात देणेदेखील बंधनकारक आहे.
आपण जर आपली सदनिका लीव्ह लायसन्स तत्त्वावर दिली तर सोसायटी आपणाला आपल्या मेन्टेनन्सच्या १० टक्के इतकीच जादा रक्कम बिनभोगवटा शुल्क म्हणून आकारू शकते. त्याहून जास्त रक्कम आकारत असल्यास त्याविरुद्ध आपण संबंधित उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे दाद मागू शकता. नियमाहून जादा बिनभोगवटा शुल्क आकारणे हे बेकायदेशीर आहे.
२) गृहनिर्माण संस्था पार्किंगसाठी चार्जेस लावू शकते का? डिपॉझिट घेऊ शकते का?
- राजेंद्र दळवी, ठाणे (प.)

संस्था आपली मोकळी असलेली जागा पार्किंगसाठी देऊ शकते किंवा त्याच्या वितरणाची पद्धत ठरवू शकते. अशा प्रकारे दिल्या गेलेल्या जागेसाठी संस्था भाडे आकारू शकते वा अनामत रक्कमही स्वीकारू शकते.
३) नॉमिनीच्या नावे भाग हस्तांतरण करताना जे हमीपत्र होणाऱ्या सदस्यांकडून घ्यायचे असते, त्याचा नमुना कोठे उपलब्ध होईल?
४) मूळ मालकाने कोणालाही सहयोगी सदस्य करून घेण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज केला तर त्याला सहयोगी सदस्य करून घेणे आवश्यक आहे का?
५) सहयोगी सदस्याचे अधिकार काय? सदनिकेच्या मालकीत त्याला हक्क मिळतो का?
- सुधाकर लक्ष्मण, दहिसर

३. आपणाला हवा असलेला नमुना हा कोणत्याही उपविधीच्या पुस्तकात उपलब्ध होईल. आपण ज्या भाषेतील उपविधी घ्याल त्या भाषेत तो उपलब्ध होईल. (उदा. इंग्रजी / मराठी) याशिवाय हाऊसिंग फेडरेशनच्या मुंबई कार्यालयातदेखील त्याचा नमुना उपलब्ध होईल. मुंबई परिसरात ठाणे, कल्याण, वसई या ठिकाणीदेखील फेडरेशनची कार्यालये आहेत. त्या ठिकाणीही हा नमुना उपलब्ध होऊ शकतो.
४. एखादा सदस्य अन्य व्यक्तीला सहयोगी सदस्य करून घेण्यासाठी अर्ज करू शकतो. असा अर्ज पाठवल्यावर संस्थेच्या बैठकीत त्याला सदस्य करून घेण्याबद्दल ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतर ती व्यक्ती सहयोगी सदस्य म्हणून काम पाहू शकते. सहयोगी सदस्य पुढील गोष्टी करू शकतो त्या अशा :
१) संस्थेच्या दैनंदिन कामकाजात भाग घेणे.
२) मतदान करणे, सभेमध्ये पदाधिकारी होणे, निवडणूक लढवणे.
३) संस्थेचे प्रतिनिधित्व करणे इ.
मात्र या साऱ्या गोष्टी मूळ सदस्याचा त्याला पाठिंबा असेपर्यंत तो हे सर्व काम करू शकतो. ज्या वेळी मूळ सदस्य त्याचा पाठिंबा काढून घेईल त्या वेळी ती व्यक्ती आपोआप सर्व कामे करण्यासाठी अपात्र ठरेल.
५. सहयोगी सदस्याला मालमत्तेमध्ये मालकी हक्क मिळत नाही. सर्वसाधारणपणे सहयोगी सदस्यत्व जर मूळ सदस्याने देण्यासाठी अर्ज केला असेल तर संस्था असे सहयोगी सदस्यत्व देण्याचे नाकारू शकत नाही. मात्र जी व्यक्ती सहयोगी सदस्य बनणार असेल ती जर कायद्याने अपात्र असेल तर अशा व्यक्तीला सहयोगी सदस्यत्व संस्था नाकारू शकते.
६) दोघांच्या नावावर असलेला फ्लॅट (पती / पत्नी) पतीच्या पश्चात फक्त पत्नीच्या नावावर होऊ शकतो का?
७) पतीच्या पश्चात पत्नीचेच एकटीचेच नाव फ्लॅटला लागू शकते का?
८) पतीच्या पश्चात पत्नी फ्लॅट विकू शकते का?
९) कायदेशीर मृत्युपत्र करायचे म्हणजे काय? ते कसे करायचे?
१०) प्रोबेट म्हणजे काय? ते केव्हा घ्यावे लागते?
- नंदिनी साठे, बदलापूर

६. आपला प्रश्न संदिग्ध आहे. आपण विचारत असलेल्या प्रश्नातील फ्लॅट हा पती / पत्नी यांनी खरेदी केला असेल व तो स्वकमाईतून खरेदी केला असेल तर त्यापैकी कोणीही एकजण आपला हिस्सा कुणालाही देऊ शकतो. त्यामुळे त्या व्यक्तीने जर त्याचे मृत्युपत्र वा इच्छापत्र केले असेल तर त्यांच्या वाटय़ाचा भाग कुणाच्याही नावावर हस्तांतरित करता येतो. मात्र ती व्यक्ती मृत्युपत्र / इच्छापत्र न करताच वारली असल्यास मात्र त्याला त्यांच्या धर्माप्रमाणे वैयक्तिक कायदा लागू होतो. या पाश्र्वभूमीवर त्यांच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे पतीने आपले इच्छापत्र केले असेल तर त्यांचा फ्लॅटमधील भाग पत्नीच्या नावे हस्तांतरित होऊ शकेल.
७. या प्रश्नाचे उत्तर हे याअगोदरच्या उत्तरामध्ये समाविष्ट आहे. त्यात दर्शविल्याप्रमाणे जर कागदपत्रे बनवलेली असतील तर पत्नीच्या नावे फ्लॅट होऊ शकेल.
८. पत्नीच्या नावे जर सदर फ्लॅट पतीने मृत्युपत्राने केला असेल व ते मृत्युपत्र जर कोणत्याही न्यायालयाने सदर मृत्युपत्र अवैध ठरवले नसेल तर पत्नी तो फ्लॅट विकू शकेल अथवा त्यांच्या मुलामुलीच्या सह्य़ा व ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्या न घेता जर फ्लॅट विकला तर कायदेशीर अडचणी उद्भवू शकतात.
९. खरे म्हणजे मृत्युपत्र बनवताना कोणतेही खास नियम नाहीत. ते साध्या कागदावर केले तरी चालते. भविष्यात त्यावर आक्षेप घेतले जाऊ नयेत म्हणून मृत्युपत्र बनवताना पुढील काळजी घेणे आवश्यक आहे. ती अशी :
१) मृत्युपत्र फक्त स्वकष्टार्जित मालमत्तेचेच बनवावे. अन्य मालमत्तेचे मृत्युपत्र बनवण्याचा मृत्युपत्र बनवणाऱ्याला अधिकार नसतो.
२) मृत्युपत्र स्पष्ट व वापरलेल्या शब्दांचे अनेक अर्थ निघू शकतील अशा शब्दांनी बनवू नये. ज्या शब्दांमधून स्पष्ट अर्थ निघेल अशाच शब्दांत ते बनवावे.
३) मृत्युपत्राबरोबर वैद्यकीय दाखला जोडलेला असावा, जेणेकरून हे मृत्युपत्र विचार करण्याची क्षमता नसताना बनवले आहे असा आक्षेप त्याबाबत घेता येणार नाही.
४) मृत्युपत्र नोंद केले वा न केले तरी चालते; परंतु आपण मृत्युपत्र नोंद करणे केव्हाही चांगले असते.
५) मृत्युपत्रातील तरतुदींबद्दल वाद झाल्यास हे मृत्युपत्र वैध असल्याचा सक्षम न्यायालयाचा हुकूमनामा मिळवावा लागतो. त्यालाच कायदेशीर भाषेत ‘प्रोबेट’ असे म्हटले जाते.
अशा प्रकारे काळजी घेऊन केलेले मृत्युपत्र हे वैध म्हणजे कायदेशीर ठरते व त्याच्यावर घेतले जाणारे आक्षेप हे कायदेशीर कसोटीवर टिकू शकत नाहीत.
१०. एखादे मृत्युपत्र बनवल्यावर त्यातील तरतुदींबद्दल लाभार्थी वा कायदेशीर वारस यांच्यात मतभेद झाल्यास त्या मृत्युपत्राची वैधता न्यायालयामार्फत तपासली जाते. त्यात जर काही बेकायदेशीर भाग वा तरतुदी असतील तर त्या वगळून त्याच्या अंमलबजावणीचा हुकूम न्यायालय देते. त्याला प्रोबेट असे म्हणतात. अशा प्रकारे प्रोबेट मिळाल्यावर मृत्युपत्राची अंमलबजावणी कायदेशीर ठरते. काही ठरावीक शहरांत मृत्युपत्राच्या अंमलबजावणीपूर्वी प्रोबेट घेणे सक्तीचे केले आहे.

Source :- Click Here

Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre

वास्तुसाद : डिम्ड कन्व्हेयन्सबाबत हाऊसिंग सोसायटय़ांना अनुत्साह का?


alt
५ नोव्हेंबर २०११ च्या ‘वास्तुरंग’ पुरवणीच्या पृष्ठ क्र. ३ वर माननीय नंदकुमार रेगे यांचा वरील विषयावर प्रसिद्ध झालेला लेख हा अत्यंत माहितीपूर्ण व गृहनिर्माण संस्थांना डिम्ड कन्व्हेयन्स मिळविण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगीदेखील आहे. असा माहितीपूर्ण व उपयुक्त लेख छापल्याबद्दल ‘लोकसत्ता’चे व नंदकुमार रेगे यांचे मन:पूर्वक शतश: आभार.


नंदकुमार रेगे यांनी त्यांच्या लेखातून उपस्थित केलेल्या- डिम्ड कन्व्हेयन्सबाबत हाऊसिंग सोसायटय़ांना अनुत्साह का, या प्रश्नाचे माझ्या स्वत:च्या अनुभवातून मला एकच उत्तर मिळाले आहे. ते म्हणजे आजकाल वर्तमानपत्रांद्वारे जवळजवळ सहकारी गृहनिर्माण संस्थेतील सभासदांना कन्व्हेयन्सचा नुसता अर्थच नव्हे तर सहकारी गृहनिर्माण संस्थांना त्यामुळे होणारे फायदे तसेच पुनर्विकासासाठी कन्व्हेयन्सचे असलेले महत्त्व माहीत झाले आहे. त्यामुळे कन्व्हेयन्स मिळविण्यासाठी सर्वच संस्था डिम्ड कन्व्हेयन्सचा मार्ग चोखाळू पाहत आहेत. कन्व्हेयन्सचे असलेले महत्त्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना जसे माहीत झाले आहे, तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांना आता कन्व्हेयन्सचे महत्त्व/ गरज माहीत झाली आहे. हे सहकारी गृहनिर्माण संस्थेला कन्व्हेयन्स मिळवून देण्याचे काम करणाऱ्या लोकांनीदेखील पूर्णपणे हेरले आहे. म्हणूनच अशा सहकारी गृहनिर्माण संस्थेला कन्व्हेयन्स मिळवून देण्याचे काम करणाऱ्या लोकांकडे ज्यावेळी सहकारी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी जातात त्यावेळी कन्व्हेयन्स मिळवून देण्यासाठी अवाच्या सव्वा (कित्येक लाख) रकमेची मागणी करण्यात येते. कन्व्हेयन्स मिळणे नुसते गरजेचे नव्हे तर अत्यावश्यकदेखील असल्यामुळे व काही वेळा कन्व्हेयन्स मिळवून देण्याचे काम करणाऱ्या (काही) लोकांकडून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना - कन्व्हेयन्स मिळवून देण्याचे काम आम्हाला दिल्यास तुमच्याकडून तुमच्या हिश्श्याचे पैसे घेणार नाही किंवा एकूण रकमेतून काही ठरावीक रक्कम तुम्हाला परत करण्यात येईल, असे प्रलोभन दाखविण्यात येते. त्यामुळे पदाधिकारी ती अवाच्या सव्वा रक्कम द्यायला तयार होतात व सर्वसाधारण सभेला हजर असणारे सभासददेखील - त्यांना फक्त कन्व्हेयन्सचे महत्त्व तेवढे माहीत असल्यामुळे- त्या रकमेला मंजुरी देतात. परंतु ज्याला मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहकारी संस्थांसाठीच्या आचारसंहितेत डिम्ड कन्व्हेयन्ससाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती आहे- असा एखादा अभ्यासू सभासद त्याला विरोध करतो. इतर सभासदांनादेखील जेव्हा मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहकारी संस्थांसाठीच्या आचारसंहितेत डिम्ड कन्व्हेयन्ससाठी सादर कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती होते त्यावेळी त्यांनादेखील त्यासाठी मागितलेली अवाच्या सव्वा रक्कम देणे योग्य वाटत नाही व तेदेखील अवाच्या सव्वा पैसे खर्च करण्यास विरोध करतात. पदाधिकाऱ्यांच्या हितसंबंधास बाधा आल्यामुळे त्यांचादेखील उत्साह मावळतो. डिम्ड कन्व्हेयन्सबाबत हाऊसिंग सोसायटय़ांना अनुत्साह असण्याचे प्रमुख/ महत्त्वाचे कारण वरीलप्रमाणे आहे.

खरे म्हणजे मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहकारी संस्थांसाठीच्या आचारसंहितेत (मॅन्युअलमध्ये) एकतर्फी अभिहस्तांतरणासाठी (डिम्ड कन्व्हेयन्ससाठी) एकूण १२ नव्हेत तर १४ प्रकारची कागदपत्रे मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सक्षम अधिकारी) यांना सादर करणे आवश्यक आहे. (एकूण १७ कागदपत्रे सादर केल्यास नंतर ते फायद्याचे ठरते.)
०    संस्थेने मा. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (सक्षम अधिकारी) यांच्याकडे नमुना-७ मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
०    अर्जासोबत रु. २,०००/- चा कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे.
यातील मुख्य व अत्यंत महत्त्वाचा पण लोकांना माहीत नसलेला भाग म्हणजे मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या सहकारी संस्थांसाठीच्या आचारसंहितेत (मॅन्युअलमध्ये) संस्थेची नोंदणी करताना बिल्डरने सादर करायच्या ज्या कागदपत्रांची यादीदेखील देण्यात आलेली आहे त्या यादीत वरील १४ पैकी सुरुवातीच्या १ ते १० क्रमांकांवरील कागदपत्रांचा समावेश आहे. संस्थेची नोंदणी करताना जर बिल्डरने ती कागदपत्रे आधीच त्यांच्या वॉर्डच्या उपनिबंधकांना सादर केली असतील तर बिल्डर ती कागदपत्रे संस्थेला देण्यास सहसा नकार देणार नाही. अगदी वाईटात वाईट झाले व बिल्डरने ती कागदपत्रे संस्थेला देण्यास नकार दिला तर संस्था तीच कागदपत्रे- माहितीच्या अधिकाराखाली- त्यांच्या वॉर्डच्या उपनिबंधकांकडून मिळवू शकते. काही जुन्या संस्थांविषयीची वरील १० कागदपत्रे (खूप पूर्वीची/ जुनी असल्यामुळे) काही वेळा मा. उपनिबंधकांकडे उपलब्ध नसू शकतात, पण तसे झाल्यास सक्षम अधिकारी बिल्डरला ती कागदपत्रे सादर करण्यास भाग पाडू शकतात.

आता राहता राहिली उरलेली ७ (क्र. ११ ते १७) कागदपत्रे. ही कागदपत्रे बहुतेक संस्थांकडेच उपलब्ध असतात. फार तर बिल्डरला नोटिसेस पाठविण्यासाठी संस्थेला थोडाफार खर्च करावा लागू शकतो एवढेच.

तेव्हा डिम्ड कन्व्हेयन्सच्या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या संस्थांनी डिम्ड कन्व्हेयन्ससाठी अवाच्या सव्वा रकमेला मंजुरी देण्याआधी वर दिलेला साधा, सरळ, सोपा व कमी खर्चाचा मार्ग जरूर पडताळून पाहावा.

खरे म्हणजे शासनाने डिम्ड कन्व्हेयन्ससाठी नियम/ कायदा करण्याबरोबरच बिल्डरने जर संस्थेला तिची नोंदणी केल्यानंतर चार महिन्यांच्या आत कन्व्हेयन्स दिला नाही तर- कन्व्हेयन्स न दिल्यामुळे- मिळणारा एकदेखील फायदा (उदा. शिल्लक असलेल्या एफएसआयचा वापर करण्यास परवानगी) त्याला मिळणार नाही व नंतर शासनाकडून लाभ (जसे वाढीव चटई क्षेत्र इ.) देण्यात आल्यास त्यावरदेखील बिल्डरचा नव्हे तर संस्थेचाच अधिकार राहील, असा एक जादाचा कायदा पारित केला असता तर बिल्डरने कन्व्हेयन्स देण्यास फारशी टाळाटाळ केलीच नसती. कारण आज बिल्डर कन्व्हेयन्स देण्यास टाळाटाळ करतात ते केवळ तो न दिल्यामुळे त्यांना जे फायदे मिळतात व भविष्यात मिळण्याची शक्यता असते ते मिळविण्यासाठीच! त्याने कन्व्हेयन्स दिला नाही तरी त्याला काहीच फायदा होणार नाही, हे एकदा का बिल्डरला कळले की तो नक्कीच कन्व्हेयन्स देण्याची टाळाटाळ करणार नाही.

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
(१)    नोकरी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर केलेले प्रतिज्ञापत्र.
(२)    जागेचा सातबारा उतारा अथवा मालमत्ता नोंदणी कार्डचा (प्रॉपर्टी कार्डचा) उतारा.
(३)    सभासदांची नमुन्यातील यादी.
(४)    विकसन करारनाम्याची प्रत.
(५)    कुलमुखत्यारपत्र (पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी) असल्यास त्यांच्या प्रती.
(६)    जागेचा शोध अहवाल (सर्च रिपोर्ट).
(७)    बिगरशेती प्रमाणपत्राची (एन. ए. ऑर्डरची) प्रत.
(८)    कमाल जमीनधारणा कायद्यातून (यू.एल.सी. दाखला) सूट मिळाल्याचे प्रमाणपत्र.
(९)    संबंधित महापालिका/ सक्षम प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या इमारतीच्या बांधकामाच्या नकाशाची प्रत.
(१०)    अभिहस्तांतरण करायच्या जागेच्या क्षेत्रफळाविषयी वास्तुरचनाकार (आर्किटेक्ट) यांचा दाखला.
(११)    संस्थेच्या नोंदणी प्रमाणपत्राची (रजिस्ट्रेशनची) सत्य प्रत किंवा अपार्टमेन्ट असल्यास डिड ऑफ डिक्लरेशनची सत्य प्रत.
(१२)    सर्व सदनिका/ दुकाने यांच्या नोंदणीकृत खरेदीखतांच्या प्रती (जेवढे करार झाले असतील तेवढय़ा सर्व करारांच्या प्रती).
(१३)    अभिहस्तांतरण करून देण्यासाठी मूळ मालक किंवा विकासकांना पाठवलेल्या नोटिशीची प्रत.
(१४)    मूळ मालक किंवा विकासकांचा पत्रव्यवहाराचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक इ.चा तपशील.
(१५)    भोगवटा दाखला (ऑक्युपेशन सर्टिफिकेट).
(१६)    एकतर्फी अभिहस्तांतरण कराराच्या मसुद्याच्या एकूण ५ प्रती.
(१७)    एकूण जेवढे करार झाले असतील तेवढय़ा सर्व करारांच्या वेळी स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फी भरल्याचा पुरावा (पावत्यांच्या प्रती) - हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण जर सर्व करारांच्या वेळी स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फी भरलेली असेल तर एकतर्फी अभिहस्तांतरण कराराची नोंद करताना फक्त रु. १००/- स्टॅम्प डय़ुटी म्हणून भरावे लागतात. अन्यथा अभिहस्तांतरण कराराची नोंद करताना त्या जमिनीच्या त्यावेळच्या बाजारभावाप्रमाणे असलेल्या किमतीच्या प्रमाणात (काही लाखांत) स्टॅम्प डय़ुटी भरावी लागते.


Source :- Click Here

Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre

शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

वास्तुसाद : पुनर्विकासातील आजचे अर्थशास्त्र


altप्रा.भा. ल. महाबळ यांच्या पुनर्विकासाच्या अर्थशास्त्रावरील २८ ऑगस्ट, २०११ च्या वास्तुरंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात दिलेल्या आकडेवारीत व तपशिलात सुधारणा करण्याचा प्रयत्न राजा कोनकर यांनी २४ सप्टेंबर, २०११च्या ‘वास्तुरंग’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात केला आहे.
कोनकर यांनी विकासकाला ‘पुनर्विकास’ प्रकल्पातील इमारत बांधण्यासाठी येणाऱ्या एकूण अंदाजित खर्चाची नऊ प्रकारच्या विविध खर्चामध्ये विभागणी केली आहे. त्यामधील तीन प्रकारच्या खर्चाच्या तपशिलात- महानगरपालिका व इतर, व्यवस्थापन खर्च व इतर खर्च- नेमके कोणते खर्च गृहीत धरले आहेत याचा उल्लेख नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे खाली नमूद केलेल्या खर्चाच्या बाबी त्यात समाविष्ट असाव्यात.
महानगरपालिका व इतर यासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चात विकास करारावर भरावी लागणारी स्टॅम्प  डय़ुटी व रजिस्ट्रेशन फी व प्रत्येक सभासदाशी कराव्या लागणाऱ्या करारावर (परमनंट अल्टरनेटिव्ह अ‍ॅकॉमोडेशन अ‍ॅग्रीमेंट) भरावी लागणारी स्टॅम्प डय़ुटी व रजिस्ट्रेशन फी समाविष्ट असावी. महानगरपालिका व चीफ फायर ऑफिसरकडून विविध परवानग्या मिळविण्यासाठी ज्या एजन्सी विकासकाच्या वतीने काम करतात त्यांना द्यावे लागणारे प्रोफेशनल चार्जेसही यात समाविष्ट असावेत. 
महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या ३-१-२००९च्या नियमावलीनुसार विकासकाची निवड करण्याची पूर्वतयारी करण्यासाठी व विकासक करीत असलेल्या बांधकामावर 
देखरेख करण्यासाठी ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट’ची सहकारी गृहनिर्माण संस्थेला नेमणूक करावी लागते. ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट’ साधारणपणे प्रोजेक्टमधील एकूण बांधकामाच्या क्षेत्रफळासाठी रु. ४० ते रु. १०० प्रति चौ. फूट या दराने प्रोफेशनल फी आकारतात. प्रा. महाबळांच्या लेखात उल्लेख असलेल्या प्रोजेक्टमध्ये ३०००० चौ. फुटांहून अधिक बांधकाम होणार असल्याने प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट किमान १५ लाख  रुपये प्रोफेशनल चार्जेस आकारणार. सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या सभासदांना पुनर्विकास स्वत:च्या खिशातून एक पैसाही खर्च न करता व्हायला हवा असतो. याला पर्याय म्हणून ‘प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट’ हा खर्च विकासकाच्या माथी मारण्याचा प्रस्ताव सहकारी संस्थेपुढे ठेवतात. सहकारी संस्थांचे सभासद हा प्रस्ताव फारसा विचार व चर्चा न करता त्वरित मंजूर करतात व विकास करारात विकासकाच्या संमतीने या संबंधातील अटी समाविष्ट करतात. कोनकरांनी हा खर्चही ‘महानगरपालिका व इतर’ या सदरातच समाविष्ट केला असावा. या स्पष्ट उल्लेख केलेल्या विविध खर्चाची एकूण रक्कम रु. १२५ लाख अशी गृहीत धरली असेल तर ती वास्तवात येणाऱ्या खर्चाच्या जवळपास आहे.
‘व्यवस्थापन खर्च’ म्हणून नमूद केलेल्या खर्चात बहुधा प्रोजेक्ट पूर्णत्वास नेण्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांची (पाच आर्किटेक्ट्स, स्ट्रक्चरल इंजिनीअर, कायदेशीर सल्लागार  व सुरक्षा कर्मचारी व  विकासकाचे पगारी कर्मचारी यांच्या पगारावरील खर्चाचा समावेश कोनकरांनी केला असावा. तो रु. ५७ लाख असा नमूद केला आहे. ही रक्कमही वास्तवात येणाऱ्या खर्चाएवढी आहे.)
‘इतर खर्च’ या सदरात कोनकरांनी रु. ५० लाख ही रक्कम (खर्च) नमूद केली आहे. बहुतेक विकासक ‘प्रोजेक्ट’मध्ये त्यांना विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सदनिका/व्यावसायिक जागा व कार पार्किंग स्पेस विकण्यासाठी ‘सोल सेलिंग एजंट’ नेमतात. त्या ‘सोल सेलिंग एजंटना’ विकासक विक्रीच्या रकमेच्या ‘दोन टक्के’ रक्कम कमिशन/ ब्रोकरेज म्हणून देतात. महाबळांच्या लेखात नमूद केलेल्या प्रकल्पामध्ये विकासकाच्या वाटय़ाला आलेल्या सदनिका/दुकाने व कार पार्किंग्जच्या विक्रीपोटी रु. २५ कोटी मिळतील. त्याचे दोन टक्के, म्हणजे रु. ५० लाख होतात. त्यामुळे हा खर्चही व्यवहार्य व वास्तव आहे. कोनकरांनी लेखात उल्लेख केलेल्या अन्य सहा विशिष्ट खर्चाचा अंदाजही वास्तव असला तरीही कोनकरांनी- बहुधा अनवधानाने काही महत्त्वाच्या मोठय़ा खर्चाच्या आणि उत्पन्नांच्या बाबींचा उल्लेख न केल्यामुळे, त्यांनी केलेल्या ‘पुनर्विकासाच्या सुधारित अर्थशास्त्राच्या’ अंदाजात त्रुटी राहिल्या आहेत, त्यांचा उल्लेख करीत आहे. बांधकाम खर्चाचा विचार करताना कोनकरांनी फक्त इमारतीच्या बांधकाम खर्चाचा हिशेब केला आहे असे दिसते. परंतु नवी इमारत बांधत असताना ‘कार पार्किंग्ज’साठी ‘स्टिल्ट’ बांधावे लागते, प्लॉटवरील मोकळ्या जागेचे काँक्रिटीकरण करावे लागते, सहकारी संस्थेला कार्यालय बांधून द्यावे लागते; कंपाऊंड वॉल, सिक्युरिटी केबिन्स, कॉमन टॉयलेट्स बांधून द्यावी लागतात. बहुतांश सहकारी संस्थांच्या सभासदांना ‘कार पार्किंग्ज स्पेस’ही हवी असते. या मागणीची पूर्तता करण्यासाठी विकासकाला ‘स्टॅक कार पार्किंग्ज’ची निर्मिती करणे भाग आहे. महाबळांनी त्यांच्या लेखात नमूद केलेल्या प्रकल्पात, सरासरी एक कार पार्किंग प्रत्येक सभासदाच्या वाटणीस येण्यासाठी स्टॅक कार पार्किं गची निर्मिती करणे विकासकाला अनिवार्य ठरेल.
वरील सर्व ‘आयटेम्स’चा खर्च सहज एक कोटी रु. होईल.
कोनकरांनी विकासकाला ‘व्याज’ म्हणून खर्च करावी लागणारी रक्कम फक्त बँक गॅरेंटीच्या रकमेवर काढली आहे.
विकासकाची सहकारी संस्थेने निवड करताच विकासक प्रकल्पाचे काम सुरू करतो. विकासकाला प्रोजेक्टचे काम सुरू करताच टी.डी.आर. खरेदी, सभासदांना द्यावे लागणारे भाडे, ब्रोकरेज, डिपॉझिट, शिफ्टिंगचा खर्च, कॉर्पस फंड, स्टॅम्प डय़ुटी, रजिस्ट्रेशन चार्जेस, महानगरपालिकेला द्यावी लागणारी डिपॉझिट्स आणि बांधकामाचा पहिल्या दीड वर्षांचा खर्च यावर खूप मोठी रक्कम गुंतवावी लागते. महाबळांनी उल्लेख केलेल्या प्रकल्पात ही रक्कम रु. नऊ कोटींच्या जवळपास असेल. या रकमेतील सहा ते सात कोटी रुपये विकासक कर्जाद्वारे उभारतो. या कर्जाचे सुमारे दीड वर्षांचे व्याज (१० टक्के वार्षिक दराने) एक कोटीपेक्षा अधिक होईल.
थोडक्यात, विकासकाच्या प्रकल्प खर्चात किमान रु. दोन कोटींची वाढ करून प्रकल्प खर्चाचे गणित मांडणे योग्य ठरेल. म्हणून प्रकल्प खर्च रु. १४.५० कोटी गृहीत धरूया.
आता विकासकाला सदनिका व कार पार्किंग्जच्या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची रक्कम किती असेल ते पाहूया.
महाबळांच्या विचाराधीन प्रकल्पात विकासकाने १४४०० चौ. फूट चटई क्षेत्राच्या सदनिका व ५० टक्के कार पार्किंग्ज सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना मोफत दिल्यानंतर त्याच्या वाटय़ाला ९६०० चौ. फूट चटई क्षेत्रफळाच्या व ५० टक्के कार पार्किंग्ज येणार हा साधा व सरळ मार्गाने केलेला हिशेब. परंतु वास्तवात विक्री-उत्पन्नाचे हिशेब वेगळ्याच प्रकाराने केले जातात. ते आजच्या घडीला कसे होत आहेत ते समजून घेऊया.
या प्रकल्पात विकासक ८०० चौ. फूट चटई क्षेत्रफळाच्या 
१२ सदनिका विक्रीसाठी बांधेल. या १२ सदनिका व २० कार पार्किंग्ज विकासकाला विक्रीसाठी उपलब्ध असतील. या प्रत्येक सदनिकेला ३०० चौ. फुटांच्या ड्राय बाल्कनी अधिक फ्लॉवर बेड असणार, म्हणजे विकासक सदनिकेचे चटई क्षेत्रफळ ११०० चौ. फूट मानणार. परंतु विक्रीयोग्य क्षेत्रफळ काढण्यासाठी 
ज्याला आज विकासक ‘सुपर गोल्ड एरिया’ असे गोंडस नाव देतो, चटई क्षेत्रफळाच्या ५५ टक्के ते ६० टक्के क्षेत्रफळ चटई क्षेत्रफळात मिळवणार. म्हणजेच या सदनिकेच्या क्षेत्रफळाच्या या गणितानुसार या प्रकल्पात विकासकाला खाली नमूद केलेले उत्पन्न मिळेल.
(सदनिकेचे क्षेत्रफळ) १७०० चौ. फूट x (सदनिकांची संख्या) १२ x (विक्रीचा प्रति चौ. फूट दर) १२००० रु. = २४.४८ कोटी
वीस कार पार्किंग्ज प्रत्येकी रु. ५ लाख = १.०० कोटी
एकूण उत्पन्न = रु. २५.४८ कोटी
या उत्पन्नातून रु. १४.५० कोटी वजा करता विकासकाचा नफा रु. ११ कोटींच्या घरात जातो. विकासकाची गुंतवणूक रु. ५.५० कोटी मानली तर दोन वर्षांच्या कालावधीत विकासक २०० टक्के नफा मिळवतो. हे प्रमाण प्रतिवर्षी १०० टक्के होते. ज्या प्रकल्पामध्ये असा नफा मिळेल अशी खात्री असते असेच प्रकल्प राबवायला विकासक उत्सुक असतात.
ड्राय बाल्कनी व फ्लॉवर बेडचे क्षेत्रफळही सदनिकेच्या क्षेत्रफळात मिळवून सदनिकेची विक्री विकासक करतात ही वस्तुस्थिती शासनाला माहिती असल्याने मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी ड्राय बाल्कनी व फ्लॉवर बेडच्या क्षेत्रफळावरही ‘प्रीमियम’ चार्जेस विकासकांकडून वसूल करण्याचा प्रस्ताव शासनासमोर मांडला व शासनानेही त्याला मंजुरी दिल्याचे आपण सर्वानी वृत्तपत्रात वाचले आहेच. या वस्तुस्थितीमुळे वर मांडलेले अर्थशास्त्राचे (नफ्याचे) गणित कोणालाही ‘अतिशयोक्त’ वाटू नये.
अर्थशास्त्रातील नियमाप्रमाणे कोणत्याही समाजोपयोगी प्रकल्पाच्या लाभांच्या सर्वच लाभार्थीचा व त्यांच्या एकूण लाभातील वाटय़ाचा विचार झाल्याशिवाय अर्थशास्त्राच्या अभ्यासाला पूर्णत्व आले असे म्हणता येत नाही. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकास योजनांमधील अर्थशास्त्राचे तपशील मांडताना बहुतेक वेळा त्यातल्या फक्त एकच लाभार्थीचा-विकासकाचा तपशील मांडला जाऊन तो मिळवत असलेल्या नफ्यावर नेहमीच प्रतिकूल टीका झाली. विकासकाला जसा मोठय़ा रकमेचा नफा मिळतो तसाच 
सहकारी गृहनिर्माण संस्थेलाही मिळतो हे सोयीस्करपणे विसरले जाते. कदाचित सहकारी गृहनिर्माण संस्थेला होणारा नफा 
वाढीव जागेच्या स्वरूपात मिळत असल्याने त्या नफ्यावर कोणी फारसे लक्ष न देता त्याविषयी चर्चाच होत नाही. महाबळांच्या विचाराधीन प्रकल्पात सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांना २४०० चौ. फूट क्षेत्रफळाची जागा + ड्राय बाल्कनी व फ्लॉवर बेडचे प्रत्येक सदनिकेमागे २५० चौ. फूट (म्हणजे 
२४  सदनिकांना ६००० चौ. फूट) + ८४०० फूटांच्या ५५ टक्के म्हणजे ४६०० चौ. फूट = एकूण १३००० चौ. फूट सुपर गोल्ड क्षेत्रफळ व २० कार पार्किग्ज कॉर्पस फंडासह फुकट 
मिळणार. याची बाजार भावाने एकत्रित किंमत रु. १७ कोटी एवढी होते.
शासन हा या प्रकल्पातील तिसरा महत्त्वाचा भागीदार. या भागीदारालाही या प्रकल्पातून स्टॅम्प डय़ुटी + रजिस्ट्रेशन चार्जेसपोटी रु. एक कोटी मिळणार. महापालिकेलाही ड्राय बाल्कनी व फ्लॉवर बेडच्या क्षेत्रफळाशी निगडित ‘प्रीमियम चार्जेस’ म्हणून मोठी रक्कम मिळणार.
‘पुनर्विकासाचे आजचे अर्थशास्त्र’ इतके सविस्तर लिहिण्याचे प्रयोजन एवढेच की
१)    महाबळांना प्रकल्पात होणाऱ्या नफ्याचा खराखुरा आकडा कळावा- जो श्रीमान गाला (विकासक) यांनी कधीच सांगितला नाही.
२)    प्रकल्पातील फायद्याकडे पाहून सहकारी गृहनिर्माण 
संस्थेच्या सभासदांनी ‘स्वयंविकास’ योजनेवर गांभीर्याने विचार करावा. (असा विचार करताना गालांनी कथन केलेल्या काही अडचणी खऱ्याच आहेत हे ध्यानी 
ठेवावे.)
३)    सदनिका खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांना आपण किती रक्कम दिल्यावर नेमकी किती चटई क्षेत्रफळाची सदनिका मिळेल हे कळण्यासाठी.
४)    प्रकल्पाच्या नफारूपी फुलातील एखादी पाकळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दारिद्रय़ रेषेखालील जनतेला कशी मिळेल यावरही विचार होण्यासाठी.




Source :- Click Here

Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre

डिम्ड कन्व्हेयन्स प्रक्रियेप्रकरणीचा शेवटचा अडसर दूर झाला

१९८५ पूर्वी म्हणजे सहकारी गृहनिर्माण संस्थांना मुद्रांक शुल्क लागू होण्यापूर्वी ज्या गाळेधारकांनी खरेदी खते केली होती त्यांना मुद्रांक शुल्क लागू होत नव्हते, परंतु आता डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया पूर्ण करताना सब-रजिस्ट्रार ऑफ अ‍ॅश्युअरन्स हे डिम्ड कन्व्हेयन्सचे सर्टिफिकेट देण्यासाठी संबंधितांकडून खरेदी खतावर प्रचलित दराने मुद्रांक शुल्क भरण्यास सांगतात. त्यामुळे कित्येक हजार हाऊसिंग सोसायटय़ांच्या नावे डिम्ड कन्व्हेयन्स करण्याचे जवळजवळ थांबले होते. वस्तुत: हाऊसिंग सोसायटय़ांच्या बाबतीत मुद्रांक शुल्क लागू होण्यापूर्वीच्या खरेदी खतांवर प्रचलित दराने मुद्रांक शुल्क मागणे हा तशा गाळेधारकांवर अन्याय होता. हा अन्याय दूर करण्यासाठी असे गाळेधारक जी विविध खरेदी खते करतात, अशा गाळेधारकांकडून फक्त खरेदी खतांच्या साखळीपैकी शेवटच्या खरेदी खतावरच मुद्रांक शुल्क आकारण्यात यावे म्हणून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन आणि ठाणे डिस्ट्रिक्ट को-ऑप. हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे हे प्रयत्नशील होते. त्यांच्या या प्रयत्नास यश आले असून, महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुद्रांक शुल्क लागू होण्यापूर्वी करण्यात आलेल्या खतांवर सीताराम राणे यांनी केलेल्या विनंतीप्रमाणे फक्त शेवटच्या खरेदी खतावरच मुद्रांक शुल्क आकारण्यात यावे, असा निर्णय घेतला असून, तो अमलात आला आहे. त्यामुळे १९८५ पूर्वी रजिस्टर झालेल्या खरेदी खतांवर प्रचलित दराने मुद्रांक शुल्क भरावे लागणार नसल्यामुळे संबंधित गृहनिर्माण संस्थांच्या नावे डिम्ड कन्व्हेयन्सची प्रक्रिया करणे सुलभ होणार आहे. विशेष म्हणजे हा आदेश पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. या आदेशाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. अभिहस्तांतरण पत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या सदनिका गाळेधारकांच्या दस्तावर पूर्ण मुद्रांक शुल्क भरले असल्याची खातरजमा करण्यात यावी, तसेच मानीव हस्तांतरणाच्या दस्ताच्या अनुषंगाने शेवटच्या एका दस्तावर मुद्रांक शुल्क भरले असल्याची खात्री करावी. (१४ जुलै २०११च्या आदेशान्वये करण्यात आलेली सुधारणा) मानीव खरेदी खताबाबत कारवाई करीत असताना दि. १०.१२.१९८५ पूर्वीच्या नोंदणी न झालेल्या दस्ताच्या बाबतीत मुद्रांक शुल्काची परिगणना करताना ज्या दिनांकाला तो दस्त निष्पादित झाला त्या दिनांकाचे बाजारमूल्य किंवा दस्तामध्ये नमूद असलेली किंमत यापैकी जे जास्त असेल त्यावर मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात यावी, मात्र संबंधित पक्षकाराने सदर सदनिका / गाळा त्याच वेळी विकत घेतला असल्याबाबतचे ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. (उदा. बँक पासबुक इ.)
अशा प्रकारच्या दस्ताच्या बाबतीत दुय्यम निबंधकांना / मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष अधिकार प्रदान करून त्यांना दस्त मूल्यांकनाची कार्यवाही त्वरेने / किंवा विशिष्ट कालमर्यादेत पूर्ण करण्यात यावी.
विविध प्रचलित कायद्यातील तरतुदींची पूर्तता होत असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे व हे प्रमाणपत्र अंतिम असेल असे आदेश गृहनिर्माण विभाग / सहकार विभाग यांच्याकडून निर्गमित करण्यात यावेत. त्यानंतर दुय्यम निबंधक केवळ मूल्यांकनाशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करतील. मानीव अभिहस्तांतरण पत्रात दाखल झालेल्या दस्तांमधील ज्या दस्तांवर नोंदणी फी भरण्यात आलेली नसेल त्या दस्तांच्या बाबतीत नोंदणी फी एक टक्का किंवा जास्तीत जास्त रु. ३०,०००/- आकारली जात होती.
न विकलेल्या सदनिका / गाळे संबंधित विकासकाच्या नावे दर्शविण्यात यावेत व त्यावर प्रचलित अधिनियम / नियमातील तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क भरणे विकासकांवर बंधनकारक राहील व ज्या वेळी अशा सदनिकांची / गाळ्यांची प्रत्यक्षात विक्री विकासक करील त्या वेळी प्रचलित असलेल्या अधिनियम नियमातील तरतुदींनुसार मुद्रांक शुल्काची परिगणना करून विकासकाने पूर्वी भरलेल्या मुद्रांक शुल्काची सवलत देऊन उर्वरित मुद्रांक शुल्काची आकारणी करण्यात यावी. याकरिता अधिनियमात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे विभागामार्फत सांगण्यात आले. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर सुधारणेची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
या प्रकारे शोध सुविधा सहजिल्हा निबंधक यांच्या कार्यालयात, तसेच इंटरनेटद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी नोंदणी विभाग प्रयत्न करत आहे. सदर सुविधा नजीकच्या कालावधीत उपलब्ध होईल.
सदनिकांच्या खरेदीच्या कागदपत्रांची व विशेषत: मानीव अभिहस्तांतरणाच्या मोफा कायद्यातील तरतुदीनुसार मुद्रांक शुल्क वसुली व नोंदणीच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या विविध प्रश्नासंबंधी महसूल खात्याचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली १ सप्टेंबर २०१० रोजी झालेल्या बैठकीत घेतलेले हे निर्णय.


डिम्ड कन्व्हेयन्स झालेल्या सोसायटय़ांची संख्या आता ३५०
५ नोव्हेंबरच्या डिम्ड कन्व्हेयन्सवरील माझ्या लेखात महाराष्ट्रात फक्त दोनच सोसायटय़ांची नावे डिम्ड कन्व्हेयन्स झाल्याचा उल्लेख आहे; परंतु तो आकडा तीन महिन्यांपूर्वीचा आहे.
२० ऑक्टोबर २०११ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हाऊसिंग सोसायटय़ांसाठी सहकार खात्याने तयार केलेल्या हाऊसिंग मॅन्युअलचे प्रकाशन झाले. त्या प्रसंगीच्या आपल्या भाषणाला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांत ३५० हाऊसिंग सोसायटय़ांच्या नावे डिम्ड कन्व्हेयन्स झाले असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात 
आज ८५ हजारांहून थोडय़ा अधिक हाऊसिंग सोसायटय़ा आहेत. ही आकडेवारी 
स्वत: सहकारमंत्र्यांनी दिली आहे.


Source :- Click Here


Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre

Scrapped 3K proposals were all ‘open-ended’


MUMBAI: Chief minister Prithviraj Chavan's decision to scrap two mega slum projects, approved under the 3K clause, was triggered by the fact that the deals were "open-ended".
Officials said the letters of intent issued by the slum rehabilitation authority (SRA) for the projects were not in keeping with the terms and conditions laid down under the clause.
On November 23, 2010, Lashkaria Constructions was issued a letter to develop a 55.27 lakh sq ft slum plot at Malvani in Malad, while Sterling Buildcon was issued another letter on December 7, 2010, for redevelopment of a 20.30 lakh sq ft plot at Borla in Chembur. The letters were issued on the basis of a circular issued by the SRA to the developers on November 12, which followed a directive from the housing department on November 11. The letters did not specify the timeframe for submitting the mandatory 70% or getting the layout approved, sources stated.
Unlike the slum schemes for individual plots, developers of projects approved under 3K can bypass the mandatory 70% consent norm at the time of issuance of the letter. But the 3K clause requires the appointed developer to submit 70% consent of the affected slum-dwellers and the annexure-II list, which decides the eligibility of the families, within six months of the letter being issued. Norms stipulate the layout plan for the slum cluster should be approved within a year of the letter's issuance, even which it was not specified in the letter and the SRA circulars.
The anomalies came to light in March, after a complaint by BJP national secretary Kirit Somaiya. "The deals were open-ended," a senior official said. The 3K clause was introduced for the development of integrated development of a slum cluster. But the absence of riders on the time-limit for consent and layout approval were seen as defeating the purpose. While the letters were issued after Prithviraj Chavan took over as CM, orders for the approval for the two schemes were granted on October 3 (Lashkaria) and 8 (Sterling Buildcon), during Ashok Chavan's term. Prithviraj Chavan also called for files of four proposals cleared from 2008 to 2009 under 3K.





Dadoji Kondev Co-operative Society Office ;- Adinath Gurudatta Mandir Near Acharya College Chembur Govandi Road Mumbai : 400071 Mukhya Pravartak :- Ravindra Mhatre